गणित
गणितातील गमती-जमाती , गणिताचे धडे , स्वाध्यायमाला इत्यादी विषयी माहिती मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
2 ते 30 पर्यंतचे संगीतबद्ध पाढे ( mp3) डाउनलोड करा.
गणित : महत्त्वाची सूत्रे
=> मूळसंख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ ने
पूर्ण भाग जाणारी संख्या,
=> समसंख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
=> विषमसंख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
=> जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ
२ चा फरक असतो,
=> संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिक
संख्या.
=> संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.
=> एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर
दोन अंकी ९०,
तीनअंकी ९०० आणि
चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
=> ० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.
=> १ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूण
संख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्या
प्रत्येकी १८ संख्या असतात.
=> दोन अंकांमधून एकूण २ संख्या,
तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,
चार अंकांमधून एकूण २४ संख्या व
पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
=> विभाज्यतेच्या कसोटय़ा
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -
संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकी
कोणताही अंक असल्यास.
B)३ ची कसोटी-
संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेष
भाग जात असल्यास.
C)४ ची कसोटी-
संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्या
संख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यास
अथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्य
असल्यास.
D)५ ची कसोटी-
संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५
असल्यास.
E)६ ची कसोटी-
ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भाग
जातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातो
No comments:
Post a Comment