कल चाचणी
महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य बोर्ड शाळांमधील १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'कल चाचणी' या प्रकल्पाची २०१६ पासून सुरुवात केली आहे जेणेकरुन विद्यार्थी करिअरचा सुयोग्य पर्याय निवडू शकतील.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ www.mahacareermitra.in व टेक्निकल हेल्पलाईन हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत.
या पोर्टल व हेल्पलाईनचा उद्देश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार १९,००० पेक्षा जास्त कॉलेजेस आणि ८०,००० पेक्षा जास्त शैक्षणिक पर्याय जिल्ह्यानुसार उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
या व्यतिरिक्त, विद्यार्थी तज्ञांच्या संदेशांसह विविध व्हिडिओ पाहू शकतात आणि आवडीच्या क्षेत्रांशी संबंधित लेख वाचू शकतात. हे व्हिडिओ आणि लेख विद्यार्थ्यांना करिअरचा सुयोग्य पर्याय निवडण्यास मदत करतील.
कलचाचणी निकाल पाहण्यासाठी
महा करिअर मित्र
( सूचना - कलचाचणी निकाल पाहण्यासाठी वरील साईट वर जाऊन आपला एस.एस.सी परीक्षेचा (10 वी बोर्ड परीक्षेचा ) Seat No. टाका व अहवाल या TABS वर CLICK करा ....आपला मार्च 2020 चा कलचाचणी निकाल (अहवाल ) आपणास पाहता येईल व प्रिंट तसेच DOWNLOAD देखील करता येईल.)
आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित माहिती देणारे ( कलनुसार ) व्हिडीओज् लिंक :👀 👉
- https://www.mahacareermitra.in/#/videos