THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 7 June 2017

*फडक्यातील भाकरी*

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment