THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 4 February 2017

रजेचा अर्ज नसला तरी रजा मंजुरच होणार

*_सी.एल रजा बाबतीत नविन नियम_*
सरकारी ,निम सरकारी ,खाजगी शिक्षक  अधिकारी कर्मचारी याच्या यांच्या सेवार्थ.

रजेचा अर्ज नसला तरी रजा मंजुरच होणार ...............
-  CL रजा Casual leave या शब्दांचे मराठी भाषांतर नैमितिक रजा किंवा किरकोळ रजा असे केले जाते. Casual म्हणजे निर्हेतुक (unintentional) अनपेक्षित (unexpected) अपघाती (accidental) असा अधिकारी कर्मचार्याच्या आवाक्याबाहेर तसेच निकडीच्या वेळी काढावी लागणारी रजा असे या रजा प्रकारचे वर्णन करता येईल. मात्र ही रजा साधारणपणे एका वेळी तीन दिवसांहून जास्त दिवस घेता येणार नाही. *केवळ अपवादात्मक परिस्थितीतच दहा दिवसा पर्यंत नैमितिक रजा (CL) वाढविता येईल. काही कार्यालयात अतिनिकडीच्या, अतिमहत्वाच्या वा आकस्मिक कामासाठीही काढलेली किरकोळ रजा नाकारून ती बिनपगारी (LWP- Leave without pay) करण्याचा  प्रकार आढळतो.*

                        रजेचा अर्ज नाही, रजा आधी मजुर करून घेतली नाही,  इत्यादी कारणावरून नैमितिक रजा(CL) बिनपगारी (LWP- Leave without pay) करणे हे कायदा नियमातील तरतुदीना सोडून होणार आहे. *_सेवाशर्ती नियम 16 (1)(2) व (4) यामधील सविस्तर तरतुदी एकत्रितरीत्या वाचल्यानंतर अधिकारी, कर्मचारी यांची किरकोळ रजा नामंजुर करणे, नाकारणे अथवा रद्द करणे याचा अधिकार कायदा नियमामध्ये कुठेच मिळालेला नाही._*  त्यामुळे नैमितिक रजा(CL) प्रसंगी अर्ज नसला तरीही नाकारता येणार नाही किंवा बिनपगारी (LWP) करता येणार नाही.

No comments:

Post a Comment