THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 28 January 2017

QR coded Text Books

 पिचाई यांसारखे कित्येक भारतीय नागरिक अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.तंत्रज्ञान क्षेत्रात आपण आघाडीवर असलो तरी हे तंत्रज्ञान  भारताच्या ग्रामीण भागात मात्र कासव गतीने मार्गक्रमण करत आहे.याला पायाभूत सुविधांची अनुपलब्धता कारणीभूत  असो वा नागरिकांची अनास्था.मात्र या दोन्ही समस्यांवर मात करत ‘power to empower ’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवत ‘डिजिटल इंडिया ‘ ची घोषणा करण्यात आली.अनेक खाजगी संस्था नानाविध सुविधा त्यांच्या ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या  सहायाने पुरवत असताना सरकारने देखील मागे न राहण्याचे ठरवले असावे.आज महाराष्ट्र सरकारने देखील जवळपास 150 सेवा online पद्धतीने पुरवण्यास सुरवात केली आहे.या डिजिटल इंडिया मधील डिजिटल नागरिकांना घडवण्याचे कार्य ज्या वर्ग खोल्यांमध्ये चालते तिथेदेखील तंत्रज्ञान वापरास सुरवात झाली आहे.अनिल सोनुने,बालाजी जाधव सारखे शिक्षक या डिजिटल चळवळी चे नेतृत्व खंबीरपणे सांभाळत आहेत.आजही वर्गखोल्यामध्ये पाठ्यपुस्तक हेच शैक्षणिक साधन प्रभावीपणे वापरण्यास शिक्षक उत्सुक दिसतात.मात्र या पाठ्यपुस्तकांना तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याचे आव्हान बालभारती समोर आहे.शिक्षण मंत्र्यांनी देखील बालभारती ला ‘e-बालभारती’ चे स्वरूप देण्याचा मनोदय सदैव बोलून दाखवला आहे.तंत्रज्ञान वापराने अंकीय दरी ( digital divide ) कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान अधिक सुलभरीत्या ग्रामीण भागात पोहचवणे आवश्यक ठरते. ‘e-बालभारती’ च्या प्रयोगातून ही दरी कमी करता येणे शक्य आहे.कारण पाठ्यपुस्तके प्रत्येक मुलापर्यंत सहजरीत्या पोहचतात.पाठ्यपुस्तके तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम केली तर तंत्रज्ञान वापरास उत्सुक नागरिक प्राथमिक स्तरातुनच तयार होतील.मोबाईल च्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांना ‘e-बालभारती’ चे स्वरूप देत डिजिटल नागरिक घडवणाऱ्या अशाच  एका  यशस्वी प्रयोगाबद्दल आज जाणून घेवूयात.सोलापूर च्या जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी हा प्रयोग जून 2015 पासून राबवला आहे.QR चा पाठ्यपुस्तकात वापर करणारा हा प्रयोग.QR कोड म्हणजे Quick Responce code. मुख्यतः व्यापारी क्षेत्रात याचा वापर केला जातो.या कोड मध्ये सांकेतिक रुपात साठवलेली माहिती मोबाईल द्वारे काही क्षणात प्राप्त करता येते.मात्र या कोडचा शिक्षण क्षेत्रात  कल्पकपणे वापर रणजीतने केला.पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठासाठी  त्यांनी हे QR कोड तयार केले.या कोड मध्ये संबंधित पानांवरील आशय अंकीय स्वरुपात ( Digital content ) साठवला . या कोड मध्ये साधारणपणे  खालील घटक सामाविष्ट आहेत.
·         अभ्यासविषयक सूचनाचा संच,
·         बालकाने करावयाच्या कृती संच
·         कविता असेल तर MP३ format
·         गोष्टी साठी व्हिडीओ
·         online प्रश्नपत्रिका
·   संबंधित पानांवर चिटकवले.मोबाईल मधील NEO Reader या app च्या सहाय्याने हा QR  कोड स्कॅन केला कि त्या पानावरील कविता ऑडीओ रुपात ऐकायला मिळते, पाठाचा विडीओ  पाहता येतो. विडीओ पाहून झाला कि लगेच online प्रश्नपत्रिका मोबाईल वर झळकू लागते.ही प्रश्नपत्रिका सोडवली असता त्याचा निकाल मुलाच्या इ-मेल वर तात्काळ प्राप्त होतो.प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने ,कधीही ,कुठेही शिकण्याची संधी यामुळे मिळत आहे.एखादा घटक मुलाला समजला नाही तर तो पुन्हा कोड स्कॅन करून शिकू शकतो.या कोड मध्ये त्यांनी online feedback  देण्याची देखील सोय केली असून काही अडचण आली तर हेल्पलाईन देखील सुरु ठेवली आहे.पाठ्यपुस्तकातील आशय जिवंत करण्याची किमया या तंत्राने साध्य झाली असून आज महाराष्ट्रातील 7427  जि.प.शाळांमधील जवळपास 1,50,000 मुले ही QR कोडेड बुक्स वापरत आहेत.मोबाईल चा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प तंत्रस्नेही नागरिक घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.या तंत्रज्ञानाची व्यापकता वाढण्याचे कारण म्हणजे त्याची सुलभता.

No comments:

Post a Comment