*श्रीमंत शाळा - गरीब शाळा*
*शाळेला ही नवी ओळख मिळाली,*
*समानतेला नाही राहीला थारा,*
*तीसच्या आतील गरीब झाली,*
*साठच्या वरील श्रीमंतीचा वारा,*
*शाळा ही तर शाळाच असते,*
*तेच उपक्रम तेवढेच काम माथी असते,*
*झाले अर्धे हे अनुदान आता तर,*
*दारिद्रय आता पक्के नशिबी वसते ,*
*महागाईच्या तुलनेत परवडणार कसे,*
*कागद, फाईली रजिस्टर हा साठा,*
*घ्यावा कसा, रंगाची दुनिया हे तर स्वप्नं वाटते,*
*दुरुस्तीला स्वस्तात माणसं धरणार का वाटा,*
*राष्ट्रीय उत्सव नी उपक्रमाची तयारी,*
*आवाहन आता पेलणार तरी कशा?*
*वाडी , वस्ती वा पाडे पेलणार तरी कसे,*
*गाव तेथे समृद्धी लोकवाटा ही तरी आशा,*
*शिक्षण हे असावं देशाचं भांडवल,*
*खर्च समजून नका विझवु पेटलेल्या मशाली आता,*
*तुफानातील पोलादी जरी आमच्या हिंमती,*
*लढतोय चौफेर प्रवाह विरोधी वाहता,*
*चिमुकल्यांना दाखवतो साऱ्या विश्वाची स्वप्ने,*
*पंखाना खुलण्या त्यांच्या मध्येच नका कापा,*
*तिमीरातून आत्ताच हे तेजाने उजळले,*
*भारत मातेची ही लेकरं पण जपा....*
✍🏼 *प्रकाशसिंग राजपूत*
सहशिक्षक
मुरुमखेडावाडी , औरंगाबाद
9960878457
*ही कविता लिहितांना अगदी मन आतून भरून आलं , पापण्याच्या कडा या चिमुकल्यांच्यासाठी न कळत ओल्या झाल्या ...*
*३० च्या आतील पटसंख्या शाळेचे सर्व शिक्षा अभियानात १३५०० असलेले सन २०००-२००१ पासूनचे अनुदान आता समग्र अनुदान अंतर्गत नाममाञ ५०००/- रु झाले आहे. २० वर्षात झालेली महागाई पहाता आता नक्कीच या शाळा गरीब झाल्या अशा म्हणता येईल.*
No comments:
Post a Comment