THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 30 October 2024

*🕉️श्री लक्ष्मीपूजन मुहूर्त🕉️*

 *💫👉दि.१/११/२०२४* 

 *या वर्षी दि.३१/१०/२०२४रोजी चतुर्दशी समाप्ती दु.१५.५३ला असुन अमावस्या सुरु होत आहे आणि दुसरे दिवशी १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ०६.१७ ला अमावस्या समाप्ती आहे.*

*३१ ऑक्टोंबर रोजी अमावस्येची प्रदोषकाळात अधिक व्याप्ती असुन दुसरे दिवशी १ नोव्हेंबर ला *शुक्रवारी अमावस्या प्रदोषकाळात अल्पकाळ असताना लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबर रोजीच करावे.* 

 *धर्मसिंधु,पुरूषार्थ चिंतामणी,तिथीनिर्णय,व्रतपर्व विवेक इ.ग्रंथाच्या आधारे दोन्ही दिवशी प्रदोषकाळ कमी अधिक असता अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.* 

*अमावस्या व प्रतिपदा यांचे युग्म असल्याने,प्रतिपदा युक्त अमावस्येला महत्व द्यावे असे शास्त्र वचन आहे. म्हणून लक्ष्मीपूजन १ तारखेला करावे.*

*या दिवशी सूर्यास्तानंतर अमावस्या प्रदोषकाळात अल्पकाळ असली तरी सायंकाळापासून प्रदोषकाळ समाप्ती पर्यंत( म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मि.या कालावधीत) लक्ष्मीपूजन करता येईल.*

*यापूर्वी असे पूजन दि.२८/१०/१९६२,दि.१७/१०/१९६३,दि.२/११/२०१३ झाले होते.तरीही मनात कसलाही संदेह न ठेवता १ तारखेला लक्ष्मीपूजन करावे.*

 *लक्ष्मीपूजनमुहूर्त* 
*(१)सायं.०५ ४४ ते रात्री ०८.१५ पर्यंत,*
*(२)लाभ वेळा रात्री०९.३० ते ११.०० पर्यंत.*

No comments:

Post a Comment