THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 17 February 2017

शेगांवीला प्रगटण्यापूर्वीचे ब्रह्मअवातार!! श्री गजानन महाराज

🌿शेगांवीला प्रगटण्यापूर्वीचे ब्रह्मअवातार!! श्री गजानन महाराज !!🌿

श्री प्रगट झाले , पण शेगावला येण्याअगोदर श्री कुठे होते ? ते कुठून आणि कसे आले ? या संबंधीचे वर्णन दासगणूंनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात ही नाही . परंतु कै. श्री . तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी १९५७ मध्ये लिहिलेल्या पोथीत यासंबंधीचे वर्णन सापडते. श्री. तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी १९५७ मध्ये लिहिलेल्या पोथीत श्रींचे शेगावचे प्रगट होण्याचे वर्ष २३ फेब्रुवारी १८७८ सांगितले आहे .इतिहासाच्या आणि प्रमाणाच्या आधारावर विचार केला तर श्री. नागलकर यांनी लिहिलेली माहिती अगदी तंतोतंत जुळते . श्री गजानन महाराज शेगावला येण्याअगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले , असे नागलकर सांगतात . अक्कलकोटला स्वामी समर्थ १८५७ मध्ये प्रगट झाले आणि १८७८ मध्ये स्वामी समर्थानी समाधी घेतली . स्वामी समर्थ हे ३० वर्षे अक्कलकोटला राहिले. या काळात त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी अनेक चमत्कार केले . अशा अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले . स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली , सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले . दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत . अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपल्या समाधीची त्यांना जाणीव क़रून दिली. इ.स. १८७८  ला स्वामींनी समाधी घेतली . त्यानंतर बाल गजाननास स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली . त्यावेळी स्वामींनी प्रगट होऊन बाल गजाननास दर्शन दिले व नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर , तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले . त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले .दोन्ही संतांची भेट झाली .त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले .देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा . तू विसरू नको . त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली . त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले . त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करुन लाड कारंजा या गावी आपल्या घरी शुक्रवारी , १८ डिसेंबर १८८५ ला आणले . येथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे , अलंकार व भेटवस्तू देऊ लागले . बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे , अलंकार सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिरामबाबांजवळ आले व ४- ५ दिवस तेथे राहिले . गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली . या दिवसात गजानन महाराज आणि मणिरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे .या चर्चेच्यावेळी मणिरामबाबांनी संत गजाननास आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्यास सांगितले . त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले . दोघांनीही अंतर्न्यानाने परस्परांना ओळखले . गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले कि, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थाजवळ होतो .त्यांच्या आज्ञेंवरून आपल्याकडे आलो आहे . रविवार माघ शुद्ध पोर्णिमा २८ जानेवारी १८८८ ला आपण समाधी घेणार असल्याचे नरसिंग महाराजांनी गजाननास सांगितले . तू माझे किर्याकर्म करून ३ फेब्रुवारी १८८८ ला शेगांवला भक्तांचा उध्दार करण्याकरिता जा. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिध्दीप्राप्ती शिकविली व आपल्या काही शक़्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशाप्रकारे गजानन महाराज नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगांवला आले . -

ll जय गजानान ll गण गण गणात बोते ll

No comments:

Post a Comment