THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 30 June 2017

झाड लावू... झाड वाढवू.

झाड लावू...  झाड वाढवू...
झाड लावू , झाड वाढवू , झाड जगवू चला...
झाड लावू चला गड्यांनो झाड लावू चला//धृ
देव पुजाया... गजरा कराया...
देव पुजाया, गजरा कराया, फूल देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //1//
उन्ह लागता... पाय भाजता...
उन्ह लागता, पाय भाजता, सावली देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //2//
भुक लागता... काही न मागता...
भुक लागता, काही न मागता, फळ देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //3//
घर बांधाया... वस्तू बनवाया...
घर बांधाया, वस्तू बनवाया, लाकूड देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //4//
रोग घालवाया... सदृढ बनवाया...
रोग घालवाया, सदृढ बनवाया, औषध देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //5//
आम्हा जगायला... श्वास घ्यायला...
आम्हा जगायला, श्वास घ्यायला, आॅक्सिजन देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //6//
धरती टिकवाया... शेती पिकवाया...
धरती टिकवाया, शेती पिकवाया, पाऊस देते मला...
झाड लावू चला गड्यांनो... //7//

Saturday, 24 June 2017

Wednesday, 21 June 2017

१ली ते ८वी चे पाठ टाचण लिहिणे आता झाले अगदी सोपे. दररोजचे पाठ टाचण app डाउनलोड करा.

नमस्कार मित्रांनो दररोजचे  १ली ते ८वी चे पाठ टाचण लिहिणे आता झाले अगदी सोपे. दररोजचे पाठ टाचण app डाउनलोड करा.

 इथे क्लिक करा  Download

Hi freinds daily lesson notes writing in very easy now. Download std. 1st to 8th daily lesson notes app here

 https://goo.gl/YYg75X

Monday, 12 June 2017

छान छान गोष्टी

● सॉफ्टवेअर



*मराठी टायपिंगसाठी ISM V6  हे Software डाऊनलोड करा.


*PDF फाईल चे Photo फाईलमध्ये करणारे Software डाऊनलोड करा.


*YTD (व्हिडिओ डाऊनलोड करणारे)Software डाऊनलोड करा. 

● महाराष्ट्रातील समाजसुधारक

● महाराष्ट्रातील समाजसुधारक


गोपाळ हरी देशमुख
सावित्रीबाई फुले
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
गोपाळ गणेश आगरकर
महर्षी धोंडो केशव कर्वे
पंडिता रमाबाई
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
संत गाडगेबाबा
रघुनाथ धोंडो कर्वे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
प्रबोधनकार ठाकरे
कर्मवीर भाऊराव पाटील
डॉ.केशव बळीराम हेडगेवार
ताराबाई मोडक
आचार्य विनोबा भावे
साने गुरुजी
स्वामी रामानंद तीर्थ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
अनुताई वाघ
बाबा आमटे
नानाजी देशमुख
जनार्दन महाराज वळवी
हमीद दलवाई

पाठ्यपुस्तके

पाठ्यपुस्तके


नमस्कार.....

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे प्रकाशित इयत्ता पहिली ते आठवी पाठ्यपुस्तके डाउनलोड करण्यासाठी Download बटनावर क्लिक करा . 

इयत्ता पहिली                                                                                                                                              बालभारती पाठ्यपुस्तक Download


इयत्ता पहिली
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  पहिली
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
बालभारती पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
इंग्रजी  पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  तिसरी
गणित  पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  तिसरी
परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता तिसरी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास १ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास २ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
परिसर अभ्यास २ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सहावी
मराठी पाठ्यपुस्तक -

इयत्ता सहावी
गणित पाठ्यपुस्तक -  

इयत्ता सहावी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक -  

इयत्ता सहावी
इतिहास पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सहावी
भूगोल पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सहावी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सातवी
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
इतिहास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
भूगोल पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी 
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
इतिहास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
भूगोल पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - Download

download books

पाठ्यपुस्तके


नमस्कार.....

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे प्रकाशित इयत्ता पहिली ते आठवी पाठ्यपुस्तके डाउनलोड करण्यासाठी Download बटनावर क्लिक करा . 

इयत्ता पहिली                                                                                                                                              बालभारती पाठ्यपुस्तक Download


इयत्ता पहिली
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  पहिली
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
बालभारती पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  दुसरी
इंग्रजी  पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  तिसरी
गणित  पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता  तिसरी
परिसर अभ्यास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता तिसरी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास १ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता चौथी
परिसर अभ्यास २ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
इंग्रजी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता पाचवी
परिसर अभ्यास २ पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सहावी
मराठी पाठ्यपुस्तक -

इयत्ता सहावी
गणित पाठ्यपुस्तक -  

इयत्ता सहावी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक -  

इयत्ता सहावी
इतिहास पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सहावी
भूगोल पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सहावी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - 

इयत्ता सातवी
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
इतिहास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
भूगोल पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता सातवी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी 
मराठी पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
गणित पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
सा.विज्ञान पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
इतिहास पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
भूगोल पाठ्यपुस्तक - Download

इयत्ता आठवी
ना.शास्त्र पाठ्यपुस्तक - Download

Thursday, 8 June 2017

आकारिक चाचणी पेपर @

संकलित मूल्यमापन पेपर(

ब्लॉग बनवू चला - छोटे भाग(व्हिडिओ

ब्लॉग बनवू चला - छोटे भाग(व्हिडिओ)

Wednesday, 7 June 2017

NOTIFICATION ABOUT MY BLOG

IF YOU WANT TO SEARCH MY BLOG JUST TYPE IN GOOGLE ---------

1.MAHESH MHASE
2.WWW.MAHESHMHASE.ORG

3.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM

थोरांची ओळख

थोरांची ओळख

थोरांची ओळख


शिवाजी महाराज

संभाजी भोसले

ए.पी.जे._अब्दुल_कलाम

लोकमान्य टिळक

भगतसिंग

विठ्ठल_लक्ष्मण_कोतवाल

सावित्रीबाई_फुले

जोतीराव_गोविंदराव_फुले

सुभाषचंद्र बोस

भीमराव रामजी आंबेडकर

जवाहरलाल नेहरू

लालबहादूर शास्त्री

वल्लभभाई पटेल

मदर तेरेसा

अहिल्याबाई होळकर

रमाबाई रानडे

इंदिरा गांधी

राणी लक्ष्मीबाई ( झाशीची राणी )

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

छत्रपती शाहू महाराज 

सिंधुताई सपकाळ

अण्णा भाऊ साठे

सर्वपल्ली राधाकृष्णन

ज्ञानरचनावाद राबवताना.

ज्ञानरचनावाद राबवताना...




आज मितीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानरचावाद शैक्षणिक क्षेत्रात रुजला आहे परंतु अजुनहीआमचा शिक्षक गोंधळलेला दिसून येतो

सर्वात प्रथम रचनावाद म्हणजे काय हे आपण समजून घेतले पाहिजे रचनावाद म्हणजे अस काही मोठ्ठ शास्त्र नाही की जे आपणाला वापरता येणारच नाही.रचनावादाची अगदी सोपी व्याख्या करायला गेल्यास असे म्हणता येईल

✒बालकांना फुलण्यासाठी, आत्मविष्कारासाठी अनुकूल,पूरक परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजेच ज्ञानरचनावाद होय.

किंवा याहून सोपे


✒रचनावाद म्हणजे--कृतिशील स्वयंअध्ययन
यात सर्वात प्रथम स्वयंअध्ययन म्हणजे मुलं आपलं आपण शिकणार,ते त्याच स्वतः शिकणार शिक्षकाने फक्त शिकण्यास मदत करणे

आणि कृतिशील म्हणजे--
आता या कृतीशीलतेमध्ये
1)शारीरिक कृती
2)साधनं वापरून करावयाची कृती
3)वैचारिक पातळीवर जाण्यासाठी करावी लागणारी कृती
यांचा समावेश करता येईल

जर आपणाला या दोन गोष्टी समजल्या तर आपण रचनावाद चांगल्या प्रकारे राबवू शकतो असे मला वाटत

प्रत्येक शिक्षकाने सर्वात प्रथम हे जाणले पाहिजे कि आपण जे शिक्षण देणार आहोत ते  आपल्या वर्गातील मुलांच्या भावी काळासाठी असावं
आज आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी हे उद्या देशाचे नागरिक होणार आहेत त्यामुळे त्यांना योग्य असे व भावी काळासाठी किफायतशीर असेच शिक्षण दिले पाहिजे.
आज शिकणाऱ्या मुलांना त्यांचे पुढील भावी जीवन जगण्यासाठी व त्याच्या भावी काळासाठी फायद्याचं ठरणार शिक्षण आपण दिले पाहीजे

वर्गामध्ये अध्यापन करत असताना
एक सुलभक म्हणून शिक्षकाने मुलांच्या भावी काळाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत
त्याच बरोबर भावी काळातील गरजांचा विचार करणे गरजेचे असते
सध्याच्या वेगाने बदलत्या काळामध्ये टिकायचे असेल तर आज आपण दिलेले ज्ञान हे उद्याच्या पिढीच्या कामाला येणार असावं


आता सर्वात महत्वाच्या आणि मेंन मुद्द्याकडे आपण पाहूया


वर्गामध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवत असताना शिक्षकाने खालील गोष्टींचा विचार करावा.
🔷काय द्यायचं ?
🔷कसं द्यायचं ?
🔷किती द्यायचं ?
🔷गरजा नुसार त्यांना काय हवंय ?

रचनावाद प्रभावीपणे राबविण्यासाठी पुर्वज्ञान जागृत करुन त्याची सांगड नवीन ज्ञानाशी घडवून कृती केली पाहिजे.
आशयानुरुप कृती मुलांना दिल्यास मुले कृतीत रमतात..चुकतात..पुन्हा प्रयत्न करतात आणि ज्ञान मिळवतात त्यामुळे हे ज्ञान घोकंपट्टीयुक्त नसते.ते  ज्ञान चिरकाल स्मरणात राहते.रचनावादात मुल स्वतः  विचार करतं.कृती करतं..व नवीन ज्ञानाची निर्मीती करते.

उदा...जैवविविधतेसाठी आपण
🐂🐟🐅🐄🐪🐫🐘 वेगवेगळे प्राणी व त्यातील फरक
एकच प्राणी व त्यातील फरक
उदा.मासा...🐋🐳🐬🐡🐟🐠

माशांची एकच जात व त्यातील फरक...यात आकार...रंग..इ.
बाबतची विविधता आपण प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे किंवा प्रत्यक्ष वस्तू दाखवून मुले त्यातील साम्य भेद निरीक्षणाने रचनावादात अभ्यासतात.

तसेच विविध संकल्पना समजण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊन,त्यांच्यासमोर आव्हाने निर्माण करून त्यांची उत्तरे त्यांनाच शोधण्यास प्रवृत्त करणे.

परंतु आजकाल फरशीवर आकृत्या काढल्या म्हणजे शाळेत रचनावादी शिक्षण दिलं जातं असा गोड गैरसमज आमच्या शिक्षक आणि अधिकारी यांच्यामध्ये आपणाला दिसून येतो.
परंतु रचनावादी शिक्षणामध्ये मुलाकडे असणाऱ्या ज्ञानाची सांगड घालायची असते ,मुल आपलं आपण शिकत असत
उदा--मुलांना मापन येत असते
मूल शाळेत येण्याअगोदरच  विविध वस्तू ,नाणी -नोटा ,अंतर याचे मापन करत असते,गणितातील बेरीज शिकवत असताना त्याला एकक दशक संकल्पना स्पष्ट झाल्या की ते बेरीज अगदी सफाईदार पणे करते.
वर्गात मुलांना संपूर्ण स्वातंत्र दिले तर मुले चुकत चुकत शिकत असतात आणि वारंवार कृती केल्यामुळे मुलाने आत्मसात केलेले ज्ञान चिरकाल टिकणारे असते
भाषा विषयाचा विचार करायला गेल्यास-------
मुलांना कोणतीही एक भाषा परिपूर्ण आली पाहिजे कारण मुलांचं 8 ते 10 वय हे भाषा शिकण्याचा काळ असतो असे मानसशास्त्र म्हणते आणि मुलाची पहिली भाषा म्हणजे मातृभाषा ही विचार करण्याची क्षमता विकसित करीत असते.
मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव दिला पाहिजे त्याला वेगवेगळ्या विषयावर कल्पना करायला चालना दिली पाहिजे मग तो विषय कोणताही असो.

उदा- दगडांचा पाऊस पडला तर....

आता तुम्ही म्हणाल हा असला कसला विषय ????
पण मुलांना कल्पना करू द्या
कारण मुलांच्या कल्पना ह्या रबरासारख्या असतात. जेवढ्या ताणाव्या तेवढ्या ताणल्या जातात.यामुळे त्याच्या भावविश्वाचा शोध घेता येतो,त्याच्या मनातील कल्पना समजण्यास मदत होते..


आपल्या वर्गामध्ये प्रभावी ज्ञानरचनावाद राबवत असतांना जर आपण मुलांचा विचार करून त्यांना वेगवेगळ्या कृती करू दिल्या पाहिजेत जेणेकरून मुल आपलं आपण शिकेल व व आपले अध्यापन ही रचनावादी होईल.

शालेयाचा पहिला दिनु..

शालेयाचा पहिला दिनु..

*शालेयाचा पहिला दिनु....*
💐💐💐💐💐💐💐

आज दिनांक 15 जून शाळेचा पहिला दिवस सर्व जण अपडेट..

इयत्ता पहिलीमध्ये  मुलांना प्रवेश दिला ,पहिल्या दिवशी उपस्थिती 100%

बंडगरवस्ती म्हणजे 18 ते 19 घरांची वस्ती...
वस्तीवरून प्रवेश फेरी काढली
नवागतांचे स्वागत  इयत्ता चौथीतील  मुलींनी औक्षण घालून केले..

नवीन पुस्तके..
नवीन कपडे..
नवे मित्र..
नवे ठिकाण...
सर्व काही नवे नवे..

स्वागत,गणवेश वाटप व पुस्तक वाटप कार्यक्रम झाल्यावर जिलेबी आणि फरसानाची मेजवानी...त्यात पुन्हा शाळेचा पुलाव...मुलांनी मनसोक्त आनंद लुटत जेवणाचा आस्वाद घेतला..

दुपारनंतर मोठ्या वर्गातील मुलांनी नवीन पुस्तके हातात घेतली तर पहिलीच्या मुलांनी घेतली मांडणीवरील खेळणी..

कुणी ट्रक गाडी तर कुणी गोट्या,चेंडू ....

स्वारी खेळता खेळता दमली अन....
नवीनच जीवनाची वाट चालण्यासाठी सज्ज झालेले दोन जवान वर्गातच चटईवर आडवे झाले..
आम्ही ही त्यांना काही ही न बोलता त्यांची झोप होऊ दिली

खरच किती लहान मुले ती ...

वस्तीवरील बुजुर्ग येऊन सांगू लागले गुरुजी साळला सुटी होती तर लय सूनं सुनं वाटत होतं..

 आता कस भरल्यासारखं वाटतय बघा....

आम्ही ही सुखावलो कारण आजपासून पुन्हा आपल्या समोरील चिमुकले नवीन काही शिकण्यासाठी , आम्हाला शिकविण्यासाठी तयार झाली आहेत...

आता आपली जबाबदारी वाढली आहे....
हे मात्र नकी...

*फडक्यातील भाकरी*

काल दुपारची जेवणाची सुट्टी.
आम्ही नेहमीप्रमाणे सर्व मुले व मी एकत्र शाळेच्या व्हरांड्यात जेवणासाठी बसलो होतो.सर्वांनी आपापला डबा उघडून जेवायला सुरुवात केली सोबत पोषण आहार ही होता
चौथीच्या वर्गातील प्रतिक्षाने डब्यात बाजरीची भाकरी आणलेली पण ती जेवणा डब्याशी कसलीतरी झटापट चालू होती तिची ..
मी न राहवून विचारले काय झाले मग तिच्या शेजारी बसलेल्या दीपाली ने सांगितले
*सर ...*
*तिच्या डब्यातून भाकरी निगत नाय..*
मग मी म्हणालो बघू मी काढून देतो ..मलाही डब्यातील भाकरी निघेना...😔😔
कारण ही तसेच होते
भाकरी डब्यात इतकी फिट्ट बसली होती की हाताने निघेना
मग आम्ही शाळेतील भातवडीचा वापर करून डब्यातील भाकरी काढली..
मला ही बाजरीची भाकरी पाहून खाण्याचा मोह आवरला नाही. कारण ही तसेच..
 सध्या खरिपाची पिके निघाली आहेत नवीन बाजरी झाली आहे ..अन मीठ टाकून बनवलेली बाजरीची खाण्यात मजा काही औरच असते.
मग आमच्या बाजरीच्या भाकरीवर खूप गप्पा झाल्या.
भाकरी कशी बनवली पाहिजे,भाकरीसोबत काय छान लागते...असे बरेच काही..
मी काल बोलता बोलता बोलून गेलो होतो की डब्यात भाकरी कडक राहत नाही ती चिकटते या साठी फडक्यात बांधून आणलेली भाकरी कडक राहते व चवीला हि छान लागते..
*मी लहान असताना माझी आई मला फडक्यात भाकरी बांधून द्यायची असं खूप काही बोललो*
*लहानपणीच्या माझ्या बालआठवणी जेवण करताना मुलांना सांगितल्या*

*अन आज.....*

दुपारी जेवणाची सुट्टी झाली मी प्रश्नार्थी  शब्द हे शैक्षणिक साहित्य बनवत होतो काम चालूच होते.मुलांना जेवायला बसा सांगितले मी येतोच असं म्हणून.पण कामामुळे 5 मिनिट झाले तरी लक्षात नाही आले की जेवायचे

दीपाली दरवाज्यापाशी घुटमळत होती म्हणून मी तिला थोडं मोठ्या आवाजतच बोललो ..
जा बस कि जेवायला ...
पण ती जाईना..
मग मी विचारले का जेवणास तेव्हा तिने जे उत्तर दिले त्या उत्तराने माझ्या हातातील काम आपोआप बंद पडले आणि मी खुर्चीवरून ताडकन उठलो....
माहितेय तिने काय सांगितले

*स चला ना जेवायला*
*मी फडक्यात बाजरीची अन मिरचीची ठेचा आणलाय..*

खरच क्षणभर विचारात पडलो
लेकरं किती जीव लावतात आपल्याला,
किती प्रेम करतात,
किती आत्मीयता असते मुलांची आपल्याशी,
क्षणभर तृप्तीताई समोर उभ्या राहिल्या अन त्यांचा शब्द आठवला ....
*सर्वात प्रथम प्रत्येक शिक्षकाने मूल समजून घेतले पाहिजे*
खरंच मूले फार जीव लावतात आपल्याला..

*आजचे जेवण खरच इतके चविष्ट होते की पंचपक्वांन ही या माझ्या दीपालीने  आणलेल्या फडक्यातील भाकरीपुढे फिके ठरले असते*

आजचा दिवस खूप काही  शिकवून गेला
🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, 6 June 2017

आर टी ई कायदा

आर टी ई कायदा

बालशिक्षण हक्क कायद्याच्या मुख्य तरतुदी

• सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना जवळच्या सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ते ८) पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. ही जवळची शाळा 2013 पर्यंत स्थापन झाली पाहिजे.
    • सर्व मुलांना अधिकृत शाळेमध्ये पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. याबाबतीत अर्धवेळ चालवले जाणारे वर्ग/ अनौपचारिक शाळा किंवा अनधिकृत शाळा यांना कायदेशीर पर्याय समजले जाणार नाही.
    • बालशिक्षण हक्क कायद्यात नमूद केल्याप्रमाणे सर्व अधिकृत शाळांनी उत्तम दर्जाचं शिक्षण पुरवलं पाहिजे. त्यात मूलभूत सुविधा, शिकवण्याचे किमान तास आणि पुरेशी शिक्षक संख्या या काही किमान अटींची पूर्तता २०१३ पर्यंत झाली असली पाहिजे. अधिकृत शाळांमधले सर्व शिक्षक २०१५ पर्यंत शैक्षणिकदृष्ट्या पात्र असले पाहिजेत.
    • बालशिक्षण हक्क कायद्यातल्या २५% आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे, काही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना, त्याचप्रमाणे अपंग मुलांना , खासगी विना अनुदानित आणि अल्प अनुदानित शाळांत, तसंच काही विशेष वर्गवारीतल्या शाळा,उदाहरणार्थ , केंद्रिय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांत,मोफत शिक्षण मिळेल.
    • कुठलीही शाळा मुलांकडून देणगी किंवा कॅपिटेशन फी स्वीकारू शकणार नाही, त्याचप्रमाणे मुलांच्या अगर त्यांच्या पालकांच्या मुलाखतींवर,तसंच मुलांच्या चाचणीवर किंवा इतर पडताळणींवर मुलांचा शाळा- प्रवेश आधारलेला नसेल.
    •  कुठल्याही मुलाला शाळेत शारीरिक शिक्षा अगर मानसिक छळाला सामोरे जावे लागणार नाही. कुठल्याही मुलाला त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच इयत्तेत परत बसवले जाणार नाही किंवा शाळेतून काढून टाकले जाणार नाही.
    • बहुतेक सर्व शाळांना आपापल्या शाळेत, मुख्यत्वे पालकांची मिळून बनलेली 'शाळा व्यवस्थापन समिती' (स्कूल मॅनेजमेंट कमिटी) स्थापन करावी लागणार आहे. शाळेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, शाळेला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या विनियोगाकडे लक्ष ठेवणे आणि 'शाळा विकास योजना' (स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन)बनवणे ही या शाळा व्यवस्थापन समितीची मुख्य कामे असतील.
    • या कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता आर्थिक मदत देण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची संयुक्तरित्या असली, तरी राज्यसरकार आणि स्थानिक संस्था याच याकरता मुख्यत्वे जबाबदार राहतील.
    • या कायद्याची अंमलबजावणी होते आहे यावर नजर ठेवण्याची आणि कायद्याचा भंग केला जात आहे अशा तक्रारी आल्यास त्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोग (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एन सी पी सी आर) आणि राज्य बालहक्क सुरक्षा आयोग (स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एस सी पी सी आर) यांची आहे.
    • बालशिक्षण हक्क कायद्याच्या काही किंवा सर्वच तरतुदीतून काही शाळांना वगळण्यात आलेले आहे.