THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 17 September 2017

*_पेनड्राइव्ह घेताना..._*
*

_बहुतांश व्यक्ती आपला डेटा साठविण्यासाठी पेन ड्राइव्हचा उपयोग करतात. पेनड्राइव्हचा वेग आणि डेटा साठविण्याची जागाच नाही तर, आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या एका चांगल्या उपकरणासाठी महत्त्वाच्या ठरतात._

*पेनड्राइव्ह आहे तरी काय?*
सर्वसामान्यपणे पेनड्राइव्ह म्हणजे पेनप्रमाणे दिसणारे आणि माहिती साठवून ठेवणारे छोटेसे उपकरण होय. मात्र, पेनड्राइव्हचा उपयोग बऱ्याच कारणांसाठी करता येतो. डेटा साठवून ठेवणे, विंडोजचे बॅकअप घेण्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठीही पेनड्राइव्हचा उपयोग केला जातो.

*वेगही असणे आवश्यक*
ज्यावेळी तुम्ही पेनड्राइव्ह खरेदी करायला जाता, त्या वेळी १६ जीबी साठवण क्षमता असणारे उपकरण १००० रुपयांना असल्याचे आढळून येते. तर, काही पेनड्राइव्हची किंमत पाचशे रुपयेही असल्याचे आढळते. साठवण क्षमता सारखी असूनही त्यांची किंमत वेगवेगळी असण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा वेगवेगळा असणारा वेग होय. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते चांगल्या पेनड्राइव्हसाठी केवळ साठवण क्षमताच नाही तर अन्य वैशिष्ट्येही लक्षात घेण्याची गरज आहे.

*पेनड्राइव्हचे दोन प्रकार*
जेव्हा तुम्ही पेनड्राइव्ह खरेदी करता तेव्हा दुकानदार तुम्हाला दोनप्रकारची उपकरणे दाखविण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते पेनड्राइव्ह ३.० आणि २.० या दोन व्हर्शनमध्ये येतो. ३.० व्हर्शन २.० पेक्षा तुलनेने अधिक वेगवान मानले जाते. ३.०चे व्हर्शन नवे असून, त्याचा डेटा हस्तांतर करण्याचा वेग प्रति सेकंद १०० मेगाबाइट इतका आहे. तर, पेनड्राइव्हच्या २.० या व्हर्शनचा वेग प्रति सेकंद १० ते १५ मेगाबाइट इतका आहे.



*पेनड्राइव्हचा आकारही महत्त्वाचा*
दिवसेंदिवस पेनड्राइव्हचा आकारही कमीकमी होताना दिसून येत आहे. सध्या बाजारात अतिशय लहान आकाराचे पेनड्राइव्ह उपलब्ध आहेत. मात्र, आकारावर पेनड्राइव्हची कामगिरीही अवलंबून असते. त्यामुळे पेनड्राइव्ह खरेदी करताना त्याच्या आकारावरही लक्ष देणे गरजेचे असते. खरे पाहता, पेनड्राइव्हचा आकार जितका मोठा असेल, तितका त्याचा दर्जा आणि कामगिरी चांगली असते असे मानले जाते. पेनड्राइव्ह जितका वजनाने अधिक तितक्या चांगल्या वस्तूंचा त्याच्या निर्मितीसाठी वापर केला गेला आहे, असे मानले जाते. वजनाने आणि आकाराने कमी किंवा हलका असणारा पेनड्राइव्ह सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो.

*पासवर्ड सुरक्षित पेनड्राइव्ह*
सध्या बाजारात पासवर्डद्वारे सुरक्षित पेनड्राव्ह उपलब्ध झाले आहेत. ज्या व्यक्ती पेनड्राइव्हच्या सुरक्षिततेविषयी अतिशय संवेदनशील आहेत, ज्यांना आपला डेटा कायम सुरक्षित रहावा, असे वाटत असेल त्यांच्यासाठी हे पेनड्राइव्ह अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून पेनड्राइव्हमधील संवेदनशील डेटा पासवर्डच्या मदतीने सुरक्षित ठेवता येऊ शकतो.

*

No comments:

Post a Comment