*श्रीमंत शाळा - गरीब शाळा*
*शाळेला ही नवी ओळख मिळाली,*
*समानतेला नाही राहीला थारा,*
*तीसच्या आतील गरीब झाली,*
*साठच्या वरील श्रीमंतीचा वारा,*
*शाळा ही तर शाळाच असते,*
*तेच उपक्रम तेवढेच काम माथी असते,*
*झाले अर्धे हे अनुदान आता तर,*
*दारिद्रय आता पक्के नशिबी वसते ,*
*महागाईच्या तुलनेत परवडणार कसे,*
*कागद, फाईली रजिस्टर हा साठा,*
*घ्यावा कसा, रंगाची दुनिया हे तर स्वप्नं वाटते,*
*दुरुस्तीला स्वस्तात माणसं धरणार का वाटा,*
*राष्ट्रीय उत्सव नी उपक्रमाची तयारी,*
*आवाहन आता पेलणार तरी कशा?*
*वाडी , वस्ती वा पाडे पेलणार तरी कसे,*
*गाव तेथे समृद्धी लोकवाटा ही तरी आशा,*
*शिक्षण हे असावं देशाचं भांडवल,*
*खर्च समजून नका विझवु पेटलेल्या मशाली आता,*
*तुफानातील पोलादी जरी आमच्या हिंमती,*
*लढतोय चौफेर प्रवाह विरोधी वाहता,*
*चिमुकल्यांना दाखवतो साऱ्या विश्वाची स्वप्ने,*
*पंखाना खुलण्या त्यांच्या मध्येच नका कापा,*
*तिमीरातून आत्ताच हे तेजाने उजळले,*
*भारत मातेची ही लेकरं पण जपा....*
✍🏼
MAHESH MHASE 9561884685
*ही कविता लिहितांना अगदी मन आतून भरून आलं , पापण्याच्या कडा या चिमुकल्यांच्यासाठी न कळत ओल्या झाल्या ...*
*३० च्या आतील पटसंख्या शाळेचे सर्व शिक्षा अभियानात १३५०० असलेले सन २०००-२००१ पासूनचे अनुदान आता समग्र अनुदान अंतर्गत नाममाञ ५०००/- रु झाले आहे. २० वर्षात झालेली महागाई पहाता आता नक्कीच या शाळा गरीब झाल्या अशा म्हणता येईल. वर्षभरात राबवयाचे उपक्रम , राष्टीय उत्सव, पालक सभा, शालेय स्टेशनरी, किरकोळ दुरुस्त्या, रंगरंगोटी, साफसफाई, शाळेचे विदयुत बील, डिजिटल क्लासची साहित्य गरज, शिक्षक अध्यापनसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती खर्च तथा विविध टपालांसाठी व आँनलाईन कामे शिष्यवृती परीक्षा आवेदन, नवोदय परीक्षा आवेदन , सरल माहिती इत्यादी कामांचा खर्च व झेराँक्स खर्च असा अवाढव्य खर्च फक्त ५००० रु होणार तरी कसा.*
*माझ्या सारख्या तमाम शिक्षक बांधवांना हा प्रश्न भेडसावत आहे.लोकसहभाग मोठया गावात सहज मिळतो पण वाडी, वस्ती पाडे येथे मिळवणे हे फारच अवघड असते.*
*मी आजवर विद्यार्थ्यांना सर्वात्तम शालेय परिसर व शिक्षण देण्यासाठी झटत आलोय . समाज सहभाग ही मिळवला पण आता ही परिस्थिती पाहून नक्कीच भविष्यात खूपच अवघड अवास्था शाळेची होणार असल्याचे दिसतेय,*
*सर्व समाज, राजकीय व्यक्ती, शिक्षक नेते व सर्व शिक्षक बांधवांना नम्र विनंती कि या विषयी सकारात्मक विचार व्हावा. शिक्षण प्रवाहात असलेल्या दुर्गम भागातील चिमुकल्यांना उत्तम शाळा व उत्तम शिक्षण मिळावे.*
No comments:
Post a Comment