THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 3 April 2017

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार

मूळ संविधानात मोफत  सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा समावेश मार्गदर्शक तत्त्वांमध्येकरण्यात आला होतासंविधानाच्या निर्मितीनंतर 10 वर्षांच्या आत शासन मोफत सक्तीच्या शिक्षणास मुलभूत अधिकाराचा दर्जा देईल अशी संविधानकर्त्यांची अपेक्षा होती.
2.    सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये जगण्याच्या मुलभूत अधिकाराचा (अनुच्छेद21) विस्तार केला असून तो सन्मानाने जगण्याचा अधिकार आहेअसे प्रतिपादन केलेलेआहेप्राथमिक शिक्षणाशिवाय हा अधिकार अपूर्ण राहात असल्याचे मत सर्वोच्चन्यायालयाने नोंदविलेले होते.
3.    2002मध्ये 86व्या घटना दुरुस्तीद्वारे प्राथमिक शिक्षणाच्या अधिकाराला मुलभूतअधिकाराचा दर्जा प्राप्त झालामुलभूत अधिकार याचा अर्थ प्रत्येक भारतीयाला जन्मतःप्राप्त होणारे अधिकारते (घटनेचा संकोच केल्याशिवायसंसदेलाविधिमंडळालाकेंद्रकिंवा राज्य शासनाला हिरावून घेता येत नाहीत.
4.    या घटनादुरुस्तीमुळे देशातील 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालायेथे शिक्षण बालकांसाठी `मोफतशासनासाठी शिक्षण देण्याची `सक्ती', असे अभिप्रेत आहेयाशिवाय 6 वर्षांपर्यंतच्यामुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीही मार्गदर्शक तत्वांद्वारे शासनावर आली आहे.
5.    घटना दुरुस्तीने बहाल केलेला हा अधिकार प्रत्यक्षात अंमलात आणता यावा यासाठीकेंद्राने  `बालकांचा मोफत  सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, 2009'मध्ये पारित केला.घटना दुरुस्ती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी दिनांक 1 एप्रिल 2010 रोजी कायदादेशभरात लागू झाला.
6.    मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेऊ शकणाऱयाइंटरनॅशनल स्कूलआयसीएसईकाऊन्सिलसीबीएसई बोर्डप्रायोगिक शाळा किंवा खाजगी शाळा असे पर्याय असणाऱयापालकांकडे या कायद्याने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करायचा किंवा नाही याचापर्याय आहेहा कायदा खरे तर जे आजपर्यंत शिक्षणाच्या कक्षेत येऊ शकले नाहीत,त्यांच्यासाठी आहेज्यांची पहिली पिढी शिकतेय अशा आदिवासींसाठीभटक्या-विमुक्तांसाठीस्थलांतर करणाऱया ऊसतोडणी अथवा बांधकाम मजुरांसाठीअपंगांसाठी,बालकामगारांसाठी आणि आर्थिक-सामाजिक विषमतेचे बळी ठरलेल्या लाखोंसाठी हाकायदा आहे
  7.  मोफत प्राथमिक शिक्षणशासनावर शिक्षण देण्याची सक्तीशाळाबाह्य मुलांनाशिक्षणाच्या   प्रवाहात   येण्याची संधीठरावीक परिसरात शाळेची उपलब्धताजन्म दाखलानसल्याच्या कारणास्तव प्रवेश नाकारता येणार नाहीशाळांना डोनेशन घेता येणार नाही,वर्षभरात कधीही शाळेत दाखल होण्याची संधीमुलांचा शारीरिक  मानसिक छळ करण्यासशाळांना मज्जावपालकांचा सहभाग असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांची निर्मिती अशाअनेक चांगल्या तरतुदी या कायद्यात आहेत.

No comments:

Post a Comment