THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 30 June 2018

यंदा ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात.

यंदा ४ थी व ५ वीत शिकत असलेले माझे विद्यार्थी इंग्रजी विषयाचा अभ्यास पुढीलप्रमाणे करतात.

१.सम्बंधित इयत्तेतील सर्व विद्यार्थी त्या इयत्तेचा शब्दकोष (Reader) व पाठ्यपुस्तक घेवून चटईवर गट करून वर्तुळाकार बसतात.(प्रत्येक वर्गाची पटसंख्या सरासरी 6-7 अशी असल्याने प्रत्येक इयत्ता म्हणजे एक गट सहज बनतो)

२.पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाचे वाचन करतात.

३.पाठाचे पूर्ण वाचन झाल्यानंतर परत एक एक वाक्य वाचून त्यातील अर्थ न समजलेले शब्द शब्द्कोशात शोधतात.

जे शब्द त्यांच्याजवळील शब्द्कोशात नसतील ते वहीत तक्त्याच्या स्वरूपात (word board activity) लिहितात व त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी माझ्याकडे येतात.

४.Word board मधील शब्दांचा अर्थ माझ्याकडून समजून घेतल्यानंतर वहीत लिहून घेतात. या व शब्द्कोशातील शब्दांच्या अर्थांच्या आधारे पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ स्वतः लावतात व मला सांगतात...जिथे चुक झाली तिथेच शक्यतो त्यांच्याच मदतीने दूर करण्याचा माझा प्रयत्न असतो...आणि अनुभव असा आहे की मुलेच परस्परांच्या मदतीने चुक दुरुस्ती करून घेतात...क्वचितच ते याकामी माझी मदत घेतात.

५.पाठातील प्रत्येक वाक्यांचा अर्थ सांगून झाल्यानंतर परत सबंध पाठ वाचून काढतात...व पाठाचा समग्र आशय कथन करतात.


गतवर्षी या विद्यार्थ्यांना हसत खेळत ताणविरहित वातावरणात gramatical sentence constructions सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यनिर्मितीचा सराव करून घेतला होता...त्याचे उपयोजन पाठातील वाक्यांचा अर्थ आणि एकंदरीत संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी माझे विद्यार्थी करीत आहेत असे माझे निरिक्षण आहे.

*गतवर्षी विद्यार्थ्यांनी अर्थपूर्ण  वाक्यनिर्मितीसाठी पुढील Gramatical Senetense Construction सूत्रे अभ्यासली होती.*

१.S+V1+O 
२.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O

ही सूत्रे शिकत असताना विद्यार्थ्यांना ताण येणार नाही याची पुरेपुर काळजी मी घेतली होती.याबाबत सविस्तर वर्णन पुढे दिलेले आहे.
गतवर्षी इयत्ता ३री, ४थी व ५वीच्या विद्यार्थ्यांनी एकुण इंग्रजीतील १२ Grammatical Senetense Constructions अभ्यासल्या होत्या.
हा व्याकरणाचा भाग असल्याने प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना नियमादि बाबी समजावून सांगणे तसे अवघड काम असल्याची जाणीव होतीच परंतू इंग्रजी पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ शिक्षकानेच पारम्पारिक पद्धतीने म्हणजे शब्दार्थ लिहून देवून ते मुलांना घोकंपट्टी करायला सांगणे तथा समग्र पाठाचे स्वतःच भाषांतर करून आशय कथन करण्यापेक्षा वा समजावून सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनाच स्वयंअध्ययन करून शब्दांचे अर्थ शब्दकोशातुन स्वतः शोधण्याची व तो पाठ/घटक समजून घेण्याची/समजावून सांगण्याची सवय लागली तर ते भाषा शिकण्या/समजून घेण्याच्या अंगाने अधिक परिणामकारक ठरेल असे मला वाटले व पूर्ण विचारांती इंग्रजी वाक्यरचनेची १२ सूत्रे (Sentence Construction formulae /Tenses) शिकण्यास / समजून घेण्यास व त्यायोगे वाक्यनिर्मिती करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम मी हाती घेतले.हे करत असताना व्याकरणातील कोणत्याच संज्ञांचा (SUBJECT,OBJECT, VERB इत्यादि..) उल्लेख मुद्दाम करायचा नाही असे ठरवले.शिकणं निरस व कंटाळवाणं होऊ नये हाच यामागील हेतू.

माझ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेली इंग्रजी वाक्यराचनेची १२ सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
त्यातील पाहिले सूत्र [ S+V1+O ] शिकण्यासाठी वर्गात केलेल्या प्रयत्नांचा विस्तृत उहापोह या post मध्ये करीत आहे...आपले अभिप्राय अपेक्षित आहेत.
---------------------------------------------------
Sentence construction formulae
---------------------------------------------------
१.S+V1+O 
२.S+V2+O
३.S+shall/will+V1+O
४.S+is/am/are+V4+O
५.S+was/were+V4+O
६.S+shall be/will be+V4+O
७.S+has/have+V3+O
८.S+had+V3+O
९.S+shall have/will have+V3+O
१०.S+has been / have been+V4+O
११.S+had been+V4+O
१२.S+shall have/will have+been+V4+O

यातील पहिली रचना (S+V1+O) आम्ही अशी शिकलोत.
सर्वप्रथम मुलांना माहीत असलेले मुख्य कृती/क्रियादर्शक इंग्रजी शब्द (मुख्य क्रियापदाचे पहिले रूप-V1) मराठी अर्थासह (त्यांनाच विचारून) एका खाली एक अशा क्रमाने फळ्य़ावर लिहून घेतले.

उदाहरणार्थ-
---------------
   [V1]
---------------
eat/eats ,-खातो/खाते/खातात
go/goes ,-जातो/जाते/जातात
write/writes,-लिहितो/लिहिते/लिहितात
read/reads,-वाचतो/वाचते/वाचतात
walk/walks-चालतो/चालते/चालतात
Come/comes-येतो/येते/येतात
Play/plays-खेळतो/खेळते/खेळतात
Drink/drinks-पितो/पिते/पितात
make/makes-बनवतो/बनवते/बनवतात
Take/takes-घेतो/घेते/घेतात
Cut/cuts-कापतो/कापते/कापतात
Open/opens-उघडतो/उघडते/उघडतात
Close/closes-बंद करतो/करते/करतात

मुद्दाम eat म्हणजे 'खाणे' ऐवजी 'खातो/खाते/खातात'...go म्हणजे 'जाणे' ऐवजी 'जातो/जाते/जातात' याप्रमाणे सर्व क्रियादर्शक शब्दांचे (V1s चे) अर्थ फळ्यावर लिहिलेले होते. त्यामुळे अर्थपूर्ण वाक्यनिर्मिती करणे सोपे जाणार होते कारण वाक्ये लिहिताना वा बोलताना आपण 'खाणे' किंवा 'जाणे' असे शब्दप्रयोग करीत नाही.

वरीलप्रमाणे यादी करून "ह्या सर्व शब्दांना V1 म्हणायचं"..असे सांगितले आणि शीर्षस्थानी "V1" लिहून सबंध यादी चौकटीत बंद केली...
आता वरील शब्दांच्या संदर्भाने मी काही प्रश्न मुलांना विचारले.त्यापैकी एक पुढे दिला आहे.
उदाहरणार्थ-

१.'कोण' जातो ?
....(मुलांचे उत्तर- 'मी' जातो...'तो' जातो...ती जाते...ते जातात...'रवी' जातो...आरती जाते...आम्ही जातो...)

...मग मी 'मी' साठी इंग्रजी प्रतिशब्द 'I' फळ्य़ावर लिहिला.
(अर्थातच मुलांना परिचित असलेल्या शब्दांचीच एकाखाली एक अशी क्रमवार यादी करून शीर्षस्थानी 'S' लिहिले व सबंध यादी चौकटीत बंद केली.

मुलांनी " 'कोण' जातो ? "या प्रश्नाचे उत्तरादाखल सांगितलेल्या सर्व मराठी शब्दांना इंग्रजी प्रतिशब्दांसह तयार केलेली नमुना यादी पुढे देतोय.
-------------
 *[S]*
--------------
मी-I
तो-He
ती-She
ते/त्या/ती-They
आम्ही/आपण-We
रवी-मुलाचे/माणसाचे नाव
आरती-मुलीचे/स्त्रीचे नाव

त्या
दि.

अशाप्रकारे आता फळ्यावर *'V1' व 'S'* या दोन शब्दयाद्या लिहिल्या गेल्या.

आता फळ्यावर *S+V1+O* हे सूत्र लिहिले आणि मुलांना वर लिहिलेल्या *'S' व 'V1'* च्या यादीतील शब्द या सूत्रात योग्य क्रमाने लिहायला सांगितले.
मुलांनी सुत्रातील क्रमानुसार *S व V1* च्या यादीतून योग्य शब्द निवडून अचूक वाक्यरचना केली.
पण O च्या जागी काय लिहायचे हे आधी सांगितलेले नसल्याने मुले थांबलीत..'O' म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी मी *'S+V1'* या क्रमाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या अपूर्ण वाक्याच्या अनुशंगाने एक प्रश्नावली तयार केली.त्यातील एक प्रश्न उदाहरणादाखल पुढे देतोय.

मुलांनी *[S+V1]* या शब्दक्रमाने लिहिलेले वाक्य होते.
*I go*...(मी जातो/जाते.)

मी विचारलेला प्रश्नावलीतील मराठी प्रश्न होता..."'कोठे' जातो ?"
मुलांनी विविध उत्तरे दिलीत.
उदा.शाळेत जातो/जाते.
बाजारात जातो/जाते/
कायगावला जातो/जाते...इत्यादि.

ज्यावेळी पहिले उत्तर आले 'शाळेत जातो/जाते' तत्क्षणीच मी
फळ्यावर *I go*नंतर *to school*..हा शब्दसमुह लिहिला.(to,for,at,on,in under....इत्यादि prepositions चे अर्थ वेळोवेळी कृतियुक्त अध्ययन अनुभवांच्या माध्यमातून पहिल्या सत्रातच स्पष्ट केलेले होते...याविषयी स्वतंत्र लिहिनच.)

आता फळ्या वर वाक्य लिहिले गेले...
*I go to school*....(मी शाळेत जातो/जाते किंवा शाळेला जातो/जाते.)

मग मी मुलांना विचारले,"सूत्रात बघून मला सांगा या वाक्यातील *'to school'* या शब्दसमुहाला आता तुम्ही काय म्हणाल ?"
मला अपेक्षित असलेले उत्तर मुलांकडून आले,"सर, *'to school'* हा या सुत्रातील *'O'* आहे."

इथे मुलांचे पूर्वज्ञान होते...फळ्यावरील *'S'*  *'V1'* यादीतील शब्द.
त्यामुळे सुत्राखाली लिहिल्या गेलेल्या वाक्यातील *I*(S) *go* (V1) नंतर लिहिलेला to school हा शब्दसमूह नक्कीच *'O'* असणार हे त्यांना निरिक्षणातून लक्षात आले होते.

त्यानंतर वरील वाक्यात *V1* (go)  व *O* *(to school)* कायम ठेवून केवळ' I 'बदलून S च्या यादीतील दुसरे शब्द वापरून विद्यार्थ्यांना वाक्यरचना करावयास सांगितले.
विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे वाक्ये लिहिलीत.
१.I go to school....मी लिहून दाखवलेले मुळ वाक्य.
२.He goes to school....विद्यार्थ्यांनी मी लिहिलेल्या मुळ वाक्यातील ' I ' हा *'S'* बदलून त्याजागी ' *He* ' हा *S* वापरून लिहिलेले वाक्य.
*३*.She goes to school....(She चा वापर)
*४*.They go to school...(They चा वापर)
*५*.Ravi goes to school.(मुलगा/पुरुषाच्या नावाचा वापर)
*६.*Arati goes to school.(मुलगी/स्त्रीच्या नावाचा वापर)

याप्रमाणे विविध इंग्रजी वाक्ये मराठी भाषांतरासह लिहिली.

[ यात *go*  व *goes* किंवा *cut व cuts* यापैकी कोणते रूप कोणत्या *S* पुढे वापरायचे हे समजण्यासाठी आधीच काही तक्ते तयार करून मुलांना अभ्यासण्यासाठी दिलेले होते.
उदाहरणार्थ- 
*I go / I cut*
*You go / You cut*
*We go / We cut*
*They go / They cut*

*He goes / He cuts*
*She goes / She cuts*
*It goes / It cuts*
*Ravi goes / Ravi cuts*
*Aarati goes / Aarati cuts ]*

त्यानंतर वाक्यातील *S* कायम ठेवून *V1* व वाक्याला अर्थपूर्णता येईल असा *'O'* वापरून विद्यार्थ्यांकडून नियमितपणे वाक्यनिर्मिती करून घेत गेलो.मुले आनंदाने हे सारं करीत होती...अर्थपूर्ण वाक्य लिहिलेल्या  वह्या रोज मला दाखवित होती...आताही हा नित्यक्रम सुरूच असतो...आनंदाने शिकलोत आम्ही _*S+V1+O*_ही पहिली वाक्यरचना...आणि त्यापुढील उर्वरित ११ वाक्यरचनाही..!

पाठ्यपुस्तकातील *मुख्य क्रियापदे [V1] व त्यांची उर्वरित ३ रूपे *[..V2..V3..V4]*यांचेही तक्ते मी स्वतः तयार केले तसेच विद्यार्थ्यांकडूनही तयार करून घेतले..वर्गाच्या भिंतीवर डकवले...रोज वर्गात आल्यावर फावल्या वेळेत माझे विद्यार्थी या तक्त्यातील शब्द अभ्यासतात..व उर्वरित ११ वाक्यरचनेच्या सुत्रांच्या मदतीने अर्थपूर्ण वाक्यांची निर्मिती करतात...पाठ्यपुस्तकात असलेल्या गद्यपाठातील वाक्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी व एकंदरीत सबंध पाठाचा आशय समजण्यासाठी शिकलेल्या या साऱ्या बाबींचा उपयोग त्यांना होत आहे...हे मी सध्या अनुभवतोय.

No comments:

Post a Comment