THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 17 September 2017

*भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही खास गोष्टी…*



_नरेंद्र दामोदरदास मोदी तुम्ही या व्यक्तिमत्वाचा राग करा अथवा प्रेम करा परंतु तुम्ही त्यांना दुर्लक्ष करुच शकत नाही. जगाच्या राजकारणात मोदींनी चांगले स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर जगातील सर्वात जास्त ट्विटर फॉलोअर्स असणारा हा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर सर्व अधिकार स्वतःकडे ठेवणारे मोदीजी चांगलेच पॉवरफुल झाले आहेत. जागतिक व्यापाराच्या दृष्टिकोणातुन नरेंद्र मोदी यांनी अनेक बलाढ्य देशासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. मोदी हे पहिले असे भारतीय प्रधानमंत्री असतील ज्यांनी निवडणूक प्रचाराकरीता सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर केला. त्याची  टॅगलाईन ‘अच्छे दिन’ व हॅशटैग #Namo सगळीकडे धुमाकुळ घालताना दिसला व सर्वांनी बघितला. नरेंद्र मोदींची कार्यपध्दती, त्यांचे नियोजन, राहणीमान हे सर्वांना माहिती आहे. परंतु आज आपण त्यांच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या, वाचलेल्या काही गोष्टी  पाहणार आहोत._

*अपरिचित नरेंद्र मोदी*

१) कणखर व्यक्तिमत्व व करारी भाषण शैलीच्यामागे एक कवी लपलेला आहे. त्यांच्या तरुणपणाच्या काळात नरेंद्र मोदींनी गुजराती ह्या त्यांच्या मातृभाषेत अनेक कवीता लिहील्या आहेत. ह्यातील काही १९ कवीता “साक्षी भाव” ह्या पुस्तकात प्रकाशित झालेल्या आहेत. कोणी विचार करेल का हा कणखर राजकारणी प्रेमकविता ललितकाव्य लिहणारा कवी असेल म्हणुन ?

२) यावर्षी सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींना रियाध येथे स्थानिक महिलांनी आयटी कार्यालयात थांबवुन चर्चा करण्यास बोलविले. मोदी हे पहिले राजकारणी असतील ज्यांनी सौदी सारख्या परंपरावादी, रुढीवादी देशातील महिला सोबत संभाषण केले.

३) २०१४ साली झालेल्या भारतातील मोदींच्या शपथविधी सोहळ्यास SAARC परीषदेतील सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आले व संपुर्ण देशातील प्रतिनिधी उपस्थित राहिले. पाकिस्तानचे नवाज शरीफ व श्रीलंकेच्या राजपक्षे यांच्यावर त्यांच्या देशात या सोहळ्याला हजर राहील्यामुळे जुने तणावपुर्ण संबंध लक्षात घेता टीकाही झाली.

४) लहान असताना त्यांना राजकारणात फारसा रस नव्हता. काहीतरी धार्मिक काम करायचा त्यांचा विचार होता. याकरीता बराच काळ मोदींनी रामकृष्ण मिशनच्या राजकोट व बेलुर मठात घालविला होता.

५) एवढया धकाधकीच्या आयुष्यात मोदी त्यांची आई हिराबेन यांच्याकरीता वेळ काढतात व प्रत्येक वाढदिवसाला भेटायला जातात. त्यांना चार भाऊ, बहिण व पत्नी आहे.

६) गुजरात मधील गांधीनगर आशिया खंडातील “सर्वात जास्त हिरवळ असलेले शहर” म्हणून मोदींच्या काळातच घोषित झाले.

७) मोदी राजकारणात सरदार वल्लभभाई पटेलांचा आदर्श घेतात असे सांगतात आणि अध्यात्माकरीता विवेकानंद यांना आदर्श मानतात

८) नरेंद्र मोदी त्यांच्या पेहरावाकरीता प्रसिध्द आहेत. बराक ओबामाच्या भेटीकरीता त्यांनी स्वतःचे नाव लिहलेला २५ लक्ष किमतीचा कोट परीधान केला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. JADE BLUE ही अहमदाबाद येथील कंपनी त्यांचे कपडे डिझाईन करते.

९) शाळेत नरेंद्र मोदी यांनी अनेक नाटकात काम केलेले आहे.

१०) अमेरीकेने एकेकाळी गुजरात दंगलीमुळे मोदींना व्हिसा देण्यास नकार दिला होता. भारताचे प्रधानमंत्री झाल्यावर त्यांना तो व्हिसा मिळाला.

११) प्रेमतिर्थ, संघर्षमा गुजरात, सेतुबंध, ज्योतीपुंज, आख आ धन्य छे, केलवे के केलवाणी, पत्ररुप गुरुजी (गोळवलकर), श्री गुरुजी एक स्वयंसेवक, Journey अशी पुस्तके नरेंद्र मोदींनी लिहली आहेत. प्रेम विषयावर त्यांचे अनेक लेख प्रसिध्द आहेत. तसेच त्यांना फोटोग्राफीचा छंद आहे. याचे प्रदर्शन सुध्दा मोदींनी भरविले होते.

१३) नरेद्र मोदी यांचा आवडता चित्रपट “गाईड” हा आहे व आवडते गाणे एस.एन.त्रिपाठींचे “तेरे कंधो पे आज भार हे मेवाड का, करना पडेगा तुझे सामना पहाड का… हल्दीघाटी नही है काम कोई खिलवाड का, देना जवाब वहा शेरो के दहाड का…” हे आहे.

१४) नरेंद्र मोदी यांनी अमेरीके मध्ये व्यक्तिमत्व विकासाकरीता व इंग्रजी करीता दोन महिन्याचा कोर्स सुध्दा केला आहे.



*

No comments:

Post a Comment