THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 12 October 2016

प्रेम कविता


१ ) चंद्र आणि तू

चंद्र आणि तू,
असंच मनात विचार आला,
चंद्र सुंदर दिसतो की त्याहुन तू.....
आणि...
मग कळल,
तुला पाहून चंद्र नाय आठवत....
पण....
चंद्राला पाहिल की,
क्षणात आठवते स तू...


२) फक़्त तुझ्यासाठी..

माझ्या आत्म्यातून तुझे जाणे,
हे कधी मी मान्य करत नाही..
तू येतेस तेँव्हा मला कळत नाही,
तुझ्यातला सुगंध मला त्याची जाणीव
करून देतो..
पुःन्हा तू माझ्या पासून दूर जाणार,
ही जाणीव एवढी दुःखदायक असते..
की मी स्वःताला थांबऊ शकत नाही,
पण मला विश्वास आहे,
तू जिथे जाशिल..
तिथून पुःन्हा माझ्यासाठी पुःन्हा परत येशील,
जरी तू आली नाहीस तरी..
मी तुझी वाट
पाहात थांबेल अखेरपर्यंत,
फक़्त तुझ्यासाठी..



३) कदाचित

खूप प्रेम केले मी तिच्यावर
पण तिला कळलेच नाही
बरोबर, प्रेम आंधले असतेना
म्हणूनच कदाचित.
ती म्हणाली होती एकदा
की तुझ्याशिवाय जगू शकत नाही
पण तरी ती सोडून गेली
अरे विसरली असेल कदाचित.
खरे प्रेम करणे म्हणजे काय असते
मला माहीतच नाही, मी केल ते की
तिने केल ते? तिने केल तेच
असेल कदाचित.
ती जात होती मला सोडून
मी नाही आडवल,कारण ती खुश
होती म्हणून, कळले असेल का
तिला कदाचित?
मी अजूनही गप्पच आहे
एकाच आशेवर,
येईल ती पुन्हा माझ्या आयुष्यात
कदाचित!!!!!!!!

४) तुला पाहिलं की

तुला पाहिलं की
अस काय होवून जात
माझ मन मला
कस विसरून जात
तुझ्या डोळ्यात पाहून
भान हरवून जात तुला घेवून मन
नभात उडून जात
तुझ्या केसात हरपून
मन गुंतून जात
त्या रेशीम जाळ्यात
मन गुंफून जात तुझ्या गोड हसण्यान
मन फसून जात
गालावरच्या खळीवर
मन खिळून जात
तुला पाहिलं की
मन वेड होत कळत नाही कस
मनात प्रेम उमलून जात



५) आयुष्य जगून घ्याव

कधी कधी अस वाटत..
आपण हि कोणावर तरी प्रेम कराव...
जगाच्याच नकळत,
कोणाला तरी आपल म्हणाव..
रोज फक्त तिच्याशीच बोलण्यासाठी, काहीही कराव..
अन बोलता बोलता...
फक्त तिच्यात हरवून जाव...
कधी कधी अस वाटत...
आपण हि कोणासाठी तरी जगाव..
कोणाच्या तरी हास्यात,
आपल सगळ विश्व शोधाव...
ते शोधता शोधता,
आपण हि तिच्यात हरवून जाव...
अन आपल्याच नकळत,
तिने ते तिच्या डोळ्याने सांगाव...
खरच..
कधी कधी अस वाटत...
आपण हि कधी तरी प्रेमात पडाव...
निरागस त्या प्रेमाच्या,
धो धो पडत्या पावसात भिजाव...
कधी कधी हसव,
तर कधी कधी रडव...
अन आयुष्याला...
त्या एकाच क्षणात..
संपूर्ण पणे जगून घ्याव...
संपूर्ण पणे...
एकाच क्षणात आयुष्य जगून घ्याव.



६) तीचीच वाट बघत असतो मी..

तीचीच वाट बघत बसतो मी...........!
दीवसा स्वप्ने बघतो मी,
आणि रात्री जागत असतो मी.
ती येणार तीला भेट काय द्यावी.
या विचाराने तिचावरच
कविता करत बसतो मी.
उगाच काहीही लिहीत असतो मी,
मित्रांनी पाहील्यावर त्यांचा करमनुकीचा विषय बनतो मी.
एकटाच तिच्या विचारात बरबडत बसतो मी,
आणि स्वतहुन जगात
वेडा ठरत असतो मी.
ती ज्या ठीकाणी मला सोडुन गेली.
त्याच ठीकाणी जाऊन बसतो मी,
ती गेलेल्या रस्त्याकडे एकटकिने पाहत असतो मी.
मला माहीती हे ती येणार नाही. तरीही तीचीच वाट
बघतो मी, संध्याकाळ झाल्यावर
मन तीथेच सोडुन घरी परतत असतो मी. रोज
रात्री देवाजवळ तीला भेटण्याची प्रार्थना करत
असतो मी, आणि सकाळ झाल्यावर
त्या जागेवर जाऊन वेड्यासारखा पुन्हा तीचीच वाट
बघत असतो मी. पुन्हा तीचीच वाट बघत असतो मी..




७) मी तुझी सावली

जवान :- मी सीमेवर युद्धासाठी चाललो आहे,
जर मी परत येऊ नाही शकलो तर तू
दुसर्या मुलाशी लग्न
कर...
त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघून
हसायला लागते)
जवान :- माझा विश्वास नाही बसत ........तू
हसतेस ????
प्रेयसी :- एक वेडा मुलगा रस्त्याने
चालला होता,
तो कधी डावीकडे पळायचा, तर कधी उजवीकडे
पळायचा,
कधी मागे पळायचा तर कधी पुढे पळायचा,
मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंच
उडी मारायचा ......
हे बघून लोकांनी त्याला विचारले, "हे तू काय
करत आहेस?"
तेव्हा तो म्हणाला,
"अहो बघाना केव्हा पासून
हि सावली माझा पाठलाग करत
आहे,
मी जिथे जाईल तिथे येत आहे,
मी कितीही प्रयत्न केला
तिच्या पासून दूर
पळण्याचा तरीही ती मला सोडत नाहीये ..
असे म्हणून त्याने पुन्हा एक
उडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊन
मरण पावला पण
तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबर
होती.
एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठ करून
उभी राहते,
तिचे हसणे बंद होते
आणि मग म्हणते ............. "वेड्या,
अशी मी तुझी सावली आहे रे.

८)  प्रेम करावे ...

"जमेल तसे प्रत्तेकाने ...
.....कुणावर तरी प्रेम करावे ...

कधी संमतीने ..कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!

प्रेम सखीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!

आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!

प्रेम पुत्रावर करावे ..जमल्यास ,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!

प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!

शिवबाच्या बाण्यावर ...लताच्या गाण्यावर
प्रेम ..सचिन च्या खेळावर आणि
वारकर्यांच्या टाळाव र हि करावे !

प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!

महाराष्ट्राबरोबरच ..देशावर ...आणि ,
अगदी ..न चुकता .स्वतःवर ...जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!



९) तु असली कि

तु असली कि, कसं प्रसन्न वाटत बघ.
तु नसलीस कि, मन कसं कोमेजत बघ.
तु असली कि, पसाऱ्या वरूनही हुज्जत घालायला आवडत बघ.
तु नसलीस कि, त्याच पसाऱ्याशी हुज्जत घालत एकटाच रडहसका होतो बघ.
तु आरसा पुसत माझ्याकडे बघुन लाजतेस, गुपित धन सापडल्याचा आनंद होतो बघ.
तु नसलीस कि, तो आरसाही माझी माझी टर्र उडवून हसतो बघ.
तु असली कि, मे महीनाही ढगाळलेला वाटतो बघ.
तु नसलीस कि, पाउसही डोळ्यांतुन पडु पाहतो बघ.
तु असली कि, आत किशोर कुमार गुणगुणतो बघ.
तु नसलीस कि, कुठुनतरी जगजीत कानांवर पडतो बघ.
तु असली कि, अंगणातील फुलं कशी डुलतात बघ.
तु नसलीस कि, ती ही चेहरा पाडून असतात बघ.
तु असली कि, घड्याळाचे काटे कसे वेग घेतात बघ.
तु नसलीस कि, ते ही जड पावलांनी चालतात बघ.
अस होउ शकत का ग? कि तु नसलीस ना हा विचारही विचारांच्या डोक्यात येउ नये.


१०) प्रेम काय असते

प्रेम काय असते
चला जरा शोधूया..
प्रेम म्हणजे..
ब्रेक अप नंतरही
आपल्या जोडीदाराला जाणून बुजून फोन करणे
आणि म्हणणे ओ सॉरी,
तुला चुकून फोन लागला
मला सवय झाली होती ना...
प्रेम म्हणजे
"आय हेट यु "
"आय हेट यु "
असे म्हटल्यावर हि जेव्हा तुमचा जोडीदार एक सुंदर स्मितहास्य
देऊन म्हणतो..
तू असे करूच शकत नाही,
मी पैंज लावतो ,
तु असे करूच शकत नाहीस
प्रेम म्हणजे
तुम्ही "गुड नाईट" मेसेज पाठविल्यानंतर
जोपर्यंत तुमच्या पार्टनरचा रिप्लाय येत नाही
तोपर्यंत तुम्हाला झोप लागत नाही
आणि थोडक्यात
वरील मजकूर वाचल्यानंतर सर्वप्रथम
जी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येते
ते तुमचे प्रेम...



११) मैत्रीण

काल लग्न झालेली माझी मैत्रीण मला भेटली,
सवाशनीच्या लेण्यामद्धे अजूनच सुंदर वाटली...!
नजरा-नजर होताच ती 'पुन्हा' एकदा लाजली,
आमच्या पहिल्या भेटीची आठवण, ताजी करून गेली...!
"कशी आहेस?"
विचारताच, नेहमीचेच उत्तर मिळाले, पण चेह~यावर, कुणास ठाऊक, तिने उगाच, उसने हसू आणले...!
दोघा सौमित्रांच्या गप्पा- गोष्टी अशा काही रंगल्या, चेह~यावर हास्य आले...
डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्या...!
'व्यक्त न केलेल्या भावना सांगाव्या', अशी कल्पना मनात आली, पण माझी नजर पुन्हा एकदा तिच्या कुंकवाकडे गेली...!
असेच काहीतरी, तिच्या मनालासुद्धा वाटले, पण कदाचित सप्तपदींच्या वचनांनी तिला रोखले...!
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!

१२) ती

मी कसा होतो ते तिला पूर्ण माहित होतं
जसा होतो तसा तिला आवडत होतो
बरं चाललं होतं एकुणात आमचं
मग कधीतरी ती म्हणाली
मला तुझं 'हे हे' आवडत नाही
तिला आवडत नाही म्हणून
मी 'हे हे' करणं बंद केलं
मग काही दिवसांनी ती म्हणाली
तू 'ते ते' करतोस
ना त्याचा मला राग येतो
मग मी 'ते ते' करणंही बंद केलं
मग सगळं बरं चाललं असताना
अचानकच ती म्हणाली
तुझं 'अमुक अमुक' मला अजिबात मान्य नाही…
झालं… मी 'अमुक अमुक' सोडून दिलं
अन मग
पुन्हा काही दिवसांनी म्हणाली
एकदम आईडियल आहे रे आपलं आयुष्य
फक्त तुझं ते 'तमुक तमुक' सोडलं तर…
झालं… मी 'तमुक तमुकही' सोडून दिलं…
आता खूप खूप दिवसांनी
मी माझं ‘हेहे', ‘तेते', 'अमुक
अमुक', ‘तमुक तमुक' सारं सारं
तिच्या सांगण्यानुसार
सोडून दिल्यावर आणि बंद केल्यावर
ती म्हणते आहे,
‘तू
आता पूर्वीसारखा नाही राहिलास
रे…'
आता बोला…!!

१३) कुणीतरी आठवण काढतंय

"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

मोबईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल...
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल...
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास...
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास...
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल
काही नाही...
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही"...

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका...
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता...
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे...
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे...
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल
काही नाही...
"कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही "

१४) प्रेम

नजरेची भाषा नजर समजते.
वा मुलाकातीतून गुज उमलते.
हृद्याचे न्यारे स्पंदन घडते.
ओठांना मग कोरड पडते.
काय झाले न कोणास कळते.
मनात अविरत हुर – हुर मोहते.
आता कोणाचे भानच नसते.
भेटीसाठी मन व्याकुळ होते.
अन हेच ते पहिले प्रेम असते.
विधात्याची मोठी देन असते.
लाभले तर नसीब महान असते.
नाहीतर आठव रूपी डायरीच पान असते.
पहिल्या प्रेमाचा तो कस्तुरी गंध.
सर्वकाळ मनास सुखावी मंद – मंद.
पहिल्या प्रेमाची नशाच वेगळी.
तुल्य ना कशाशी , धुंदीच आगळी....

१५) शब्द

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही

कारण....
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही

१६) यालाच प्रेम म्हणायचं असत.


उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.

एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.

थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.

कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.

शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.

तुझ माझ अस न राहता
'आपल' म्हणून जगायला
प्रेम म्हणायचं असत.

१७) स्वप्न

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू
नकोस !
स्वप्न परीचे पाहिले
की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच
अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच
काही वागायाचो,
ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू
नकोस !
मनातल्या भावना तिच्या कडे
व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते
मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन
तिच्याच स्वप्नात डुबायचो,
ती नेहमी म्हणायची पण
ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-
पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न
होउन राहिले,
मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका
"होती एक परी
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर
कविता करत बसायचो..
"वेडा होतो अगदी वेडा होऊन
जायचो....


माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे
माझ्याशी आजकाल हे घडते विचित्र आहे ,
डोळ्यापुढे माझ्या गा तुझेच चित्र आहे
तुझे रूपवर्णन करण्यापलीकडे शब्दही अपुरे ,
हातात माझ्या अझुनी ते अपूर्ण पत्र आहे
एका कटाक्षाने घालीले भुरड असे हृदयाला
हा तळमळतो तुझ्यासाठी,धीर देतो मी पात्र आहे
ओढणीच्या ढगाला सरसावून बघणं झरा चंद्रमुखी ,
विखुरलेल्या वस्तीत ग काळोख सर्वत्र आहे
प्रत्येक दिवस मोहरतो मिळण्याच्या तृप्त आशेने ,
स्वनांच्या गंधात बहरलेली प्रत्येक रात्र आहे
आज कळलय मला गगन रूप खरे प्रेमाचे
ना वैरी कुणी प्रेमासारखा ना कुणी मित्र आहे .

Love Poems Marathi

प्रेम फक्त त्याचं भावत :

प्रेम फक्त त्याचं भावत
ज्यांना दुसर्यासाठी मारता येत
खर सांगतो आतापर्यंत
आमचा जीव
आम्हालाच प्यारा होता
प्रेमपत्र तू घेतलास अन
आमचा जीव तुझा झाला होता
फक्त आजच्या दिवसच माझं प्रेम
जन्माजान्मात बदलून गेल
जगन माझं आता
तुझ्या प्रेमात न्हाहून गेल .

प्रीती असे करावे कि :
प्रीती असे करावे कि ..
आठवण आली तर डोळ्यात
पाणी यावे ..
जीव असा लावावा कि ,
देवाला हि प्रश्न पडावा कि ..
.
.
.
मी एक जीव घेऊन जातोय
कि दोन …!

कधी तू :
कधी तू
झुकलेल्या पापण्यात ,
कधी तू
ओझरत्या पापण्यात ,
कधी तू
ओझ्हार्त्या लाजण्यात ,
कधी तू
माझ्या स्वछनदी हास्यात ,
कधी तू
पैजाण्याच्या आवाजात
कधी तू
माझ्या असण्यात नसण्यात

कुणीतरी असल पाहिजे :
कुणीतरी असल पाहिजे….
संध्याकाळी घरी गेल्यावर दार उघडायला
सकाळी घरातून बाहेर पडताना
लवकर ये अस सांगायला ….
मिटिंगमधून बाहेर आल्यावर
back असा मेसेज टाकायला
कंटाळा आलाय हे कटाळवान वाक्य
कंटाळा येई पर्यंत सांगायला …
इच्छित स्थळी पोहोचल्यावर
सुखरूप पोहोचले चा फोन करायला …
उशीर होत असेल तर
जेऊन घ्या असे सांगायला
कितीही वेळा सांगितले तरीहि
आपल्यासाठी जेवायचं थांबायला …

सोफ्टवेअरच्या जगातले प्रेम :
इथे एक मेंदू फक्त दुसर्या मेंदूला ओळखतो
इथे एक मेंदू फक्त दुसर्या मेंदूला ओळखतो
चेहरा मात्र गौण असतो
हुशारीची स्तुती केली जाते
सौंदय कोण विचारतो …..
खरेच आहे ना …
कोडाच्या ब्युटीपेक्षा फ्कन्यालीटी पहिली जाते …
कोडाच्या ब्युटीपेक्षा फ्कन्यालीटी पहिली जाते ..
चाललाच नाही कडे तर पिएल ची पण मारली जाते….
हळुवार प्रेमाची जागा तेच्निकल डिस्कशन्स
घेतात….
हळुवार प्रेमाची जागा तेच्निकल डिस्कशन्स
घेतात….
गप्पा मारायला इथे ‘मिटींग्स’ का कमी असतात ?
प्रेम सारखे इथे नसते …
प्रेमासारखे इथे नसते …
जेवढे कमी तेवढेचं असते …
कोम्प्याट कोडला म्हणून तर मागणी जास्त असते
प्रेमात एकमेकांना कधी विसारयाचे नसते ….
प्रोजेक्ट संपल्यावर इथे कुणी कुणाचे नसते …


Marathi Kavita Love

दोन जीवांच्या मिलानातील
दोन जीवांच्या मिलानातील
पापणी ओळी करण्यारया आठवणीतील
प्रत्येकाच्या मनात असते
प्रेमप्रीती त्या नाझुक भावनेमधील…..
निरागस गोड हास्यातील
चिमुकल्या दोन डोळ्यातील
अनुभवून बघ एकदा
प्रेमप्रीती त्या बाळाच्या विश्वासातील ….
झोपताना ऐकलेल्या अंगाईतील
कधीकाळी मिल्ण्याराया धपाटातील
विसरू नकोस कधीच
प्रेमप्रीती त्या आईच्या ममतेतील ..
अथक करण्यार्या कामामधील
धेर्यापुर्तीच्या स्वप्नातील
चाखायला आवडेल तुलाही
प्रेमप्रीती त्या कार्याच्या सिद्धीतील …

तुझ्याशी खूप बोलावेसे वाटते …
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्या खूप खूप जवळ यावेसे वाटते
पण विरहाची भीती वाटते
तुझ्या सोबत चालावेसे वाटते
पण रस्ता चुकण्याची भीती वाटते .

वाट पाह्ण्यार्यापेक्षा वाट
लावणारे खूप असतात .
जमिनीवर उभा राहून आकाशाला
हात लावणारे खूप असतात
सर्वांच्याच आयुष्यात दुख
भरभरून असत कारण सुख देणार्यापेक्षा
दुख देणारेच खूप असतात .

वेळ आली तर तूलाही सांगीन
आयुष्य कस जगायचं असत ..
एका एका शब्दामधून
वाक्य कस बनवायचं असत …
वेळ आली तर तुलाही सांगीन ,
मन कस जिंकायचं असत ..
आवडी निवडी सांगताना कस ,
मनात मन गुंतवायच असत
वेळ आली तर तुलाही सांगीन ,
स्पर्श कसा करायचा आहतो
वेळ आली तर तुलाही सांगीन
स्पष कसा करायचा असतो
वेळ आली तर तुलाही सांगीन
दुख कसा झीझवायाच असत
अश्रूंचा नवीन संसार करून
सुखाने कस नांदायचं असत
वेळ आली तर तुलाही सांगीन ….

चांदण माळून स्वप्नांना घेऊन
शब्द फुलाचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पाथरण जेव्हा तू करीत जातेस
निलेच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात ,इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा ,तू किती गूढ दिसतेस
निराश मनाला ,पुन्हा उभारी
हळुवार साद ,शब्दात तुझ्या ,अलगद तू घालतेस
बेभान भरारी ,माझ्या स्वप्नांना ,पंक तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा ,तू निळाइच असतेस !!

तो चिंब ती हि चिंब
दोघांच्या नजरेत ,प्रेमचे प्रतिबिंब
ओला थेंब ,ओली सर
प्रीतीची रात,मिठीतला बहर ,
ढगाचे बन ,विजेचे तीर ..
ओठावर ओठ आणि श्वास हि अधीर
मनाचा सांगावा ,शब्दात बांधावा
प्रेमाच पाउस  कधी नाही थांबावा .

Marathi Kavita Prem

प्रेमात पडल्यावर नेहमी असाच होत का ?
मन स्वप्नांच्या दुनियेत अखंड भरारी घेत !
किती सुखद भावना आहे ना प्रेमप्रीती म्हणजे !
आपल्यावर कोणीतरी मनापासून प्रेमप्रीती करत आहे
य नुसत्या जाणिवेनेच मन मोहरून जात
पापण्या मिटल्या कि तीच समोर येते आणि
डोळ्यावर आलेली झोप खणात उडून जाते
केव्हातरी पाहते मग नकळत डोळा लागतो
स्वप्नांची दुनियाही व्यापून उरते .
मनावर तिच्या अस्तित्वाची सतत नंशा असते
स्वस्त तिचा सुगंध दरवळत असतो .
जणू तिच्या अस्तित्वात आपल आस्तित्व विरून जात .
जगन बदलत ,वागण बदलत ,बदलून जात जीवन
खरच प्रेम किती सुखद भावना आहे ना !!

प्रीती म्हणजे ,
समजली तर भावना
केली तर मस्करी
मधला तर खेळ
ठेवला तर विश्वास
घेतला तर श्वास
रचला तर संसार
निभावल तर जीवन .

प्रीती एक शब्द आहे
जशी गुलाबाची एक कळी स्त्भ्ध
प्रीती आहेच उनाड वारा
ज्याला ना बाध ना किनारा
प्रेमाच्या सानिध्यात अपुरा जग सारा
अहो ! प्रेमा मध्येच तर बनला
विश्वसुंदर ताजमहाल सारा …

No comments:

Post a Comment