पुरोगामी महाराष्ट्रात ‘बेटी बचाओ’ची झूल पांघरून, गर्भलिंग चाचण्या करून, मुलींच्या निष्पाप जिवाला संपवणाऱ्या पुढारलेल्या प्रदेशापेक्षा पेठसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी सणसणीत चपराक दिली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या मुलींच्या जन्मदर आकडेवारीत पेठ तालुक्यात हजारी १०३२ मुलींना जन्म देऊन अव्वल स्थान पटकावले आहे.
येवला (९७०) तालुक्याने दुसऱ्या, तर देवळा (९४६) तिसऱ्या स्थानावर आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मुलींचा जन्मदर असा -
पेठ- एक हजार ३२, येवला- ९७०, देवळा- ९४६,
कळवण- ९३२, बागलाण- ९२९, नांदगाव- ९२५,
निफाड- ९२३, सुरगाणा- ९२०, नाशिक- ९२०,
दिंडोरी- ९११, मालेगाव- ८९९, त्र्यंबकेश्वर- ८८७,
इगतपुरी- ८७८, चांदवड- ८५८, सिन्नर-८४४
No comments:
Post a Comment