THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday 19 June 2019

🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳
       💡सी.व्ही.रमन💡
🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳🐳

🔹पूर्ण नाव--चंद्रशेखर वेंकट रामन
🔹जन्म-नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भार🔹 मृत्यू-नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
🔹निवासस्थान-भारत
🔹 नागरिकत्व-भारतीय
🔹राष्ट्रीयत्व-भारतीय
🔹धर्म-हिंदू
🔹कार्यक्षेत्र-भौतिकशास्त्र
🔹कार्यसंस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण-प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
🔹डॉक्टरेटकरता विद्यार्थी-जी.एन्‌. रामचंद्रन्‌
🔹ख्याती-रामन् परिणाम
🔹पुरस्कार-भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
🔹वडील-चंद्रशेखर अय्य
🔹 आई-पार्वती
🔹पत्नी-लोकासुंदरी
🔹अपत्ये-चंद्रशेखर, राधाकृष्णन

चंद्रशेखर वेंकट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१,१९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

🍀जीवन

रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगलोरातही होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

🌔संशोधन🌔

त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चेभौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

🌷सन्मान

चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

सर सी.व्ही रामन यांच्या नावाने रँचो (रिसर्चर्स ॲन्ड नॅचरली क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन) नावाची पुण्याची संस्था इ.स. २०११ सालापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ’सर सी.व्ही. रामन पुरस्कार’ देत असते. २०१५ सालच्या पुरस्काराचे मानकरी :
१. डॉ. आदित्य अभ्यंकर (वैद्यकीय तंत्रज्ञान)
२. कुरियन अरिंबूर (ऑटोमोबाईल)
३. राजेंद्र चोडणकर (नॅनो तंत्रज्ञान)
४. प्राची दुबळे (आदिवासी संगीत)
५. सुधीर पालीवाला (कचरा व्यवस्थापन)
६. रमेश बोतालजी (सांडपाणी व्यवस्थापन) ॑॑
💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡

No comments:

Post a Comment