सर्दी-पडसे, खोकला झटपट दूर करण्याचे 15 घरगुती रामबाण उपाय
बदलत्या वातावरणामुळे सर्दी-पडसे, खोकला होणे ही सामान्य समस्या आहे. थोडासाही हलगर्जीपणा किंवा इम्यून सिस्टीम (प्रतिकारशक्ती) कमी झाल्यास या आजारांचा सामना कोणालाही करावा लागू शकतो. तुम्हालाही बदलत्या वातावरणामुळे सर्दी-पडसे झाले असेल तर येथे जाणून घ्या, या आजाराला झटपट दूर करण्याचे खास घरगुती उपाय....
1. हरभरे-फुटाणे गरम करून यांचा वास घेतल्यास सर्दी दूर होण्यास मदत होते.
2. निलगिरीच्या तेलाची वाफ घेतल्यास सर्दीमध्ये लवकर आराम मिळेल
3. तुळस आणि अद्रक टाकलेला चहा प्यायल्यास लाभ होईल
4. गरम दुधामध्ये पेंडखजूर उकळून त्यामध्ये थोडीशी विलायची टाकून सेवन केल्यास सर्दी-ताप लवकर ठीक होईल.
5. एक चमचा गरम शुद्ध तुपामध्ये काळी मिरीचे चूर्ण टाकून पोळीसोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळेल.
6. गुळामध्ये काळी मिरीचे थोडेसे चूर्ण टाकून हे मिश्रण पाण्यात टाकून उकळून घेतल्यास सर्दी-ताप ठीक होईल.
7. मोहरीचे तेल थोडेसे गरम करून छाती, पायांचे तळवे आणि नाकाला लावल्यास सर्दीमध्ये आराम मिळेल.
8. दीड चमचा बडीशेपची वाफ घ्यावी. त्यानंतर थोडे पाणी प्यावे. त्यानंतर लगेच गरम दुध प्यावे. या उपायाने सर्दीमध्ये लगेच आराम मिळेल.
9. मनुक्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.
9. मनुक्यांची पेस्ट बनवावी. त्यामध्ये थोडी साखर टाकून उकळून थंड होण्यासाठी ठेवावी. रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा हे मिश्रण घेतल्याने सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते.
10. अद्रकाच्या तुकड्यांचा काढा 20 मिली ते 30 मिली दिवसभरातून 3 वेळेस घेतल्यास सर्दीच्या त्रासापासून आराम मिळतो.
11. जर तुमचे नाक सर्दीमुळे बंद झाले आहे तर, दालचीनी, काळी मिरी, विलायची आणि जिरे एकत्र करून एका सूती कपड्यात बांधून त्याचा वास घेतल्याने आराम मिळेल. असे केल्याने तुम्हाला शिंक येण्यास मदत होईल आणि तुमचे बंद झालेले नाक मोकळे होईल
12. हळद आणि सुंठ चूर्णाचा लेप कपाळाला लावल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.
13. एक ग्लास गरम पाण्यात लिंबाच्या रसासोबत एक चमचा मध एकत्र करावे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
14. मधासोबतच आले सकाळ संध्याकाळ खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून लवकर आराम मिळतो.
15. गरम दूधात एक चमचा हळद टाकून पिल्यास कफ कमी होतो.