THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 28 January 2017

                                      ब्राझील म्हटले कि लगेच फुटबॉल आठवतो.पेले,रोनाल्डो सारखे  आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे या देशाने जगाला दिलेली देणगीच.पण आज ब्राझील ची एक वेगळी ओळख जगासमोर आली आहे.एप्रिल  २०१६ मध्ये या देशाने माध्यमिक स्तरावरील सर्वच बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट गाठणारा जगातील पहिला देश हा बहुमान मिळवला आहे.संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालात या प्रयोगाची विशेष दखल घेतली गेली आहे. याच प्रयोगाची ओळख करून देणारा हा लेख.
                                      सेंट लुईस हा अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या खेड्यात राहणारा मुलगा.गावात एकूण २० कुटुंबे अन लोकसंख्या ७६.लुईस अन त्याचा मित्र फर्नांडीस  हे दोघे यावर्षी ११ वी मध्ये शिकत आहे.त्यांच्या गावातील हे दोघेच  उच्च शिक्षित युवक.10 वर्षापूर्वी ची परिस्थिती मात्र वेगळी होती.माध्यमिक शिक्षण घ्यायचे असेल तर लुईस समोर दोनच पर्याय होते.एक म्हणजे १०० मैल दूर असणाऱ्या शहरात जाणे—जिथे पोहचायला तब्बल २ आठवडे लागतात,किंवा मग शिक्षण सोडून देणे.माध्यमिक स्तरावर होणारी गळती हा ब्राझील च्या सरकार समोरचा चिंतेचा प्रश्न होता.ही गळती रोखण्यासाठी सरकारने अंमलात आणलेला कृती  आराखडा म्हणजेच ‘तंत्रस्नेही शिक्षणाचा ब्राझिलियन  प्रयोग’.
                                      सन २००९ साली आपला  भारत देश १४ वर्षाखालील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा केला म्हणून आनंदोत्सव साजरा करत होता , त्याच वर्षी ब्राझील ने माध्यमिक स्तरावरील मुलांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा कायदा केला अन याची  उदिष्टे गाठण्याची कालमर्यादा सन २०१६ अशी ठरवण्यात आली.ब्राझील च्या कायद्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण हा मुलभूत घटक मनाला गेला.तसेच निश्चित कालमर्यादेत हे उदिष्ट साध्य करावयाचे असल्याने विचार व कृती यांमध्ये एकवाक्यता साधली गेली. अमेझॉन च्या खोऱ्यात वसलेल्या २३०० खेड्यातील तब्बल ३,००,००० मुलांना पुन्हा शिक्षण प्रवाहात आणण्यात ब्राझील ला यश आले आहे.माध्यमिक स्तरावर होणाऱ्या गळती मागील महत्वाचे कारण होते – माध्यमिक स्तरावरील शिक्षणासाठी करावा लागणारा शेकडो मैलांचा प्रवास.यावर उपाय म्हणून ही मुले ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती त्याच शाळेत माध्यमिक शिक्षणासाठी थेट प्रक्षेपण केंद्रे उभारण्यात आली.सरकारी मालकीची दूरचित्रवाहिनी ,उपग्रह सेवा पुरवठादार  व स्थानिक केबल चालक यांच्या मदतीने पहिल्या टप्प्यात  तब्बल २३०० खेड्यामधील शाळेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर हा देश थांबला नाही तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याच्या यापूर्वीच्या अयशस्वी प्रयोगांवर मात कारणासाठी विशिष्ट कार्ययोजना आखली गेली.ब्राझील मधील विख्यात शिक्षणतज्ञ,बालमानसशास्त्रज्ञ व शिक्षण शास्त्र अभ्यासक यांच्या मदतीने असे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार केला गेला.या मुलांची भौगोलिक परिस्थिती,परंपरा,बोलीभाषा,पालकांचे व्यवसाय यांच्या  अभ्यासातून  व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करत   शिक्षणातून अर्थार्जन हे उदिष्ट साध्य करणारा अभ्यासकम आखला गेला. कौशल्याधीष्ठीत  अभ्यासक्रमाच्या आखणी नंतर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ब्राझील मधील सर्वोत्कृष्ट ५० शिक्षकांची निवड केली गेली. अमेझॉन ची राजधानी मानौस मधील केंद्रातून हे शिक्षक रोज ४ तास अध्यापन करत राहिले. हे थेट प्रक्षेपण ज्या शाळेत दाखवले जात होते त्या शाळेतील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन (Classroom-Management ) व  मूल्यमापनाचे (Evaluation) चे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.थेट प्रक्षेपण वर्ग रटाळ न होता अधिक परिणामकारक होण्यासाठी द्विमार्गी संवादाची सुविधा देखील पुरवण्यात आली.यामुळे कोणताही विद्यार्थी त्याला आलेली अडचण तज्ञ मार्गदर्शकाना विचारू शकत होता.त्यामुळेच हे अध्यापन अधिक प्रभावी ठरले.पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या मुल्यमापनाला फाटा देत कौशल्याधारित मुल्यमापनाचा  अवलंब करण्यात आला.मुलांचे मूल्यमापन हे सार्वत्रिक न करता ते वैयक्तिक करण्यात आले.त्यामुळे प्रत्येक मुलाच्या प्रगतीच्या आलेखाची तुलना इतरांशी होण्याचा धोका टाळला गेला. प्रत्येक आठवडा अखेर या प्रत्येक मुलाच्या आठवड्यातील कामगिरीचा आढावा घेवून पुढील आठवड्यातील पाठ्य्क्रमाची आखणी केली गेली.  प्रत्येक शाळेला पुढील आठवड्याचे वेळापत्रक अगोदरच पाठवले जाई त्यामुळे तेथील शिक्षकांना वर्ग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ जाई.
                                         सलग ३ वर्षे याची अंमलबजावणी केल्यानंतर याची उपयुक्तता पाहून ब्राझील मधील इतर ६ राज्यांनी देखील याच मॉडेलचा स्वीकार केला.मागील 10 वर्षे हा प्रयोग सुरळीत सुरु आहे.याचाच पर

No comments:

Post a Comment