THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 13 January 2017

EDUCATION WITHOUT ETHICS IS A DISASTER


काल परवा पार पडलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत इंग्रजी विषयाच्या निबंधासाठी विषय होता POLITICS WITHOUT ETHICS IS A DISASTER.सहजच विचार करताना लक्षात आले , अरे किती live विषय आहे? विषयात फक्त राजकारणाचा विचार असला तरी आज प्रत्येक क्षेत्राची विश्वासार्हता ढासळलेली आढळते? राजकारणच का? बाकीचे सगळेच अंग अपंग झालेत समाजाचे.
समाजाचे नैतिक अध:पतन तसे सगळ्याच काळामध्ये होत होते नाही असे नाही. पण आजच्या नेटकरयांच्या युगात त्याची गती भयंकर म्हणावी अशी आहे.cut,edit,paste & share ची संस्कृती उदयाला आलीय. आणि ही वृत्ती अभ्यास आणि व्यासंग या वृत्तींचा खून करू पाहतेय.एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून पाहण्या ऐवजी जे समोर येतंय त्यावर विश्वास ठेवून डोक्यात राख घालून घेण्याची वृत्ती आजकाल भयंकरच म्हणावी लागेल.उदा.मागे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक संदेश whtsapp वर फार फिरत होता.मलाच किमान तो २० वेळा आला.त्यात असे म्हटले होते कि सगळ्या देश्यांची देशी भाषेतील आणि इंग्रजीतील नवे समान आहेत,पण भारताचे इंग्रजीत इंडिया आणि हिन्दूस्थानीमध्ये भारत. यामध्ये इंग्रजांचे कारस्थान आहे.INDIA-Indipendant Nations Declared In August अशी या नावाची व्युत्पत्ती सांगण्यात आली. आमच्या सर्व बांधवांनी अगदी उदारपणे सगळीकडे शेअर करून स्वतःबरोबरच आपल्या देश्याच्या महान परंपरेचाही तेजोभंग करवून घेतला.एकाही महाभागाला वीस वर्षे शाळेत शिकलेला इतिहास आठवला नाही.आपल्या राज्याघटनेतील पहिलेच वाक्य India that is Bharat shall be union of states हे सुद्धा या महाशयांना माहित नसते.तरीही पोस्ट हिरीरीने पुढे पाठवतात . हा आमच्या नालायकपनाचा कळस म्हणावा लागेल.आम्ही आमची अभ्यासाची परंपरा आणि मुल्ये गहान टाकलीत याचे हे द्योतक म्हणावे लागेल.
याला कारण आजची शिक्षणव्यवस्था म्हणावी लागेल.आमचे एक मित्र एम.च्या वर्गाला इतिहास शिकवतात.सहज गप्पा मारताना शिक्षकांच्या व्यासंगाचा मुद्दा चर्चेला निघाला.सरांनी सांगितलेले वास्तव अत्यंत चीड आणणारे होते.ज्यांची आणि अकलेची आयुष्यात कधीच गाठ पडली नाही ते मोक्याच्या जागा अडवून बसलेत.प्राचार्य निराशावादी, पर्यवेक्षक नादान. अशी परीस्थिती. त्यांच्या पागारांचे आकडे आपले डोळे दीपवणारे असते.जे खरेच लायक आणि होतकरू असतात त्यांना लेकरासाठीच्या दुधाचे बिल देण्याची पंचाईत असते,कारण ते csb वर काम करतात. ३००० महिना,म्हणजे आपल्या शासनाच्या रोजगार हमी योजनेपेक्षा कमी मजुरी .  पात्रता नेट.,सेट,पी.एच.डी.,पगार कमी, नोकरीत कायम होण्याची हमी नाही .हमी नाही म्हणण्यापेक्षा कुवत नाही. कारण अगदीच खेड्यातील कॉलेजचा रेट पंचवीस लाखाच्या पुढेच आहे.ज्यांना भरपूर पगार त्यांची साधे वर्तमानपत्र वाचण्याची दानत नाही.एका इतिहासाच्या तथाकथित कलेक्टरपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या प्राध्यापक महोदयांना मी विचारले,"सर,इतिहासात एम.ए.करतोय काही संदर्भ पुस्तकांची नावे सुचवा",तर त्यांचे उत्तर इतके भयानक होते कि जसे काही मूळ संदर्भ पुस्तके वाचणे म्हणजे गुन्हा वाटावा.त्यांच्या मते ते स्वतः बाजारू नोट्स वाचूनच प्राध्यापक झाले होते.इतःपर आम्हीही बाजारू नोट्स वाचूनच डिग्री मिळवावी आणि मिरवावी अशीच त्यांची शिकवण होती.अर्थात त्यांनी पानिपतचे युद्ध याविषयी जे हास्यास्पद ज्ञान दिले त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटले नाही.
असे लोक काय आमच्या कलाम साहेबांच्या कल्पनेतील प्रज्वलित मने घडवणार?काय त्यांच्या स्वप्नातील भारत उभा करणार. २०२० सालात महासत्ता होण्याचे त्यांचे स्वप्न कसे पूर्ण करणार.विद्यार्थ्यांच्या बटव्यातून तंबाखूचा विडा उसना घेणारी जमात पूर्वीही होती पण आता अकल्पनीय प्रमाणात वाढलीय.
खरेतर स्वतः कालसुसंगत राहण्याचे फार मोठे आव्हान आमच्या या महामहीम गुरुवर्यांसमोर आहे.काळाच्या पुढे चालणारे शिक्षक आमच्या नशिबाने आपल्या देशात आहेतही पण १३० कोटींच्या देशासाठी तेवढे पुरेसे नाहीत.स्वतःची व्यावसायिकता जपणारी ध्येयवादी शिक्षकांची पिढी घडवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी सत्ताधारी, विरोधक,सामाजिक कार्यकर्ते यांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येणे आवश्यक आहे.अन्यथा मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्था आपण कधीही उभी करू शकणार नाहीत. आम्हीच उभी केलेली मुल्यविहीन बाजाराधिष्ठित शिक्षणव्यवस्था हे आमचे सर्वात मोठे पाप आहे.त्याचे क्षालन आम्हीच करावयास हवे.आमच्या मातीचे दुर्दैव हे इथे मुल्यव्यवस्थेपेक्षा आर्थिक हितसंबंध कायम वरचढ ठरत आलेत.बाजारबसवी व्यवस्था दुसरे काय ?  

No comments:

Post a Comment