THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 5 January 2019

प्रजासत्ताक दिन

      सर्वप्रथम आपणास सर्वांना प्रजासत्ताक      दिनाच्या मनपुर्वक सदिच्छा.....
काही दिवसात प्रजासत्ताक दिन येत आहे या दिनाचा खरा इतिहास घराघरापर्यंत माहित व्हायला हवे यासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेर करा जादू वगैरे काही होणार नाही पण जागृती नक्की होईल.
          26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन होय या दिनाची सुरूवात कशी झाली हे जाणून हे घेणे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं कर्तव्य आहे. नव्हे तर हे प्रत्येक भारतीयांनी आपल्या राष्ट्राप्रती आणि राष्ट्रीय उत्सहाप्रती सजग रहायला हवे.काय आहे प्रजासत्ताक दिनाचा इतिहास या दिनी कोणाची प्रतिमा ठेवणे योग्य ठरते.कोणाचे ह्या सणाला उत्सहाला अधिक योगदान आहे.चला जाणून घेऊूया खरा इतिहास.इतिहासाची सुवर्णाक्षरांची पाने चाळल्यावरती आपल्या समोर ठळकपणे नाव येते ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर साहेब यांचं त्याचप्रमाणे लक्षात येईल ह्या उत्सहाचे सर्वात मोठे योगदान त्यांचेच आहे आता सविस्तर जाणून घेऊया...
         26 नोव्हबर 1949 रोजी आपलं भारतीय संविधान  डॉ. भिमराव रामजी आंबेडकर  नावाच्या थोर महान  व्यक्तीने  लिहिले एका अतिशय गरिब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गाच्या बाहेर बसावे लागत होते.उभ्या आयुष्यात त्यांना  खुप अस्पुश्यतेचे चटके सहन करावे लागले. तरी त्यांनी मोठ्या जिद्दीने उच्च विधाविभूषित होऊन मोठ्या पदव्या संपादन केल्या . आपल्या शिक्षणाचा योग्य सद्दोपयोग करून राष्ट्राचं संविधान जवळजवळ 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लावून पुर्ण केले.
        जगाच्या पाठिवरील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आेळखला जाणारा इंग्लड या देशाचं नाव खोडून आता सर्वांत मोठी लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून भारताला नवी ओळख प्राप्ती झाली आहे.याचं श्रेय बाबासाहेबांना  जाते. आपले भारतीय संंविधान ज्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आंमलात आलं.या दिवसापासुन संविधानाच्या नियमावलीनुसार राज्यकारभार सुरू झाला.त्यामुळे जनतेच्या प्रजेच्या हाती सत्ता आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

No comments:

Post a Comment