मुलं स्वत: शिकत आहेत...
सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्वास बसत नाही. सातार्याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं.
रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्यापैकी झोपला. एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक (मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं. शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १ मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं शिकवू असं ठरलं.
मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच. शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं, शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात. त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या.
पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन शाळांतली खेळणी दुसर्या दिवशी चोरीला गेली. वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार दिसते आहे.
शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या, काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या. खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच मदत झाली.
हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट, रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले. हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता. मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे’.
रचनावादाची तयारी करताना एकेका मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार ‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती.
रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं स्वत: शिकत आहेत.’
-शब्दांकन
-प्रतिभा भराडे मँडम
[विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]
----------------------------------------------------------
रचनावादावरील कुमठे बीट
रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५-१६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ...ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???
१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.
इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one sentence one question असा शब्दावरुन वाक्य सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.
वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन = पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
No comments:
Post a Comment