THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 28 January 2017

भारतीय समाजमन

                     ‘15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला’;इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील  या विधानाची सत्यताच प्रश्नांकित व्हावी असे सामाजिक वर्तन मागील काही वर्षात  दिसून येत आहे. हा देश स्वतंत्र झाला कि निव्वळ राजकीय , आर्थिक व न्यायिक बाबतीत सत्तांतर घडून आले ? असा प्रश्न मनात येतो.सत्तांतर म्हणण्यामागे या क्षेत्रातील इंग्रजाळलेली विचारधारा आहे. राजकीयदृष्ट्या निर्णय घेताना आजही इंग्रज राजवटीतील प्रक्रिया अवलंबली जात आहे.प्रशासनात जबाबदारीचे तत्व लागू करण्यात आपण अयशस्वी ठरत आहोत.आजही आपली न्यायव्यवस्था आंधळी बनून राहिली आहे.ज्या न्याय व्यवस्थेने जनरल डायर ला जालियानवाला बाग हत्याकांडातून निर्दोष मुक्त केले ,तीच न्यायव्यवस्था सलमान खान ला देखील निर्दोष मुक्त करते. कायद्यासमोर सर्वजण समान असतात;काहीजण अधिक समान असतात.या विधानाची प्रचिती आजही वारंवार येतच राहते.भारतीयत्वाचा ठसा असणारी  डोळस न्यायव्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही.न्याय देवता आंधळी असणे हे इंग्रजांचा फायद्याचे होते ;भारतीयांच्या नव्हे.इंग्रजांचे अंधानुकरण व अनुकरणप्रीयता हा आपला स्थायीभाव देशहिताला घातक ठरतोय.
                    जी बाब धोरणकर्त्यांची तीच आपल्या नागरिकांची.  स्वतंत्र देशातील नागरिकांप्रमाणे भारतीय नागरिक कोणत्याही  घटनेला प्रतिसाद देत नाहीत हे वारंवार दिसून येत आहे.इंग्रज कालावधीतील भारतीय नागरिकांचे वर्तन व सध्यस्थितील वर्तन यांमध्ये  खूपच साम्य आढळते. इंग्रज कालावधीत सरकारी व्यवस्था खीळखिळी करण्याकडे आंदोलनकर्त्या  भारतीय नागरिकांचा कल असायचा.आजही आपण सरकारी यंत्रणेला जेरीस आणून मागणी मान्य करण्याकडेच  अधिक वेळा झुकतो. ही मागणी मान्य करून घेत असताना त्या विशिष्ट समुदायामध्ये देखील  दोन विचारप्रवाह प्रकर्षाने जाणवतात.ते म्हणजे मवाळ  व जहाल विचार प्रवाह.प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या प्रारंभिक स्थितीत हा मवाळ  गट प्रभावी राहतो. अर्ज,निवेदने,उपोषण या मार्गाने या मवाळ गटाचे प्रयत्न सुरु असतात.या कालावधीत जहाल विचारसरणीचे  लोक काहीसे सुप्तावस्थेत राहतात . मात्र मवाळ गटाच्या प्रयत्नांना प्रशासनाचाही मवाळ प्रतिसाद पाहून मग हा जहाल गट अधिकच सक्रीय होतो अन जाळपोळ,बंद,दंगल अशा मार्गांचा अवलंब करून आपली मागणी पुढे रेटण्याचा आक्रमक प्रयत्न करतो.आश्चर्याची  बाब अशी कि भारतीय प्रशासन देखील या जहाल विचारसरणीला तात्काळ प्रतिसाद देते.पुढे जाऊन हा प्रश्न सुटलाच तर मग जहाल विचारांनीच प्रश्न सुटतो हा संदेश समाजात जातो.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जाट समुदायाचे आंदोलन.जाट समुदायाच्या आरक्षण संदर्भातील  आंदोलनाचा प्रवास देखील याच दिशेने सुरु आहे.आपल्या स्वातंत्र्य लढ्याकडे ही नजर टाकली तर हीच पद्धत अवलंबल्याचे दिसून येते.स्वातंत्र्य मिळवण्याचा अखेरचा हल्ला म्हणूनच ‘चले जाव’ चा एल्गार महात्मा गांधीजीनी पुकारला होता.

                        मात्र जहाल विचारसरणीचा गट हा देश  स्वतंत्र आहे  हेच विसरतो असे वाटते. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सार्वजनिक मालमत्तेची हानी करताना देखील जहाल गट सिलेक्टिव्ह होता.इंग्रज सरकारच्या मोक्याच्या ठिकाणांना ते लक्ष करत असत.जेणेकरून भारतीय नागरिक वा इंग्रज सेवेतील भारतीयांना त्रास होवू नये.त्यावेळी  राष्ट्र भावना अधिक प्रबळ होती.इंग्रज कालखंडात भारतीय नागरिकांनी बहिष्कार घातला  तो इंग्रजांच्या विदेशी कपड्यांवरच. मात्र आजही आपण आपल्याच सरकारी मालमत्तांचे नुकसान करत राहतो.एसटी गाड्यांच्या काचा फोडताना या आपल्याच देशाच्या गाड्या आहेत व या आपल्याच सोईसाठी आहेत हे विसरूनच आपण उग्र वर्तन करतो. आपण राष्ट्रभावना  विसरत चाललो आहोत असे वाटते. जाट समुदायासारख्या  उग्र आंदोलनाने आपण आपल्याच पायावर दगड मारून घेत आहोत.भारतासारख्या विकसनशील देशाचे विकसित देशात रुपांतर न  होण्यास आपले वर्तन कारणीभूत ठरतेय का? याचा विचार  करूया. या देशाच्या प्रगती मधील अडथळे आपणच आहोत. आपले जनजीवन विस्कळीत करण्याचे काम आपणच करत आहोत.आपल्यातील भारतीयपणा हरवत आहे असे वाटते.जाट समुदायाच्या आंदोलनकर्त्यांनी दिल्लीकरांचे पाणी अडवणे ही कृती याच मानसिकतेचे दर्शक आहे.अन हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लष्कराला यावे लागणे ही तर त्याहून मोठी  शोकांतिका  मानावी लागेल. शत्रू  सैन्यावर गोळीबार करत  सीमेचे रक्षण करण्याऐवजी आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याची वेळ लष्करावर यावी हे आपल्या  राजकीय यंत्रणेचे अपयश आहे. जगातील किती देशातील लष्कराला आपल्याच देशातील नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले जात असावेत ? याचा विचार राज्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे.आपली मागणी मान्य करण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करताना  आपण निरपराध  भारतीय नागरिकांचा बळी   का घेतो  ? या कृत

No comments:

Post a Comment