THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 14 June 2018

सरल स्टाफ

 स्टाफ


teaching details
 (संदर्भ- प्रदीप भोसले हवेली पुणे ) 


आता आपण teaching details मध्ये कशा प्रकारे माहिती भरावयाची आहे हे सविस्तरपणे पाहूया 

सर्वप्रथम Teaching Staff या मुख्य Tab ला क्लिक करून Teaching Details या subtab ला क्लिक करा.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.



Taeching Staff ला क्लिक केल्यावर आपणास पुढील स्क्रीन दिसून येईल.


वरील स्क्रीन मध्ये Select Staff या Option मध्ये क्लिक करून ज्या कर्मचाऱ्याची माहिती भरावयाची आहे त्या कर्मचाऱ्यास select करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

वरील स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या एका कर्मचाऱ्यास select करून घ्यावे आणी शेजारी असलेल्या Submit या बटनास क्लिक करावे.


Submit या बटनास क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.

Submit या बटनास क्लिक केल्यावर आपणास डाव्या बाजूला विविध Tab असलेली खालील एक स्क्रीन पहावयास मिळेल.





वरच्या स्क्रीन मध्ये दाखवलेल्या विविध Tab विषयी सदर कर्मचाऱ्याची माहिती आपणास भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.आता आपण एक एक Tab विषयी माहिती बघूया.

सर्वप्रथम Personal Details या tab ला क्लिक केल्यावर आपणास खालील subtab असलेली एक स्क्रीन पहावयास मिळेल.



Personal Details मधी असलेली Basic and Current Posting या sub-tab ला क्लिक करा.त्यानंतर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.


      वरील स्क्रीन मधील एक एक मुद्यानुसार काय काय माहिती भरावयाची आहे ते पाहू.

    Staff ID : या tab समोर एक Staff ID आपणास त्या कर्मचाऱ्यास system कडून दिला जातो.हा ID त्या कर्मचाऱ्यास system कडून कायमस्वरूपी दिला जातो,जो पुन्हा अन्य कर्मचाऱ्यास दिला जात नाही.
Staff Name :  ज्या कर्मचाऱ्याची माहिती आपणास भरावयाची आहे त्या कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव आपणास या अठीकानी आलेले दिसून येते.या अनावात काही बदल करावयाचा असेल तर आपण update by headmaster या सुविधेमध्ये जाऊन बदल करू शकतो.
Date Of Birthday : या मध्ये आपणास कर्मचाऱ्याची जन्मतारीख दिसून येईल.ही जन्मतारीख  चुकलेली असले असे लक्षात आले तरी आपणास येतेह edit करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.जर जन्मतारीख बदल करावयाचा असेल तर ही सुविधा गटशिक्षणाधिकारी यांच्या login ला दिलेली आहे.
Gender : या मध्ये आपणास कर्मचारी हा स्री आहे की पुरुष आठवा अन्य  हे नमूद करावयाचे आहे हे लक्षात घ्यावे.
Date of Entry in Service : या मध्ये आपणास Date of Entry in Service  म्हणजेच नोकरीला लागल्याची प्रथम नेमणूक तारीख भरावयाची आहे.ही भरत असताना आपणास सेवा आरंभ तारीख भरावयाची आहे.
   Date of Joining Current Mgmt : येथे कर्मचाऱ्याने सध्याच्या post च्या management मध्ये सेवा सुरु करण्याची तारीख नमूद कारवायांची आहे.यासाठी खालील काही सूचनांकडे लक्ष द्यावे.
   
     १) जर आपण पहिल्यापासून एकाच management मध्ये सेवा करत असाल तर आपले date of joining आण Date of Joining  Current Mgmt तारीख ही सारखीच असेल.

    २) जर कर्मचारी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असेल आणी आंतर जिल्हा  बदलीन पुन्हा जिल्हा परिषद शाळेतच                 रुजू झालेला असेल तर अशा कर्मचाऱ्याची date of joining  व Date of Joining  Current Mgmt या वेगवेगळ्या असतील.अशा केस मध्ये Date Of Joining ही आपल्या नोकरीची प्रथम नेमणूक दिनांक असेल आणि Date Of Joining Current Management ही सध्याच्या Zp मध्ये रुजू झालेली तारीख असेल. हे लक्षात घ्यावे.कारण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद ही एक स्वतंत्र  management आहे हे लक्षात घ्यावे.त्यामुळे आंतर जिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत joining date व current management date ही वेगवेगळी असेल.
  
    ३)जर कर्मचारी खाजगी अनुदानित अथवा  अन्य कोणत्याही management मधून जिल्हा परिषद या                       management मध्ये बदलीने अथवा सामायोजणाने आलेला असेल तर अशा परिस्थितीत अशा कर्मचाऱ्याच्या       बाबतीत या दोनी तारखा वेगवेगळ्या असतील हे लक्षात घ्यावे कारण आता या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत management मध्ये बदल झालेला आहे.
  
     ४) आधीच्या सेवेतून राजीनामा देऊन आलेला कर्मचारी आताच्या नविन सेवेत असेल आणि माहिती भरत असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत आधीच्या सेवेचा कोणताही तपशील येथे भरू नये.
      Current Posting Details : या शिर्षकासमोर आपणास  Current Posting  संदर्भात माहिती भरावयाची आहे.खालील माहितीचा अभ्यास करू.
      
  Current Post/Designation : या मध्ये आधीच दिसत असलेले पद हे आपण update by headmaster या माहितीमध्ये select केले ले पद असते.या मध्ये या स्क्रीन मधून कोणताही बदल करता येत नाही.जर हे पद चुकलेले आहे असे वाटत असेल तर आपणास update by headmaster या माहितीमाधेय पुन्हा जाऊन हे पद update करावे लागेल तेंव्हाच या मध्ये बदल होईल हे लक्षात घ्यावे.

  Date of Joining Current Designation : वर उल्लेख केलेल्या पदावर कर्मचारी कोणत्या तारखेपासून सेवेत आहे ती तारीख येथे नमूद करणे अपेक्षित आहे.सध्या असलेल्या पदावर कर्मचारी प्रमोशन ने आलेला असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत date of joining आणिDate of Joining  Current Mgmt या तारखा वेगवेगळ्या असेल हे लक्षात घ्यावे.जर कर्मचाऱ्याचे अद्याप प्रमोशन झालेले नसेल म्हणजेच सुरुवातीपासून आहे त्या पदावरच अद्याप देखील असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत या दोन्ही तारखा सारख्याच असेल.

  Current Posting Mode : कर्मचाऱ्याची सध्याच्या पदावर कोणत्या पद्धतीने नियीक्ती झालेली आहे त्याबाबत तपशील नोंदणे अपेक्षित आहे.यासाठी त्या पुढे दिलेल्या बटनावर क्लिक केल्यास आपणास खालील तपशिलाची यादी दिसून येईल.या पैकी योग्य तो तपशील नोंदवून घ्यावा.अभ्यासासाठी खालील तपशील पहावे.
उदा., जर कर्मचारी आहे त्या पदावर अद्याप पर्यंत काम करत असेल म्हणजेच अद्याप कोणतेही प्रमोशन झालेले नसेल तर अशा कर्मचाऱ्याने Join New Service हा तपशील निवडावा.
जर कर्मचारी सहशिक्षक या पदावरून पदवीधर शिक्षक या पदावर काम करत असेल तर अशा परिस्थितीत अशा कर्मचाऱ्याने One Stape upgradation या तपशिलाची नोंद करावी.
जर कर्मचारी हा शिक्षक या पदावरून मुख्याध्यापक या पदावर प्रमोशन होऊन काम करत असेल तर अशा परिस्थितीत प्रमोशन हा तपशील निवडावा.जर असा कर्मचारी आहे त्याच office मध्ये प्रमोशन घेऊन काम करत असेल तर pramotion (same office) हा तपशील निवडावा.आणि जर कर्मचारी शिक्षक या पदावरून मुख्याध्यापक या पदाचे प्रमोशन घेऊन दुसऱ्या शाळेत अथवा office मध्ये काम करत असेल तर pramotion (with transfer) हा तपशील निवडावा.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.


  Shikshan Sevak(Prob.)? : कर्मचारी सध्या शिक्षण सेवक असेल तर अशा बाबतीत yes ला क्लिक करावे.जर yes ला क्लिक केले तर End of Term of Appoinment ही tab आपणास आपोआप दिसून येईल, अन्यथा ही tab दिसणार नाही.तेथे कर्मचाऱ्याने आपले शिक्षण सेवक कालावधी संपण्याची तारीख नोंदवावी.ही तारीख Date of Entry in Service या तारखेपेक्षा ३ वर्षाएवढी अथवा त्यापेक्षा अधिक असावी.अद्याप शिक्षण सेवक पूर्ण नसणाऱ्या कर्मचाऱ्याने देखील येथे शिक्षण सेवक पूर्ण होण्याचा कालावधी Date of Entry in Serviceपासून तीन वर्ष पूर्ण होईल ती तारीख जी असेल ती नोंदवावी.जर कर्मचारी शिक्षण सेवक नसेल तर मात्र no ला क्लिक करावे.
Date of Joining District : सध्या ज्या जिल्ह्यात कर्मचारी सेवा करत असेल त्या जिल्ह्यात सेवा सुरु झाल्याची तारीख नोंदवणे अपेक्षित आहे.जिल्हा बदली झालेल्या कर्मचाऱ्याने आताच्या जिल्ह्यात सेवा सूरु झाल्याची तारीख नोंदवावी.पूर्वीच्या जिल्ह्याची तारीख येथे नोंदवू नये.ही तारीख Date of entry in service एवढी किंवा त्या पेक्षा अधिक असावी.

  Date of Joining Block : सध्या ज्या तालुक्यात कर्मचारी सेवा करत असेल त्या तालुक्यात सेवा सुरु झाल्याची तारीख नोंदवणे अपेक्षित आहे.ही तारीख Date of Joining Districtएवढी किंवा त्या पेक्षा अधिक असावी.

  Date of Joining School : सध्या ज्या शाळेत कर्मचारी सेवा करत असेल त्या शाळेत सेवा सुरु झाल्याची तारीख नोंदवणे अपेक्षित आहे.ही तारीख Date of Joining District/block एवढी किंवा त्या पेक्षा अधिक असावी.

  Appoinment Order : येथे कर्मचाऱ्याची Appoinment Order ही स्कॅन करून upload करणे अपेक्षित आहे.परंतु सध्या ही सुविधा बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे पुढील सुचना येईपर्यंत Appoinment Order upload करू नये.

  Individual Approval : येथे कर्मचाऱ्याची Individual Approval order ही स्कॅन करून upload करणे अपेक्षित आहे.परंतु सध्या ही सुविधा बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे पुढील सुचना येईपर्यंत Individual Approval upload करू नये.
Pay Details

Pay Details या बटनाला क्लिक केल्यास आपणास खालील फॉर्म दिसू येईल.


वरील फॉर्म मधील एक एक बाबीचा अभ्यास करू.

  Pay Commission : या बटनासमोर असणाऱ्या drop down box ला क्लिक केल्यावर आपणास खालील पर्याय दिसून येतील.सदर पर्याय केंव्हा निवडावे याविषयी आता माहिती पाहूया.

  Consolidated pay : शिक्षण सेवक अथवा ज्या कर्मचाऱ्यांचे पगार हे कोणत्याही pay Commission  नुसार नसून ठोक पद्धतीने दिले जाते अशा कर्मचाऱ्यानी हा पर्याय निवडावा.

  Sixth pay Commission  (state) : राज्य शासनाच्या Sixth pay Commission   नुसार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा पर्याय निवडावा.

  Sixth pay Commission  (central) : केंद्र शासनाच्या Sixth pay Commission   नुसार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा पर्याय निवडावा.
  Fifth  pay Commission  (state) : राज्य शासनाच्या Fifth pay Commission   नुसार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा पर्याय निवडावा.
  Pay Scale : कर्मचाऱ्याने वरच्या tab मध्ये म्हणजेच Pay Commission tab मध्ये जे Pay Commission निवडले असेल त्या नुसार या pay scale च्या tab मधील drop down box मध्ये पर्याय उपब्ध होतील.त्या पैकी आपणास लागू असलेला pay scale चा पर्याय निवडावा. Consolidated pay या Pay Commission साठी मात्र  Consolidated pay हा एकच पर्याय उपलब्ध आहे.म्हणजेच Consolidated pay साठी pay scale नसते हे आपल्या लक्षात आलेले असेलच.

  Pay in Band : जर कर्मचाऱ्याने विशिष्ट pay scale निवडले तर pay in band व Grade pay हे पर्याय उपलब्ध होतात.pay in band मध्ये आपल्या वेतनाचा pay in band येथे नमूद करावा.

  Grade Pay : जेंव्हा एखादे pay scale निवडले जाते तेंव्हा Grade pay समोर आपोआप system द्वारे Grade pay नमूद केले जाते.या ठिकाणी आपणास स्वतः काहीही नमूद करावयाची आवशकता नाही हे लक्षात घ्यावे.

  Basic Pay : या पर्यायासमोर system कडून Pay in Band व Grade Pay ची बेरीज करून आपले Basic Pay नमूद केले जाते.या मध्ये कर्मचाऱ्याने स्वतः काहीही भरावयाची आवशकता नाही आहे हे लक्षात घ्यावे.

  Pay w.e.f. Date : या रकान्यासमोर कर्मचाऱ्याचे वर उल्लेख केलेले वेतन ज्या तारखेपासून ठरवण्यात आलेले आहे ती तारीख येथे नमूद करणे अपेक्षित आहे.w.e.f. म्हणजे with effective date होय.जिल्हा परिषद कर्मचारी यांची ही तारीख बहुधा प्रत्येक वर्षाची ०१ जुलै हीच असते.

  Received Senior Grade Scale : या पर्यायासमोर कर्मचाऱ्यांस जर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली असेल तर ही yes ला टीक मार्क करावे आणि त्यासमोर ती वेतन श्रेणी मिळाल्याची तारीख नोंद करावी.ही वेतन श्रेणी कर्मचाऱ्यास सेवेच्या १२ वर्षानंतर मिळते.त्यामुळे जरी १२ वर्ष होऊन गेल्यानंतर कर्मचाऱ्याने ही श्रेणी मिळण्याकरिता द्यावा लागणारा प्रस्ताव उशिरा दिला असेल आणि वेतन श्रेणी ही १२ वर्षापेक्षा अधिक कालावाधी नंतर मिळालेली असेल तरीही या ठिकाणी मात्र सेवा सुरु झाल्याच्या तारखेपासुनची १२ वर्ष पूर्ण झाल्याची तारीख नोंदवावी.

  Received Selection Grade Scale : या पर्यायासमोर कर्मचाऱ्यांस जर निवड वेतन श्रेणी मिळाली असेल तर ही yes ला टीक मार्क करावे आणि त्यासमोर ती वेतन श्रेणी मिळाल्याची तारीख नोंद करावी.ही वेतन श्रेणी कर्मचाऱ्यास सेवेच्या २४ वर्षानंतर मिळते.त्यामुळे जरी २४ वर्ष होऊन गेल्यानंतर कर्मचाऱ्याने ही श्रेणी मिळण्याकरिता द्यावा लागणारा प्रस्ताव उशिरा दिला असेल आणि वेतन श्रेणी ही २४ वर्षापेक्षा अधिक कालावाधी नंतर मिळालेली असेल तरीही या ठिकाणी मात्र सेवा सुरु झाल्याच्या तारखेपासुनची २४ वर्ष पूर्ण झाल्याची तारीख नोंदवावी.
  PAN No. : या ठिकाणी कर्मचाऱ्याचा PAN नंबर नोंद होणे अपेक्षित आहे.
PF/DCPS Details
PF/DCPS Details या tab ला क्लिक केल्यावर खालीले स्क्रीन दिसून येते.

       कर्मचारी जर दिनांक ०१/०९/२००५ पूर्वी सेवेत लागला आला असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत Account Type या घटकासमोर असलेल्या dropdown box मध्ये आपोआप PF असा पर्याय दिसून येतो. 
Pf हा पर्याय निवड केल्यावर Account Maintained By  या मुद्यामध्ये आपण  आपले pf account कोण Maintained  करते त्या department चे नाव dropdown box मध्येselect करावे.त्यानंतर pf series select करावी.शेवटी PF Account No. ची नोंद घ्यावी.काही रिमार्क असेल तर आपण Remark या मुद्यासमोर नोंदवू शकता.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.




    कर्मचारी जर दिनांक ०१/०९/२००५ नंतर सेवेत लागला आला असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत Account Type या घटकासमोर असलेल्या dropdown box मध्ये आपोआप Dcps  असा पर्याय दिसून येतो. Dcps  हा पर्याय निवड केल्यावर Account Maintained By  या मुद्यामध्ये आपण  आपले pf account कोण Maintained  करते त्या department चे नाव dropdown box मध्ये select करावे.अर्थात DCPS साठी सध्या सर्वांसाठी Defined Contributory Pension Scheme या पर्यायाची निवड करावी.त्यानंतर Dcps  series select करावी.शेवटी Ppran number म्हणजेच DCPSAccount No. ची नोंद घ्यावी.काही रिमार्क असेल तर आपण Remark या मुद्यासमोर नोंदवू शकता.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.


GIS Details 


GIS या Tab ला क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येते.



आपण आता एक एका घटकाची सविस्तर माहिती पाहू.


  GIS Applicable : वरील स्क्रीन मध्ये GIS Applicable या मुद्यासमोर system द्वारे State GIS असे दिसून येते.या ठिकाणी आपणास काहीही भरावयाची आवशकता नाही.

  Current GIS Group : या मुद्यासमोर आपण आपल्या GIS ग्रुपची माहिती लिहावी.आपला GIS ग्रुप कोणता आहे हे नोंदवावे.या मध्ये A पासून ते D पर्यंत ग्रुप दिसून येतील.योग्य तो ग्रुप निवडून घ्यावा.

No comments:

Post a Comment