THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 18 October 2016

वाचनाचे महत्वं

वाचाल तर वाचाल
वाचनाचे महत्व शब्दात सांगणे फारच कठीण आहे. समर्थ रामदासांनी मात्र वर उद्धत केलेल्या ते
नेमक्या शब्दात अधोरेखित केले आहे.
आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे. याचा परिणाम वाचन कमी होण्यात होत आहे.
रे ब्रॅडबरी या विचारवंताने म्हंटले आहे.
"You Dont Have To Burn Books To Destroy a Culture,
Just Get Peoples To Stop Reading Them".
म्हणूनच वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येणे हि बाब आज अतिशय निकडीची झाली आहे.
कोण्यात्याही ज्ञानशाखेला सतत अद्यावत राहण्यासाठी सतत वाचनाशिवाय पर्याय नाही.
वाचन हे केवळ मनोरंजनासाठी किंवा करमणुकीसाठी असू नये. किंवा त्याचा तेवढाच मर्यादित उद्देश
असू नये. ज्ञान प्राप्ती हा त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. ग्रंथाना गुरु म्हंटले आहे ते याच अर्थाने.
मार्गारेट फुलर म्हणतात कि,
Tody A Reader, Tomorrow A Leader.
कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,
नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी वाचनाला अन्य
पर्याय नाही. वाचनाची आवड कमी होत चालली आहे.
मानवी जीवनात लेखक महत्वाची भूमिका बजावतात.एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी
अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डा. ए. पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात -
"पुस्तकाच्या सहवासात मला ज्ञान बरोबर नेहमीच आनंद मिळालाय. माझ्या घरात
सुमारे ५० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. अध्यात्म,विज्ञान,प्रशासन,इतिहास,भूगोल,व्यवस्थापन
आणि वाड्मय अश्या विविध विषयांचा त्यात समावेश आहे. माझ ग्रंथ संग्रहालय हि माझी
सर्वात मोठी मौल्यवान ठेव आहे.आणि तेथे व्यतीत केलेला प्रत्येक क्षण सर्वात मौजेचा व समाधानाचा आहे".
प्रगत विकसित देशात युवकांच्या वाचनाचा आढावा नेहमी घेतला जातो.
मित्रानो,
आपल्या महाराष्ट्रचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हे पट्टीचे वाचक होते.
दौर्यावर असताना प्रवासात त्यांनी अनेक पुस्तके वाचल्याच्या नोंदी आहेत.
उत्तमोत्तम पुस्तके विकत घेऊन ती वाचण्याचा त्यांचा छंद होता. त्यांनी केलेला
संग्रह त्यांच्या रसिक वृत्तीची साक्ष देणारा आहे.
म्हणूनच,
"युवक वाचतील तर देश वाचेल"
लोकराज्य या शासनाच्या जून २०११ 
 खाली फोटोत दिलेला अंक नक्की वाचा.
चला सर्व मिळून वाचन संस्कृती जोपासू या"

No comments:

Post a Comment