THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 6 October 2016

विज्ञानातील सोपे प्रयोग

 विज्ञानातील सोपे प्रयोग 
भाग 

1. खार्या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणीपरातजड भांडेप्लॅस्टिकचा कागददोरीकाचेची गोटी.कृती – एक परात घ्या.परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवापरातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणीकिंवा समुद्राचेखाडीचे पाणीभराआतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवापरातीवर दोरीच्यासहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधाकागदावर एक काचेची गोटी ठेवागोटी मध्यभागी जाऊनथांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईलहे उपकरण दिवसभर ऊन असेलअशा ठिकाणी ठेवापाणी तापेलत्याची वाफ होईलप्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपातसांद्रिभूत होईलकागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईलजड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीचवाफ होतेत्यातल्या क्षाराची होत नाही.
��सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूलखडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्यात्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा.एक खडू हातात घ्यासर्वात मधली बी शोधून काढात्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूनेजोडादुसर्या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेलअशा पद्धतीनेसर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढाआता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूणनसलेली बी शोधातिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढाअसे एकाचदिशेने जाणारे सर्व कंस काढामग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५ कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्धदिशेचे येतातया संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.
��रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हातपट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहेकोपरापासून मनगटापर्यंतचीलांबी मोजानोंदवून ठेवा. (). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजानोदवून ठेवा. ().मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजानोदवून ठेवा. ().  आणि  यांचे गुणोत्तर काढातसेच कआणि  यांचे गुणोत्तर काढादोन्हीचे उत्तर सुमारे .६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतातएकासरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तरलहान खंड आणि मोठा खंडयांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतातआपला हात रम्य गुणोत्तरात असतो.
��बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्चीकृत्रीम धाग्याचे कापडएक व्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्याखुर्चीवर बसवाएक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉनटेरिलिनपॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठातुकडा घ्यासदरासाडी काहीही चालेलत्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घालाकपडाव्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतीलहा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्टदिसतीलकधी कधी ठिणग्यांचा झटका बसतोसावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्याहालचालीने स्थिरविद्युत निर्माण होतेतिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होतेदोन्हीविरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.
��अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात - डावखोर्यांनी उजवा आणि उजखोर्यांनी डावा – सरळ जमिनीसमांतर ताणातो हात कोपर्यात दुमडादुसर्या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्याच्या हाडाच्या टोकावर हलकाझटका द्यातुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेलयावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असतेनसांचे कार्य विजेच्या सूक्ष्मप्रवाहावर अवलंबून असतेआपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो.त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.
��सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसाकागदकात्रीपट्टीपेन्सिलकंपास.कृती – एका आकाराच्या कागदावर मध्यभागीएक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढावर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यातो कागद एका आरशावरचिकटवाआरसा घराबाहेर उन्हात ठेवावर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्याआरसाभितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेलकवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा.कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेतकवडशात ढगही हालताना दिसतील.आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतोतो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याचीप्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
��संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्तीकाड्यापेटीसंत्रीकृती – संत्र्याची साल सोलाआतल्या फोडी खाऊ शकताएक मेणबत्तीकाड्यापेटीने पेटवातिची ज्योत स्थिर राहू द्यासंत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोटयांच्या पकडीत धरामेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबासालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेडपाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असतेदाबल्यावर त्याचे तुषार उडतातमेणबत्तीच्याज्योतिमुळे पेटतात  संपून विझतात.
��मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजूबदामपिस्तेफ्रिजकृती – मऊ पडलेले काजूबदामपिस्ते वगैरे तेलबियाखायला मजा येत नाहीते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवाती बशीफ्रिजच्या आत ठेवाकाही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आतशिरल्याने सुकामेवा मऊ होतोफ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असतेकोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातलादमटपणा बाहेर फेकला जातो.
��आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागदसदाफुलीची फुलेकात्रीलिंबूसोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला –वहीचा कागद घ्याकागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागदसदाफुलीच्या फुलाच्यापाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत कराकागद ओलसर झाला तरी चालेलकागद कडक होईपर्यंतवाळवायातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाकाकोणता रंग येतोअशाच दुसर्यातुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाकाकोणता रंग येतो पहादोन रंग वेगळे आले की आपलीआम्लतादर्शक पट्टी तयार झाली झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवाकात्रीने कागदाच्याअर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.
��हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.

साहित्य – मीठखाण्याचा सोडाछोटा खलबत्ताचमचाआम्लतादर्शक पट्टीअमोनिया.कृती – छोट्याखलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घालातसेच चमचाभर खाण्याचा सोडा घालाबत्त्याने हे मिश्रण खलत रहा.आंबूस वास येईलत्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेलअमोनियाच्याद्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्यातो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेलादिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो वखलात धुण्याचा सोडा तयार होतोअमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईडवायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.

No comments:

Post a Comment