THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 17 December 2018

पाठ टाचण आता मोबाईल ॲपमध्ये

*प्रतीक्षा संपली*
सर्व शिक्षकबांधवासाठी खास आजच डाऊनलोड करून घ्या

शिक्षकांनी शिक्षक व शिक्षण क्षेत्रासाठी स्थापन केलेल्या व अल्पावधीतच यशस्वीतेचे शिखर गाठणाऱ्या *समर्थसार्थ* या सॉफ्टवेअर कंपनीने आपल्यासाठी आणले आहे
*अगदी मोफत*

*पाठ टाचण इयत्ता १ ली ते ८ वी*


वैशिष्ट्ये---
🖊 दररोज मिळणार त्या तारखेचे टाचण

🖊इयत्ता पहिली ते आठवीसाठी एकत्र

🖊मराठी व सेमी इंग्रजी दोन्ही माध्यमे

🖊तज्ज्ञांच्या मदतीने निर्मिती

🖊 अत्यल्प इंटरनेट वापरणार म्हणजे  एका मेसेज एवढे नेट एका दिवसासाठी वापरणार (वर्षभराचा खर्च साधारणतः १० रुपये फक्त ... नाहीतर आपण मेसेज साठी खूप इंटरनेट घालवतोच ना?)

🖊Java या उच्च दर्जाच्या programming language मध्ये निर्मिती (हे app खरंच पेव फुटलेल्या इतर app सारखे नाही)

🖊 *पूर्णपणे मोफत*

इथे क्लिक करून डाउनलोड करा👇🏻
👇👇👇👇👇👇👇
पाठ टाचण डाऊनलोड 

Friday, 14 December 2018


अध्ययन स्तराचा २ रा टप्पा आपण आताच पूर्ण केला त्यानुसार अध्ययन टप्यावर आधारित विद्यार्थी निहाय कृती आराखडा आपणास देण्याचा प्रयत्न हे माझ्या वैयक्तिक नियोजनावर आधारित आराखडे आहेत आपण आपल्या शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांची बौद्धिक कुशलता उपक्रम शीलता विचारात घेऊन आपण आपल्या स्तरावर नियोजन करू शकता.
प्रत्येक इयत्तेचे ३ नमुने आराखडे तयार करण्यात आले आहेत.



whatsapp वरच्या मेसेजने
 माझी विचारशक्ती सुन्न झाली
 जो तो म्हणतो मला  तुझी
दिवाळी कशी गेली?

रक्त आटत तवं
मेहनत आम्ही केली
दुष्काळाच्या कचाट्यात
 पीकं माझी करपली
करपलेल्या पिकांसोबत
स्वप्नही हरपली.
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?

खिशात दमडी नसतानाही 
बाजारात कुटूंबाचा आग्रहने जाई
गजबजलेला बाजार पाहून
मन चलबिचल होई.
मुलासाठी मी कपडे खाऊ
 घेण्यासाठी होती नव्हती
 तेवढी लक्ष्मी गेली
कसं सांगू तुम्हा माझी
 दिवाळी कशी गेली?

धनवान माणसं जिथं
 फटाक्यांची आतिशबाजी करी.
तेथूनच न फुटलेले फुसके
 फटाक्यांवरच आमच्या मुलाबाळांसह
 दिवाळी साजरी  झाली
दिवा लावण्या तेलही
 नाही आमच्या घरी
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?

पानाफुलं व पिठाच्या उटण्याची जागा
 आता सुगंधी तेल साबणानं घेतली
फराळ करण्यासाठी आता
 माऊलींच्या एकमेकांची सोबतही संपली
प्रेम माया सगळी आता
 फराळाच्या रेडीमेड पाकिटात कोंबली
कसं सांगू तुम्हा माझी
 दिवाळी कशी गेली?

भावाची बहीणीला भेटण्याची आतुरता
मित्रांना मित्रांची वाटणारी कमतरता
गॅझेटच्या दुनियेत संपत चाललेली माया ममता
सर्व काही दुराव्याची सुरवात
 whatsapp
 मेसेजनेच सुरू केली
कसं सांगू तुम्हा माझी
 दिवाळी कशी गेली?

चार दिवस दिवाळी सण
पण नाही रमलं माझ मन
कोणाच्याही घरी भेटायला न जाणं
नुसत मेसेज वर शुभेच्छांचं देणं नी घेणं
माणसातली माणूसकी या
 मोबाईल मुळे हरपली
कसं सांगू तुम्हा माझी
 दिवाळी कशी गेली?

✍✍✍✍✍✍