THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 1 October 2018

विभागांची पाहणी करणार आहेत .


   सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांची पाहणी करणार आहेत .
     शासनाकडून सुरू असलेल्या विविध योजनेंची कार्यवाही योग्य रितीने झाली किंवा नाही याची पाहणी त्या - त्या ठिकाणी जावून केली जाणार असल्याने आपण आपल्या शाळेतील खालील बाबींवर तात्काळ कार्यवाही करावी .
(१) शालेय पोषण आहार - ( मागील  किमान सात वर्षाचे रेकॉड अध्यावत ठेवावे )            * बचत गट नाव व स्वंयपाकि , मदतनिस यांचा मध्यान्न भोजन शिजवण्यासाठी smc सोबत केलेला करार प्रत.
* स्वंयपाकि व मदतनिस यांचे वैदयकिय प्रमाणपत्र.
* किचन शेड मधील स्वच्छता .
*तांदूळ ठेवलेली खोलीची स्वच्छता .
* किचन शेड वर शापोआचा लोबो पेंट करणे .
* साठा नोंद वही व त्याप्रमाणात साठा ( तांदूळ ) .
* चव राजिस्टर अध्यावत व मागील .
* मेनू चार्ट व त्या प्रमाणे नोंदवहीत नोंदी .
* या शैक्षणिक वर्षातील मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यानी पाठवलेले साप्ताहिक मेनू बाबतचे पत्र व त्या प्रमाणे कार्यवाही .
*पास बुक ,व्हाऊचर फाईल , चेक बुक स्थळ प्रत .
* विदयार्थी हजेरी ( दैनिक आकडे वही )
* बचत गटास दिलेले मानधन व्हाऊचर व चेक स्थळ प्रत
* व इतर संबधीत रेकॉर्ड
(2) मोफत पाठयपुस्तक व हस्तपुस्तिका - (किमान मागील सात वर्ष )
* वर्षनिहाय पाठयपुस्तक प्राप्त व वाटप अहवाल ठेवावा .
(3) गणवेश - ( किमान 5 वर्ष )
* ठेकेदार नाव / पत्ता
* निविदा व निविदा मंजूरी smc ठरावासह
* चेक स्थळ प्रत , व्हाऊचर फाईल
* लाभार्थी यादी , गणवेश मिळाल्याची पालकांची स्वाक्षरीचे रजिस्टर .
(4) SSA विविध अनुदान -
* अध्यावत पासबुक मधील नोंदी
* खर्चाबाबत smc ठराव .
* खर्चाचे व्हाऊचर .
(5) गुणवत्ता बाबत-( मागील 2 वर्ष )
* पायाभूत चाचणी , संकलित चाचणी 1 व 2 उत्तरपत्रिका , गुण दाण तक्ते .
(6) अध्यावत विदयार्थी हजेरी
(7) वर्ग सजावट , शैक्षणिक साधने , तंत्रज्ञान विविध साहित्य
( 8) लोक सहभाग प्राप्त साहित्य व इतर बाबी .
(9) विविध समित्या शालेय स्तरावर स्थापन केले बाबत समिती सदस्यांच्या नावाचे तक्ते लावणे .
(10) शिष्यवृत्ती - शाळा पातळीवर लाभार्थी विदयार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती वाटप होते . याबाबतचे राजिस्टर विदयार्थी / पालक यांच्या स्वाक्षरी सह      अध्यावत ठेवावे .
    पंचायत राज समितीच्या अनुशंगाने आपल्या शाळेतील उपरोक्त बाबींची व या व्यतिरिक्त असलेल्या बाबींची पूर्तता करण्यात यावी .
       

No comments:

Post a Comment