THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday, 23 August 2024

राहुरीत शुक्रवारी तब्बल पाच इंच पाऊस

राहुरीत शुक्रवारी तब्बल पाच इंच पाऊस
राहुरीत शुक्रवारी 
दिवसभरात दोनदा जोरदार पाऊस झाला , सायंकाळी पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली .गेल्या तीन ते चार दिवसांपासून राहुरी शहरासह तालुक्यात पावसाची चांगली हजेरी दिसून आली . 

तीन दिवसांपूर्वी राहुरीत दोन दिवसात 100 मिलिमीटर पाऊस नोंद झाला होता. शुक्रवारी राहुरीत विक्रमी तब्बल 124 मिलिमीटर ( पाच इंच ) इतक्या पावसाची नोंद सतर्क राहुरी च्या पर्जन्यमापकावर नोंद झाली . गेल्या दोन वर्षातील हा विक्रम मानला जात आहे .

राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र व जिल्हा प्रशासनाने देखील शुक्रवारी दुपारनंतर नागरिकांच्या मोबाईल व सोशल मीडिया वर मेसेज पाठवून मुसळधार पावसाचा इशारा दिला होता .

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले तरी शुक्रवारी झालेला पाऊस हा सरासरी ओलांडणारा होता . कालच्या पावसाने अनेक ठिकाणी खरीपची पिके पाण्यात गेली आहे .आठवडाभरात ही दुसरी अतिवृष्टी असल्याने प्रशासनाने खरीप पिकांची पाहणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . शनिवारी देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे .

No comments:

Post a Comment