THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 12 December 2016

सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

  प्रिसीजन फाऊंडेशनच्या वतीने 'सोलापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ( SIFF) पुढील वर्षी 10, 11, आणि 12 फेब्रुवारी 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. सोलापुरात अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहिल्यांदा आयोजित करण्यात आला आहे. याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून येत्या 27 नोव्हेंबर 2016 रोजी 'चित्रपट रसग्रहण कार्यशाळा' Film Appreciation Workshop) आयोजित करण्यात आली आहे. 
           या चित्रपट महोत्सवाला पोषक वातावरण निर्मिती व्हावी आणि सिनेरसिकांना चित्रपटाचा शास्त्रशुद्ध रसास्वाद कसा घ्यावा याचेही प्रशिक्षण मिळावे यासाठी रविवार, दि. 27 नोव्हेंबर 2016 रोजी, शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर येथे सकाळी 9.30 ते सांय. 5.30 अशी दिवसभराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया' अर्थात (FTII) चे माजी डीन प्रा. समर नखाते आणि जेष्ठ सिने दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल या तज्ज्ञांकडून चित्रपट रसग्रहण कसे करावे याचे प्रशिक्षण सोलापूर सिनेरसिकांना मिळणार आहे. 



कार्यशाळेचे स्वरूप 
चित्रपट सगळेच पाहतात. एखादा चित्रपट अथवा वाईट याची प्रतिक्रियाही लगेच देतात. पण तो चित्रपट 'का चांगला' किंवा 'का वाईट' याबद्दल फारसं सांगता येत नाही. चित्रपटाला अनेक बाजू असतात. कथा, संवाद, संगीत, अभिनय, त्यात अभिनित झालेल्या भावभावना, प्रेम, रोमान्स, हाणामारी, नाट्य, थरार, गुढता असे अनेक छटा दाखविणारे प्रसंग असतात. त्यात दिग्दर्शक असतो. दिग्दर्शकाची म्हणून एक भूमिका असते. त्याचं काही सांगणं असतं. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून तो काही सांगू पाहतो. अशा अनेक अंगांनी चित्रपट पाहायचा असतो. चित्रपटाची तांत्रिक बाजू देखील तितकीच महत्वाची असते. आता चित्रपटाचे तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. स्पेशल इफेक्ट्सचा जमाना आहे. अशा सर्वच बाजूंना स्पर्श करत चित्रपटाचे रसग्रहण कसं करावं? हे सांगण्याचा प्रयत्न या कार्यशाळेत केला जाणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आपण Online फॉर्म देखील भरु शकता. यासाठी खालील निळ्या रंगाच्या  Online Regesration या शब्दावर क्लिक करून आपली माहिती भरा.

 
    
या कार्यशाळेसाठी कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही कार्यक्षेत्रातील आणि आर्थिक गटातील चित्रपट रसिकांना सहभागी होता यावे यासाठी नाममात्र शुल्क म्हणून रु. 300/- आकारण्यात येणार आहे.
आपले शुल्क खाली दिलेल्या बॅंक अकाऊंट वर भरून त्याची रिसीट जपून ठेवा. कार्यक्रमाच्या वेळी दाखवा.

Precision Foundation
Bank of Baroda
A/c no:- 04370200000233
IFSC code:- BARBOSHOLAP

No comments:

Post a Comment