THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 10 July 2018

प्रकल्प

प्रकल्प

1.  शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी 
       कसा तयार करून घ्यावा.

       शालेय  प्रकल्प म्हणजे काय ?-

          विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा 
         एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले 
         वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज 
         उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला  
         उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

  अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-
1.             स्वयंअध्ययनाची सवय लागणे.
2.             स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3.             स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन,सादरीकरण आदी क्षमताचा विकास      घडवणे. 
4.             तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5.           कल्पकता,सृजनशीलता,संग्रहवृत्ती,श्रमप्रतिष्ठा,स्वयंशिस्त,चिकाटी,सौंदर्यदृष्टीवक्तशीरपणा   नीटनीटकेपणा,संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडविणे. 
6.             आत्मविश्वास प्राप्त करणे.
7.             या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्टे अभ्यासणे. उदा. भाषा विषय-उच्चतमशुद्धता,
8.             पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी

ब. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे -
  प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहेकारण निवेदन,सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे हि प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावेयाचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे- 



 विद्यार्थ्यांसाठी- 
   1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
   2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहेत्याचा उल्लेख करा-  सर्वेक्षणात्मक प्रकल्पसंग्रहात्मक प्रकल्पसंकलनात्मक प्रकल्परचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्पप्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
   3. प्रकल्पाची  सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
   4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तकलेखन साहित्य,उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.
   5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
   6. प्रकल्पाचे निवेदन-  यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
   7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचामदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
   8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
   9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
   10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झालीकोणते  ज्ञान प्राप्त झाले?
    11. प्रकल्पाबाबत स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पूर्ण करताना मिळालेल्या  स्व-आनंदाचा  उल्लेख एक दोन वाक्यात करा.


क. शालेय प्रकल्पासाठी यादी-
     1. माहीती संकलन - थोर संतथोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.
   2. संग्रह : म्हणी संग्रहवाक्यप्रचार संग्रहअभंगसंग्रह,  श्लोकसंग्रह,     सुविचारसंग्रह,  कवितासंग्रहभावगीतसंग्रह,  पोवाडासंग्रह,  समरगीतसंग्रह,  देशभक्तीपरसंग्रह,  गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी
   3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
   4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी 
   5. आदर्श : आदर्श बालक-बालिकाआदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनीआदर्श शिक्षक-शिक्षिकाआदर्श शाळाआदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी   

📝शालेय  प्रकल्प  यादी

1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती 
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
 4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती 
6) नामवंत खेळाडूंची माहिती 
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती 
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती 
9) थोर विरांगनांची माहिती 
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
 11) श्रेष्ठ गायकांची माहिती 
12) आदर्श शिक्षक 
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक 
16) माझा भारत महान 
17) थोरांचे विचार 
18) थोर हुतात्मा 
19) राष्ट्रीय स्मारके 
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर 
22) ऐतिहासिक वाडे 
23) महाराष्ट्रातील किल्ले 
24) जलाशय  तलाव 
25) धरणे 
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती 
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती 
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती 
31) वाहतुकीचे नियम 
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता 
33) माझे आवडते वाहन 
34) रेल्वे स्टेशन 
35) बसस्थानक 
36) निबंध  कसा  लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर  
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी  सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे
41) कवितांचा संग्रह 
42) भावगीतांचा संग्रह  
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट 
45) चित्रमय गोष्ट 
46) संवाद लेखन 
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे 
49) वाद्यांची ओळख 
50) हुमाउपंथी मंदिरे 
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे 
52) म्हणींचा संग्रह करणे 
53) सुविचारांचा संग्रह करणे 
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे 
56) श्लोकांचा संग्रह करणे 
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह 
59) 'आईया विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह 
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी 
62) दूरदर्शन 
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय 
68) भाजीपाला मंडई 
69) किराणा दुकान 
70) आपली वाहने 
71) बियांचा संग्रह 
72) जुन्या टिकिटांचा संग्रह 
73) नाण्यांचा संग्रह 
74) भेटकार्डांचा संग्रह 
75) लग्नपत्रिकांचा संग्रह 
76) निसर्ग चित्रांचा संग्रह 
77) पिसांचा संग्रह 
78) खेळण्यांचा संग्रह 
79) मातीचे नमुने 
80) खडकांचे प्रकार 
81) दगडांचे नमुने 
82) वैज्ञानिक खेळणी 
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह 
84) राख्यांचा संग्रह 
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा 
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह 
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह 
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद

No comments:

Post a Comment