whatsapp वरच्या मेसेजने
माझी विचारशक्ती सुन्न झाली
जो तो म्हणतो मला तुझी
दिवाळी कशी गेली?
रक्त आटत तवं
मेहनत आम्ही केली
दुष्काळाच्या कचाट्यात
पीकं माझी करपली
करपलेल्या पिकांसोबत
स्वप्नही हरपली.
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
खिशात दमडी नसतानाही
बाजारात कुटूंबाचा आग्रहने जाई
गजबजलेला बाजार पाहून
मन चलबिचल होई.
मुलासाठी मी कपडे खाऊ
घेण्यासाठी होती नव्हती
तेवढी लक्ष्मी गेली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
धनवान माणसं जिथं
फटाक्यांची आतिशबाजी करी.
तेथूनच न फुटलेले फुसके
फटाक्यांवरच आमच्या मुलाबाळांसह
दिवाळी साजरी झाली
दिवा लावण्या तेलही
नाही आमच्या घरी
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
पानाफुलं व पिठाच्या उटण्याची जागा
आता सुगंधी तेल साबणानं घेतली
फराळ करण्यासाठी आता
माऊलींच्या एकमेकांची सोबतही संपली
प्रेम माया सगळी आता
फराळाच्या रेडीमेड पाकिटात कोंबली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
भावाची बहीणीला भेटण्याची आतुरता
मित्रांना मित्रांची वाटणारी कमतरता
गॅझेटच्या दुनियेत संपत चाललेली माया ममता
सर्व काही दुराव्याची सुरवात
whatsapp
मेसेजनेच सुरू केली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
चार दिवस दिवाळी सण
पण नाही रमलं माझ मन
कोणाच्याही घरी भेटायला न जाणं
नुसत मेसेज वर शुभेच्छांचं देणं नी घेणं
माणसातली माणूसकी या
मोबाईल मुळे हरपली
कसं सांगू तुम्हा माझी
दिवाळी कशी गेली?
✍✍✍✍✍✍
No comments:
Post a Comment