चला अंतराळात जाऊ या.
आज सहावीच्या वर्गातील प्रवीणने प्रश्न विचारला आकाश आणि अंतराळ यामध्ये फरक काय ? ही चर्चा रंगत गेली. मग काय अंतराळ, अंतराळवीर, विविध देशांच्या अंतराळ मोहिमा यावर मुलांना शक्य तितकी माहीती दिली. मुले खुपच एक्साइट होऊन आणखी प्रश्न विचारत होती ,मीही त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे शंका समाधान करीत होतो. अंतराळातील झिरो gravity ही आईडिया मुलांना खुपच भन्नाट वाटली परंतु त्याबद्दल त्यांना प्रॉपर आकलन होत नव्हते. मग यावर उपाय म्हणजे मुलांना डिजिटल क्लास मध्ये नेऊन मोठ्या पडद्यावर Gravity हा हॉलीवुड चित्रपट दाखविला मुले खुपच तल्लीन आणि एक्साइट होऊन हा चित्रपट पहात होती अंतराळ अनुभवत होती 5.1 च्या होम थिएटर ने त्यांना प्रत्यक्ष अंतराळात असल्याचा भास होत होता. चित्रपट संपल्यावर वैष्णवी,पूजा,प्राजक्ता,ऋतुजा यांनी भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल विचारले आणि यान कसे असते, ते कसे उड्डाण करते असे अनेक प्रश्न विचारले. मग अंतराळयानच तयार करायचे ठरले. आणि आम्ही मिळून तयार केले भारताचे मंगळयान. भन्नाट मज्जा आली यान तयार करताना. सर आता हे यान कसे उडवायचे हा मुलांनी विचारलेला प्रश्न. " खुप शिका, मोठे व्हा,आणि हे यान उडविण्यासाठी आवश्यक असणारे तंत्र विकसित करणारे शास्त्रज्ञ व्हा" या माझ्या शुभचिंतनासह आमचा अंतराळतास (दिवस) संपला.

No comments:
Post a Comment