THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 17 October 2016

प्रथम क्लाऊड स्टोरेज म्हणजे काय ते पाहूया. आज
काल पेनड्राईव घेऊन फिरणे ओल्ड फॅशनेबल मानले जात
आहे. ज्याप्रकारे भारतात इंटरनेटचा प्रसार झाला
त्या प्रमाणे फिजिकली डेटा घेऊन फिरणे
मागासपानाचे लक्षण मानले जात आहे. आता तुम्ही
ऑनलाईन डेटा साठवू शकता आणि शेअरपण करू शकता.
क्लाऊड स्टोरेजचा मुख्य सिद्धांत म्हणजे कि आपल्या
सिस्टम  मध्ये किंवा एक्सटर्नल डिस्क मध्ये डेटा
स्टोअर करण्याऐवजी ऑनलाइन सेव करणे.आणि सर्वात
महत्वाचे म्हणजे हि पद्धत अतिशय सुरक्षित आहे. ज्या
प्रमाणे आपले इमेल्स आपणच पाहू शकतो तसेच यामध्ये
आपल्या फाईल्स फक्त आपण पाहू शकतो. जर
तुम्हाला एखादी फाईल जर कुठे पाठवायची असेल तर
फक्त एका क्लिक वर शेअर करू शकता.
इंटरनेट वर अश्या अनेक साईट आहेत ज्या क्लाऊड
स्टोरेज सेवा पुरवतात. या साईटवर आपल्याला एक
खाते काढावे लागते मग युजरनेम व पासवर्ड तयार
करावा लागतो. सुरक्षेच्या आणि फीचर्स च्या दृष्टी
ने ड्रॅापबॉक्स ची सेवा सर्वोत्तम आहे. सोपा इंटरफेस
आणि पुरेशी स्टोरेज यामुळे ड्रॅापबॉक्स चांगलेच
प्रसिद्ध आहे. ड्रॅापबॉक्स मध्ये आपल्याला 2 GB ची
स्टोरेज मिळते. तुम्ही ती 18 GB पर्यंत वाढवू शकता.
मला वाटते कि प्रत्येकाने ड्रॅापबॉक्स वापरण्यास
सुरुवात केळी पाहिजे. निदान आपली महत्वाची
डॉक्यूमेंटस, फोटोज, वीडीओ अशी अतिशय वैयक्तीक
माहिती तुम्ही यावर स्टोअर करू शकता. सध्यातरी
इंटरनेटवर ड्रॅापबॉक्स हून सुरक्षित स्टोरेज उपलब्ध
नाहीये.
ड्रॅापबॉक्स वर 2GB जागा मिळवण्यासाठी येथे
क्लीक करा.

No comments:

Post a Comment