THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 25 April 2017


MY BLOG COMPLETED 20000 VIEWS TODAY.THANK YOU FOR  HUGE RESPONSE...................

Sunday, 23 April 2017

download

मराठी सराव प्रश्नपत्रिका mscert
download

गणित सराव प्रश्नपत्रिका mscert
 download


 द्विभाषिक पुस्तकांची अद्ययावत यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

download 

महत्त्वाच्या लिंक 

शाळासिद्धी लिंक 
http://shaalasiddhi.nuepa.org/ 

शिक्षक सक्षमीकरण प्रतिनियुक्ती  लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzfaVdKs9bdD3NIUpGT_CcAiAnpPtguf3QyL1yiGBjbaFW4Q/viewform?c=0&w=1


 शाळा सिध्दी रजिस्ट्रेशन लिंक

http://shaalasiddhi.nuepa.org/

परदेश अभ्यास दौरा लिंक
https://www.research.net/r/teacherstudytour

डिजीटल व ईलर्निंग शाळा लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdr-kRE7ZcQaFVDeuJu3iEIbA_4f-92pqzZK-STRnKC-TzXFQ/viewform


गणित मराठी प्रशिक्षण मागणी लिंक
https://www.research.net/r/teacherstraining9SFVTXN

ब्लॉग व वेबसाईट नोंदणी लिंक
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScY8yarwwbZQ_MJBRZy3c-QaulHSQwMPDFDmmJtm-Eh4b5UUw/viewform
आधार
https://eaadhaar.uidai.gov.in/eaadhaar/

आंतरराष्ट्रीय शाळा लिंक
https://www.research.net/r/maharashtrainternationalschools

इंग्रजी प्रशिक्षण मागणी लिंक

https://goo.gl/forms/AsEARe2t4Y8GkPJF2

शिक्षणाची वारी लिंक
https://www.research.net/r/wari2016

गणित  प्रगल्भीकरण  प्रशिक्षण मागणी लिंक
https://www.research.net/r/mathstraining

सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना लिंक
https://etribal.maharashtra.gov.in/evikas/main/common/aboutevikas.aspx

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती लिंक
http://mahaeschol.maharashtra.gov.in

तंत्रस्नेही कार्यशाळा नोंदणी लिंक
http://www.technoteachers.in/registration.php

inspire aword  लिंक
http://www.inspireawards-dst.gov.in/

सरल समस्या पाठवा  लिंक
http://goo.gl/9vBAQ8*

अल्पसंख्यांक शिष्यवृती
http://www.scholarships.gov.in/

स्वच्छ विद्यालय पुरस्कार
www.mhrd.gov.in

दहावी व बारावी मार्कलिस्ट व प्रमाणपत्र लिंक
http://www.boardmarksheet.maharashtra.gov.in

सरल
www.education.maharashtra.gov.in

स्कुल रिपोर्ट कार्ड
http://www.schoolreportcards.in

  कोणत्याही शाळेचा  udise शोधा
http://www.depmahonlinemis.com/udise/district.aspx

राज्य पुरस्कार
http://www.research.net/r/purskar

शासननिर्णय
www.maharashtra.gov.in 

इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती
https://www.research.net/r/english2marathi

अतिरिक्त कर्मचारी व रिक्त कर्मचारी माहिती
http://www.eduonlinescholarship.com/Teachers/TSummary.aspx

शाळेकडील अखर्चित निधी
http://www.research.net/r/Fj3QKJL

नवोपक्रमशील शाळांची माहिती 
https://www.research.net/r/3BR9CQQ 

Friday, 21 April 2017

जुन्या पेंशनची बात

प्रेरणा - पत्रकार मा.मारुती फाळके सर

चाल - खेळ मांडला

जुन्या पेंशनची बात कागदावं राही

साद देती कर्मचारी ऐकंना हो कुणी

आंदोलनं करुनही जाग कुणा नाही

हरवली वाटदिशा अंधारल्या दाही

आधार हा वार्धक्याचा लागे टांगणीला

आधार ह्यो का रे खुंटला....

खेळ मांडला... खेळ मांडला...
सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा

तूच वाट दाखीव गा खेळ मांडला

दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा

ह्यो तुझ्याच उंबर्‍यात खेळ मांडला

कुटुंबकल्याण बंद झालं आधार कुणाचा न्हाई

परिभाषिक अंशदायी योजना,उध्वस्त कुटुंब पाही

बळ दे लढायाला निर्वाहाचा मार्ग दे

इनविती लाभार्थी हे आतातरी न्याय दे

करपलं आश्वासन जळलं निवेदन

तरी न्हाई धीर सांडला.....

खेळ मांडला.... खेळ मांडला....

Thursday, 13 April 2017

Maths up marathi अॅप चे अनावरण

Maths up marathi अॅप चे अनावरण

42व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पेठ ता. वाळवा येथे ज्ञानेश्वर पंडित जाधव सर यांच्या Maths up गणित पाढे या भन्नाट  app चे उदघाटन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. धनंजय महाडिक,शिराळा विधानसभेचे आमदार मा. शिवाजीराव नाईक,शिक्षक आमदार मा. भगवानराव साळुंखे, जेष्ठ संशोधक मा. राजेंद्र शेंडे,शिक्षण उपसंचालक मा. गोंधळे साहेब, उपसंचालिका मा. अचलाजी जडे मॅडम व इतर मान्यवर यांचे हस्ते करण्यात आले.

या app मध्ये बेरीज संकल्पना, वजाबाकी संकल्पना,गुणाकार, भागाकार, दररोज बदलणारी शेकडो उदाहरणे आहेत. तसेच संगीतमय पाढे समाविष्ट आहेत.(पाढे स्वतः सौ. प्रतिभा दी कदम यांनी गायले आहेत.)


खालील बटणावर क्लिक करून जाधव सरांचे तुम्ही हे app डाउनलोड करू शकता.

डाऊनलोड करा व आपली प्रतिक्रिया सरांना जरुर कळवा.. 9422238513

1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर

1 ली ते 8 वी चा रिझल्ट बनवाचे EXCEL सोफ्टवेअर

नमस्कार .

परीक्षा संपल्या आता मुलांचा रिझल्ट लावण्याची तयारी  करा !

आपल्या साठी नवीन अशी EXCEL शिट घेऊन आलो आहे  त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण  भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट आपोआप तयार होतो  फोटो सह .

जसे  सर्व मुलांची ....
  टक्केवारी  आपोआप तयार होतात ! 
 श्रेणी  आपोआप तयार होतात !
 विषयनिहाय निकाल आपोआप तयार होईल.
 प्रथम/ द्वितीत सत्र निकाल आपोआप तयार होतात !
 Annual result  आपोआप तयार होतात !
 गुणपत्रक  आपोआप तयार होतात !
  नोंदी आपोआप तयार होतात !


Excel फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील Download बटनावर क्लिक करा


शिक्षकांचे नाव 

डाउनलोड लिंक 

    



  


  



या FILES EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP  मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !




.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना  स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती. 

कसे वापरावे 


1)  STU. INFORMATION, FIRST SEMESTEER, SECOND SEMESTER मध्ये   माहिती भरावी.

2)  विद्यार्थी फोटो ठिकाणी फोटो टाका. 

3)  प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल, नोंदवही, गोषवारा व निकाल पत्रक direct

4)  पटसंख्या कमी असल्यास sheet  शाळेकरिता वापरा. जास्त असल्यास वर्गा   करिता वापर करा. 
तयार होतो. 5)  दाखल खारीज क्र. टाकून त्या विद्याथ्यांचे नोद्वाही व प्रगती प्रत्रक direct पाहू किंवा print काढता येईल.   
6 )इयत्ता टाकतांना 1ला, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, 8वा असेच टाकावेत.  तरच गोषवारा तयार होईल. 

My Blog visited by 18000 people.

Pageviews last month
8,843
Pageviews all time history
18,002
Followers
0

Tuesday, 11 April 2017

pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile

Watch "pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile" on YouTube https://youtu.be/b6PydTDMbT0
नमस्कार मित्रांनो
★ ✅इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संगणकाची गरज नाही
★ ✅फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचा फोटो स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र स्कॅनर ची गरज नाही
★✅ऑनलाईन फॉर्म भरा तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर अगदी सोप्या पद्धतीने
★✅तुमच्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे फोटो आणि documents कसे स्कॅन करायचे ? त्यासाठी camscanner या अँप चा कसा वापर करायचा हे वरील व्हिडिओत दाखवले आहे
★✅online फॉर्म भरताना स्कॅन केलेल्या फोटोंची size 50 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे
मग तुमच्याकडील फोटोंची size कशी कमी करावी याची अहिती या व्हिडिओत आहे
★✅वरील व्हिडिओत अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याची माहिती दिली आहे
★✅तेव्हा इंटरनेट कॅफे किंवा तद्न्य व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही हा व्हिडीओ पहा आणि स्वतःच्या शाळेतील शिष्यवृत्ती फॉर्म स्वतःच भरा
★ ✅एक फॉर्म भरूनच पहा , 
------------------------------------
माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना नक्की शेअर करा ��

Friday, 7 April 2017

Excel software for संकलित मूल्यमापन 2016-17, संकलित मूल्यमापन तक्ते ,भाषा व गणित श्रेणी तक्ते,संकलित प्रश्नपत्रिका

Excel software for संकलित मूल्यमापन 2016-17, संकलित मूल्यमापन तक्ते ,भाषा व गणित श्रेणी तक्ते,संकलित प्रश्नपत्रिका

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात आलेल्या भाषा आणि गणित विषयाच्या परीक्षा झाल्या !

आता सर्वात जिकरीचे काम आहे सर्व वर्गांच्या गुणांची बेरीज करणे, श्रेणी काढणे आणि सर्व शाळेचा गोषवारा तयार करणे !

  💠 For Download Excel Software 💠  
    Click Hear ( Add )
  http://click.union.ucweb.com/index.php?service=RedirectService&pub=admin@bmcschools&offer_id=com.mobile.android.indiapp.apk

परंतु Excel tip & trick या ग्रुप मधील एक्सल तज्ञांनी आपल्या साठी Excel software तयार केले असून त्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचे गुण भरल्यावर सर्व काम सोप्पे होते 

⏭ गुणांची बेरीज आपोआप होते
⏭ टक्के वारी आपोआप होते, 
⏭ श्रेणी आपोआप निघते
⏭ शाळेची श्रेणी 
⏭  शाळेचा गोषवारा आपोआप निघते
  बरेच काही ..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 ह्रषिकेश चौधरी सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा (1 ते 8 )








➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 पंकज रासकर सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी ( 1ते 7 )खाली क्लिक करा.

🔘 भाषा विषय ⏭ 



🔘 गणित विषय ⏭



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 योगेश भगत सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी खाली क्लिक करा (ई. 1 ते 4)



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔯 अनिस शाह सरांचे सॉफ्टवेअर डाऊनलोड 
करण्यासाठी ( ई.1ते 8 ) खाली क्लिक करा.



➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔯 इतर शालेय उपयोगी महत्वाचे एकूण 60 एक्सल सॉफ्टवेअर
 डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !




➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


animated-new-image-0053  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (#MPSC) मैं क्लार्क के 408 पदो कि भर्ती

pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile

pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile

Watch "pre upper primary 5th and pre secondery 8th scholarship form filling with android mobile" on YouTube https://youtu.be/b6PydTDMbT0
नमस्कार मित्रांनो
★ ✅इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संगणकाची गरज नाही
★ ✅फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचा फोटो स्कॅन करण्यासाठी स्वतंत्र स्कॅनर ची गरज नाही
★✅ऑनलाईन फॉर्म भरा तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर अगदी सोप्या पद्धतीने
★✅तुमच्या अँड्रॉइड मोबाईल द्वारे फोटो आणि documents कसे स्कॅन करायचे ? त्यासाठी camscanner या अँप चा कसा वापर करायचा हे वरील व्हिडिओत दाखवले आहे
★✅online फॉर्म भरताना स्कॅन केलेल्या फोटोंची size 50 kb पेक्षा कमी असणे आवश्यक आहे
मग तुमच्याकडील फोटोंची size कशी कमी करावी याची अहिती या व्हिडिओत आहे
★✅वरील व्हिडिओत अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे याची माहिती दिली आहे
★✅तेव्हा इंटरनेट कॅफे किंवा तद्न्य व्यक्तीकडे जाण्याची गरज नाही हा व्हिडीओ पहा आणि स्वतःच्या शाळेतील शिष्यवृत्ती फॉर्म स्वतःच भरा
★ ✅एक फॉर्म भरूनच पहा , 
------------------------------------
माहिती उपयुक्त वाटत असेल तर इतरांना नक्की शेअर करा ��

Tuesday, 4 April 2017

पुरोगामी महाराष्ट्रात ‘बेटी बचाओ’ची झूल पांघरूनगर्भलिंग चाचण्या करूनमुलींच्या निष्पाप जिवाला संपवणाऱ्या पुढारलेल्या प्रदेशापेक्षा पेठसारख्या आदिवासीबहुल तालुक्‍यातील आदिवासी बांधवांनी सणसणीत चपराक दिली आहे.
  नुकत्याच जाहीर झालेल्या मुलींच्या जन्मदर आकडेवारीत पेठ तालुक्‍यात हजारी १०३२ मुलींना जन्म देऊन अव्वल स्थान पटकावले आहे.
  येवला (९७०) तालुक्‍याने दुसऱ्यातर देवळा (९४६) तिसऱ्या स्थानावर आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय मुलींचा जन्मदर असा -
पेठ- एक हजार ३२येवला- ९७०देवळा- ९४६,
कळवण- ९३२बागलाण- ९२९नांदगाव- ९२५,
निफाड- ९२३सुरगाणा- ९२०नाशिक- ९२०,
दिंडोरी- ९११मालेगाव- ८९९त्र्यंबकेश्‍वर- ८८७,
इगतपुरी- ८७८चांदवड- ८५८सिन्नर-८४४

RTE कायदा

RTE कायदा

right to education 2009RTE

रचनावाद

रचनावाद

सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी
काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्यांच्या कुशीत
वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा
आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या
मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन
वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची
निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर
होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं
शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा
मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य
स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग
बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्वास
बसत नाही. सातार्याजवळच वाईमध्ये ‘भारत
विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी
शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी
त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ
ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता
बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर
माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला
आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं
असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच
शाळेत मला पहिल्यांदा समजलं.
रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं
कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित
केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्यापैकी झोपला.
एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक
(मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण
एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन
म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी
तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं.
शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन
वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १
मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग
अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं
शिकवू असं ठरलं.
मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच.
शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं,
शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात.
त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या.
पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा
परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील
अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून
सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन
शाळांतली खेळणी दुसर्या दिवशी चोरीला गेली.
वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं
लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी
रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार
दिसते आहे.
शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं
ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा
सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा
खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा
खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या,
काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी
यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा
समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं
या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या.
खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय
घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच
मदत झाली.
हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट,
रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल
शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले.
हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता.
मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं
बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा
घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं
वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं
वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते
ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून
निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं
नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण
शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत
नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत
वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण
हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही
शिकण्याची पायरी आहे’.
रचनावादाची तयारी करताना एकेका
मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं
लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार
करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र
बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना
वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं
यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार
‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते
दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं
गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर
लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे
समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत
पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं
गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं
त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती.
एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत
होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात
घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच
शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते
पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द
मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती.
मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो
मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती
एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती.
रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना
आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं
स्वत: शिकत आहेत.’
-शब्दांकन
-प्रतिभा भराडे मँडम
[विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]
----------------------------------------------------------
रचनावादावरील कुमठे बीट
रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण
महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट
पँटर्न गाजताेय सन २०१५-१६ प्रयाेगीक तत्वावर
काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार
आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन
त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले
त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना
शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता
शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण
निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची
आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली
तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९
शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही ...
ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???
१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु
शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन
असणार्या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ
गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात
१०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज
मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद
अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद
अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला
आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास
महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम
आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये
मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा
न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा
होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी
बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण
चांगले होते.
इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज
१०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले
परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच
Myselfप्रमाणेMy friend My School My Teacher
घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5
घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन
भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word one
sentence one question असा शब्दावरुन वाक्य
सांगणे प्रश्न तयार करणे.अशा गोष्टी सातत्याने घेणे.
वर्गतयारी मार्चपासुन पहिली वर्ग सुरु मुले
खेळण्यात रमतात.सोपी बडबडगीते घेतो.
उपक्रम=१)मोठ्या चित्रांची पुस्तके पहाणे
चित्रवर्णन करणे.२)चित्रगप्पा मारणे३)आठवड्यातुन
एकदा ठरवुन गप्पा मारणे.४) न ठरवता गप्पा
मारणे.५)वाचनासाठी चित्रशब्दवाचनएकत्र नंतर
फक्त चित्रवाचन व नंतर फक्त शब्दवाचन =
पाचचित्रकार्डसंच लागोपाठ दोन दिवस
द्यावेत.संयम ठेवावा.६)चित्राशी शब्द जोड्या
लावणे खेळ घेणे.प्रत्येक विद्यार्थ्यास स्वतंत्र संच
हवा.
हिमोग्लोबीन कमतरतेचा मेंदुवर बौध्दीक क्षमतेवर
परिणाम होतो.यासाठी कुमठे बीटात सर्व शाळांत
सेंद्रियशेती केली जाते कसदार माती बनवली जाते
त्यातील भाज्या शालेय पोषण आहार टाकल्या
जातात.
मराठी विषय. शाळा मुलांसाठी आहेत अधिकारी
आलेतरी मुले कामांत मग्न असतात.सप्टेंबरपर्यंत मुले
वाचु लागतात.
उपक्रम=१)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन
घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये
बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम १)धुळपाटीवर लेखन २)हवेत अक्षर
गिरविणे.३)समान अक्षर जोड्या लावणे.४)अक्षर
आगगाडी बनवणे.५)पाहुणा अक्षर
ओळखणे.६)चित्रशब्द वाक्यवाचन
करणे.७)बाराखडीवाचन करणे.८)बाराखडीतक्तेवाचन
करणे.९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द
वाचणे.१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.११)कथालेखन
करणे.१२)कवितालेखन करणे.१३)चिठठीलेखन
करणे.१४)संवादलेखन करणे.१५)मराठी शब्दकोशात
शब्द शोधणे.
गणित १)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे२)वर्गातील
वस्तु मोजणे३)अवयव मोजणे४)कार्डसंख्या पाहुन वस्तु
मांडणे५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने
आत जाणे.६)आगगाडी तयार करणे७)दोघींनी मिळुन
संख्या बोटावर दाखवणे.८)माळेवर मणी मोजुन
संख्या दाखवणे.९)अंकाची गोष्ट सांगणे.१०)बेरीज
व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.११)बेरीज
उभी आडवी मांडणी करणे १२)चौकटीची जागा
बदलुन उदाहरण सोडवणे.१३)बेरीजगाडी तयार
करणे.१४)अंकांपुढे वस्तु मांडणे १५)गठ्ठे सुट्टे
सांगणे१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४
वेळा घेणे.

पहिली ते पाचवी मूल्यमापन नोंदी

. पहिली ते पाचवी मूल्यमापन नोंदी
===== भाषा मराठी===============
०१. परिपाठात सहभागी होतो.
०२. मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो.
०३. चित्रावरून गोष्टीचा अर्थ सांगतो.
०४. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
०५. झाडांचे प्राण्यांचे निरिक्षण करतो.
०६. कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो.
०७. विरुद्धार्थी शब्दांची यादी बनवतो.
०८. बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो.
०९. गोष्टी सांगतो.
१०. आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
११. सूचना ऐकून पालन करतो.
१२. स्वत:हून प्रश्न विचारतो.
१३. कविता तालासुरात म्हणतो.
१४. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो.
१५. वेळोवेळी प्रश्न विचारतो.
१६. दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो.
१७. वेगवेगळ्या वस्तूंचे रंग सांगतो.
१८. योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो.
१९. प्राणीमात्रावर दया करतो.
२०. व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो.
२१. हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
२२. मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो.
२३. परिसरातील माहिती मिळवतो.
२४. प्रभावीपणे प्रकटवाचन करतो.
२५. झेन्धावंदन चित्र काढतो.
२६. ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो.
२७. गाणी व बडबड गीते म्हणतो.
२८. लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो.
२९. नेहमी शाळेत वेळेवर येतो.
३०. नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो.
३१. नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूपकरतो.
३२. दरवर्षी वाढ दिवसाला एक झाड लावतो.
३३. भाषण, संभाषण ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो.
३४. स्वच्छ व टापटीप राहतो.
३५. बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
३६. चांगल्या सवयी सांगतो.
३७. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो.
३८. एका अक्षरावरून अनेक शब्द बनवतो.
३९. बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो वइतरांना माहिती सांगतो.
४०. मोठ्यांचा मान ठेऊन बोलतो.
४१. ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो.
४२. काळजीपूर्वक श्रवण करतो.
४३. बोधकथा सांगतो.
४४. स्वत च्या भावना यौग्य व्यक्त करतो.
४५. पाठातील शंका विचारतो.
४६. सुचवलेला भाग स्पष्ट आवाजात वाचतो.
४७. प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.४८. प्रश्न तयार करतो.
४९. वाचनाची आवड आहे.
५०. श्रुतलेखन यौग्य करतो.————————————————————————————————–————————————————————————————————–========== English============
01. Can speak on topic.
02. He can express his feelings.
03. He takes participation in activity.
04. He can speak in English.
05. Listen and write words.
06. He can writes spellings of colours.
07. Sings rhyms in toning.
08. Answer properly for questions.
09. He guide to other students.
10. He listen cearfully.
11. He participates in conversation.
12. Read with pronounciation.
13. He can repeat the words properly.
14. He can use English languge.
15. Guide to other students.
16. He can write oppsite words.
17. He can speak confidently in English.
18. Can tell a story from pictures.
19. Always complits his homework.
20. He can able to show the words.
21. He can make meny sentences with one word.
22. He gives right answers.
23. He can read loudly and cearfully.
24. Can able to tell story his own words.
25. Listen and write correctly.=========== गणित============
०१. ठीपक्याच्या मदतीने रेषा काढतो.
०२. लहान मोठ्या संख्या ओळखतो.
०३. बांगडीच्या साह्याने वर्तुळ काढतो.
०४. संख्या वाचन करतो.
०५. नाणी व नोटा ओळखतो.
०६. संख्याचा क्रम ओळखतो.
०७. लहान गणिते तयार करतो.
०८. संख्या अक्षरी लिहितो.
०९. उभी , आडवी मांडणी करून गणिते सोडवतो.
१०. संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो.
११. वस्तूंचे मापन करतो.
१२. बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रियासमजून घेतो.
१३. बेरजेची तोंडी उदाहरणे सोडवतो.
१४. गुणाकाराने पाढे तयार करतो.
१५. पाढे नियमित पाठ करतो.
१६. अक्षरी संख्या अंकात मांडतो.
१७. सूचना लक्षपूर्वक ऐकतो.
१८. गणितीय कोडी सोडवितो.
१९. गणिते पायऱ्या पायऱ्याने सोडवतो.
२०. गणितीय चिन्हे ओळखतो.
२१. स्वाध्याय स्वतः सोडवतो.
२२. गणितातील सूत्रे समजून घेतो.
२३. दिशा यौग्य सांगतो.
२४. संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो.
२५. वस्तूंची तुलना करतो.
२६. उदाहरणे गतीने सोडवितो.
२७. सांगितलेल्या रकमेएवढी रक्कम बाजूला काढतो.
२८. संख्या विस्तारीत रूपात लिहितो.
२९. शाब्दिक उदाहरणे तयार करतो.
३०. संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो.
३१. यौग्य आलेख काढतो.
३२. आलेखाचे वाचन करतो.
३३. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो.
३४. विविध सूत्रे सांगतो.
३५. सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो.
३६. सोडवलेल्या उदाहरणांचा ताळा पाहतो.
३७. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो.
३८. भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो.
३९. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो.
४०. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो.
४१. संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो.
४२. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो.
४३. अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो.
४४. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो.
४५. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो.
४६. इतरांचे पाढे पाठ करून घेतो.
४७. विविध भौमितिक संबोध समजून घेतो.
४८. कोणाचे प्रकार तंतोतंत काढतो.
४९. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो.
५०. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो.————————————————————————————————–————————————————————————————————–============= कला==========
०१. वेगवेगळ्या प्राण्यांची गीते म्हणतो.
०२. यौग्य तालासुरात टाळ्या वाजवतो.
०३. वेगवेगळ्या नकला करतो.
०४. वेगवेगळ्या प्राण्यांची , पक्ष्याची आवाज काढतो.
०५. चित्रात यौग्य रंग भरतो.
०६. स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवतो.
०७. फार छान नृत्य करतो.
०८. दिलेल्या साहित्याचा यौग्य वापर करतो.
०९. वेगवेगळे चित्रे न पाहता काढतो.
१०. वर्ग सजावट चांगली करतो.
११. वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होतो.
१२. मातीपासून बैल चांगला बनवतो.
१३. गाणी , कविता यौग्य तालात व कृतीयुक्त म्हणतो.
१४. कागदापासून वेगवेगळ्या प्रकारची टोपी बनवतो.
१५. सामाजिक उपक्रमात सहभागी होतो.
१६. गोष्टी आपल्या शब्दात सांगतो.
१७. एकपात्री प्रयोग करतो.
१८. मातीपासून गणपती चांगला बनवतो.
१९. वेगवेगळ्या वाहनांचे आवाज काढतो.
२०. वेगवेगळ्या वस्तूंवर नक्षिकाम करतो.
२१. पारंपारिक गीते म्हणतो.
२२. घरातील वस्तूंचे आकार काढतो.
२३. भेंडीचे , बोटाचे ठसे उमटून छान डिझाइन बनवतो.
२४. काचेच्या बांगडीच्या तुकड्यापासून नक्षि बनवतो.————————————————————————————————–————————————————————————————————–============= आवड===========
01. कार्यानुभवातील वस्तु बनवितो.
02. कथा,कविता,संवाद लेखन करतो.
03. उपक्रम तयार करतो.
04. प्रतिकृती बनवतो.
05. संगणक हाताळतो.
06. गोष्टी ऐकतो.
07. रांगोळी काढतो.
08. प्रवास करतो.
09. सायकल खेळतो.
10. चित्रे काढतो.
11. खो खो खेळतो.
12. क्रिकेट खेळतो.
13. नक्षिकाम करतो.
14. व्यायाम करतो.
15. गोष्टी वाचतो.
16. वाचन करतो.
17. चित्रे काढतो
18. गोष्ट सांगतो.
19. अवांतर वाचन करतो .
20. गणिती आकडेमोड करतो.
21. गाणी -कविता म्हणतो.
22. नृत्य,अभिनय,नाटयीकरण करतो.
23. संग्रह करतो.
24. प्रयोग करतो.
25. स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी