THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 14 September 2020

*Scholarship शिष्यवृत्ती – (पाचवी व आठवी)*

विषय: मराठी

घटक : 2 – शब्दसंपत्ती

*उपघटक : 2.8 : एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द*

• भाषेमध्ये दिलेल्या शब्दाला एकाच अर्थाचे अनेक समानार्थी शब्द असतात.
• तसे एकाच शब्दाचे संदर्भावरून भिन्न असणारे अनेक शब्द आहेत. 
• हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्याच्या अर्थावरून, संदर्भावरून त्या शब्दाचा अर्थ लावावा लागतो.
• उदा. 1) त्याने दोन्ही कर जोडून नमस्कार केला.
• 2) बाबांनी ग्रामपंचायत कार्यालयात कर भरला.
• 3) तू नियमित अभ्यास कर.
• 4) सूर्य आपल्या सहस्त्र करानी आसमंत उजळतो.
• पहिल्या वाक्यात 'कर' म्हणजे हात असा अर्थ होतो. 
• दुसऱ्या वाक्यात सरकारकडे जमा करावयाचा पैसा असा अर्थ होतो.
• तिसऱ्या वाक्यात क्रिया करणे (एक क्रियापद) असा अर्थ होतो. 
• चौथ्या वाक्यात 'कर' शब्दाचा अर्थ 'किरणे' असा होतो. 
• अशा एकाच शब्दाला असणाऱ्या भिन्न अर्थामुळे भाषेचे सोंदर्य वाढले.
• लेखनशैली सुधारते.


No comments:

Post a Comment