THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 13 January 2017

श्रीकृष्णविचार

श्रीकृष्ण जयंति विशेष कृष्णसंदेश

यद्यद्विभूतिमत्सत्वम् श्रीमदुर्जितमेव वा|
 तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम्  ॥10-41॥

अर्थ : विश्वात जेथे जेथे विभूतीमत्व, ऎश्वर्य, शक्ती,कांती पाहशील ती माझ्याच अंशाची अभिव्यक्ती आहे असे तु मान.

आजच्या भेगाळलेल्या समाजाला एकसंघ करण्याची ताकद श्रीकृष्णाच्या विचारात आहे.आमचं तेवढं खरं आणि इतर सर्व चूक म्हणणाऱ्या लोकांनी योगेश्वराचा हा संदेश ध्यानी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

   हे ज्याच्या ध्यानात येईल तो कोणत्याही धर्माचा,जातीचा,वंशाचा,लिंगाचा,प्रदेशाचा,वर्णाचा,स्वप्नातही द्वेष करणे शक्य नाही.तोच खरा श्रीकृष्णभक्त.जो भेद मिटवतो तो भक्त; भेद उभे करणारा भक्त असू शकत नाही.

     जगाच्या सर्व समस्यांवर तार्किक उत्तर पुरवणार्या जगद्गुरु श्रीकृष्णाला आजच्या दिवशी कोटी कोटी वंदन.॥ कृष्णं वंदे जगद्गुरुम्॥

   कृष्णाचा उपदेशच विश्वधर्माचा पाया बनू शकतो हे ध्यानात घेऊन " अवघाचि संसार सुखाचा करिन आनंदे भरिन तिन्ही लोक " अशी विश्व ऎक्य आणि विश्व सौख्याची कामना आणि प्रतिज्ञा करणाऱ्या कविश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनाही जयंती निमित्त कोटी कोटी नमन

No comments:

Post a Comment