विज्ञानातील सोपे प्रयोग
भाग १
1. खार्या पाण्याचे गोडे पाणी.
साहित्य – खारे पाणी, परात, जड भांडे, प्लॅस्टिकचा कागद, दोरी, काचेची गोटी.कृती – एक परात घ्या.परातीच्या मध्यभागी परातीपेक्षा कमी उंचीचे एक जड भांडे ठेवा. परातीत खारे पाणी (विहिरीचे मचूळ पाणीकिंवा समुद्राचे, खाडीचे पाणी) भरा. आतल्या जड भांड्यापेक्षा पाण्याची पातळी कमी ठेवा. परातीवर दोरीच्यासहाय्याने एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बांधा. कागदावर एक काचेची गोटी ठेवा. गोटी मध्यभागी जाऊनथांबेल आणि गोटीच्या वजनाने प्लॅस्टिकचा कागद थोडा वक्राकार होईल. हे उपकरण दिवसभर ऊन असेलअशा ठिकाणी ठेवा. पाणी तापेल, त्याची वाफ होईल, प्लॅस्टिकच्या कागदावर पाण्याच्या थेंबाच्या रुपातसांद्रिभूत होईल. कागदाच्या मध्याकडे घरंगळत जाईल. जड भांड्यात शुद्ध पाणी थेंब थेंब पडेल.पाण्याचीचवाफ होते, त्यातल्या क्षाराची होत नाही.
��सूर्यफुलातल्या बियांची रचना.
साहित्य – सूर्यफूल, खडू.कृती – एक काढणीला आलेले सूर्यफूल घ्या. त्याच्या वाळलेल्या पाकळ्या हलके काढा.एक खडू हातात घ्या. सर्वात मधली बी शोधून काढा. त्या बीला लागून असलेली बी या दोन्हींचे मध्यबिंदू खडूनेजोडा. दुसर्या बीला लागून असलेली एक बी अशी शोधून काढा की ती चक्राकार मांडणीत बसेल. अशा पद्धतीनेसर्वात कडेच्या बी पर्यंत पोचेल असा चक्राकार कंस काढा. आता दुसरी सर्वात आतली आणि खडूची खूणनसलेली बी शोधा. तिच्यापासून सुरू होणारा आधीच्या कंसाच्या दिशेत वळणारा दुसरा कंस काढा. असे एकाचदिशेने जाणारे सर्व कंस काढा. मग विरुद्ध दिशेने जाणारे कंस काढा.५५ कंस एका दिशेचे तर ८९ कंस विरूद्धदिशेचे येतात. या संख्या फिलोनसी मालिकेतल्या सलग संख्या आहेत.
��रम्य गुणोत्तर
साहित्य – एक हात, पट्टी.कृती – आपल्याला हाताची लांबी मोजायची आहे. कोपरापासून मनगटापर्यंतचीलांबी मोजा. नोंदवून ठेवा. (क). कोपरापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा. नोदवून ठेवा. (ह).मनगटापासून मधल्या बोटापर्यंतची लांबी मोजा, नोदवून ठेवा. (ब). ह आणि क यांचे गुणोत्तर काढा. तसेच कआणि ब यांचे गुणोत्तर काढा. दोन्हीचे उत्तर सुमारे १.६१८ येते.या गुणोत्तराला रम्य गुणोत्तर म्हणतात. एकासरळ रेषेचे दोन असमान भाग गेले की मोठा खंड आणि पूर्ण रेषा यांचे गुणोत्तर, लहान खंड आणि मोठा खंडयांच्या गुणोत्तर इतके असेल तर त्याला गम्य गुणोत्तर म्हणतात. आपला हात रम्य गुणोत्तरात असतो.
��बसल्या बसल्या वीज.
साहित्य – प्लॅस्टिकची खुर्ची, कृत्रीम धाग्याचे कापड, एक व्यक्ती.कृती – एका व्यक्तिला एका प्लॅस्टिकच्याखुर्चीवर बसवा. एक कृत्रिम धाग्याने बनवलेला – नायलॉन, टेरिलिन, पॉलिइस्टर यांपैकी – कापडाचा मोठातुकडा घ्या. सदरा, साडी काहीही चालेल. त्या कापडाने खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला वारा घाला. कपडाव्यक्तिच्या जवळून नेताना विजेच्या ठिणग्या पडलेल्या दिसतील. हा प्रयोग अंधारात केल्यास ठिणग्या स्पष्टदिसतील. कधी कधी ठिणग्यांचा झटका बसतो, सावधपणे प्रयेग करा.कृत्रिम धाग्याच्या कपड्याच्याहालचालीने स्थिरविद्युत निर्माण होते. तिच्या प्रभावाने प्लॅस्टिकमध्ये प्रवर्तीत वीज तयार होते. दोन्हीविरूद्ध भाराच्या वीजा निर्भारीत होताना ठिणग्या पडतात.
��अंगात वीज.
साहित्य – तुम्ही स्वत:कृती – तुमचा एक हात - डावखोर्यांनी उजवा आणि उजखोर्यांनी डावा – सरळ जमिनीसमांतर ताणा. तो हात कोपर्यात दुमडा. दुसर्या हाताच्या मधल्या बोटाने कोपर्याच्या हाडाच्या टोकावर हलकाझटका द्या. तुम्हाला विजेचा झटका बसलेला जाणवेल. यावरून तुमच्या अंगात वीज आहे हे सिद्ध होईल.
हाताच्या कोपर्याच्या हाडांजवळील - अलनर नस त्वचेच्या बरीच जवळ असते. नसांचे कार्य विजेच्या सूक्ष्मप्रवाहावर अवलंबून असते. आपल्या शरीरात पेशीत पोटॅशियम जास्त तर रक्तात सोडीयम जास्त असतो.त्यांच्यात विशिष्ट परिस्थितीत वीजभार निर्माण होतो.
��सूर्यावरचे डाग घरात पहा
साहित्य – आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागीएक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावरचिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आरसाभितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा.कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते सूर्यावरचे डाग आहेत. कवडशात ढगही हालताना दिसतील.आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होतो, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याचीप्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
��संत्र्याची आतषबाजी
साहित्य – मेणबत्ती, काड्यापेटी, संत्रीकृती – संत्र्याची साल सोला. आतल्या फोडी खाऊ शकता. एक मेणबत्तीकाड्यापेटीने पेटवा. तिची ज्योत स्थिर राहू द्या. संत्र्याच्या सालीचा एक तुकडा अंगठा आणि मधले बोटयांच्या पकडीत धरा. मेणबत्तीच्या ज्योतीजवळ नेऊन साल उभ्यात दाबा. सालीतून उडालेले शितोंडे प्रखर उजेडपाडत पेटतील.संत्र्याच्या सालात ज्वालाग्राही तेल असते. दाबल्यावर त्याचे तुषार उडतात. मेणबत्तीच्याज्योतिमुळे पेटतात व संपून विझतात.
��मऊ काजू करा टणक
साहित्य – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते, फ्रिजकृती – मऊ पडलेले काजू, बदाम, पिस्ते वगैरे तेलबियाखायला मजा येत नाही. ते पूर्ववत कडक करण्यासाठी मऊ सुकामेवा एका बशीत पसरून ठेवा. ती बशीफ्रिजच्या आत ठेवा. काही तासांनी बशी बाहेर काढून पहा सुकामेवा पुन्हा टणक झालेला असेल.पाणी आतशिरल्याने सुकामेवा मऊ होतो. फ्रिजमध्ये हवा गार आणि कोरडी असते. कोरड्या हवेमुऴे सुक्यामेव्यातलादमटपणा बाहेर फेकला जातो.
��आम्लतादर्शक पट्टी
साहित्य – साधा वहीचा कागद, सदाफुलीची फुले, कात्री, लिंबू, सोडा.कृती – साधा – गुळगुळीत नसलेला –वहीचा कागद घ्या. कागदावर शाई फुटत असेल तर तो या प्रयोगासाठी उत्तम कागद. सदाफुलीच्या फुलाच्यापाकळ्या कागदावर चोळून कागद रंगीत करा. कागद ओलसर झाला तरी चालेल. कागद कडक होईपर्यंतवाळवा. यातला एक तुकडा घेऊन त्यावर लिंबाच्या रसाचा थेंब टाका. कोणता रंग येतो? अशाच दुसर्यातुकड्यावर ओलसर करून सोड्याची चिमूट टाका. कोणता रंग येतो पहा. दोन रंग वेगळे आले की आपलीआम्लतादर्शक पट्टी तयार झाली. न झाल्यास आणखी पाकळ्या चोळून कागद वाळवा. कात्रीने कागदाच्याअर्धा सेंटिमीटर रुंदीच्या पट्ट्या करा.सदाफुलीच्या पाकळीतील रंगद्रव्य आम्लतेनुसार रंग बदलते.
��हैड्रोजन क्लोराईड वायू बनवा.
साहित्य – मीठ, खाण्याचा सोडा, छोटा खलबत्ता, चमचा, आम्लतादर्शक पट्टी, अमोनिया.कृती – छोट्याखलबत्त्यात एक चमचा कोरडे मीठ घाला, तसेच चमचाभर खाण्याचा सोडा घाला. बत्त्याने हे मिश्रण खलत रहा.आंबूस वास येईल. त्यावेळी ओलसर आम्लतादर्शक पट्टी खलाजवळ आणा तिचा रंग बदलेल. अमोनियाच्याद्रावणाचा एक थेंब चमच्यावर घ्या. तो खलाजवळ आणल्यास त्यातून नवसागराचा पांढरा धूर आलेलादिसेल.मीठ आणि खाण्याचा सोडा कोरड्यातच खलला की त्यातून हैड्रोजन क्लोराईड वायू मुक्त होतो वखलात धुण्याचा सोडा तयार होतो. अमोनियाच्या द्रावणातून बाहेर पडणारा अमोनिया वायू हैड्रोजन क्लोराईडवायू बरोबर संयोग पावून नवसागर धूर स्वरूपात तयार होतो.
No comments:
Post a Comment