THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 1 March 2020

खरच सांगा गुरुजी*

*खरच सांगा गुरुजी*
=========================
*खरच सांगा गुरुजी.* कोण कुठं चुकलं
*शाळेमध्ये पोरगं* नेमकं काय शिकलं
*काॅप्या* पुरवुन *शाळेचं*
   काम तुम्ही खास केलं,
      *दहावीचं पोर* माझं
       झटक्यात *पास* केलं !
       पोरासगट माझा
      *सत्कार जाहिर* झाला.
      *सत्काराचा* माझ्या *गाजावाजा*
      *गावभर* झाला !
*माझ्यासह संस्थेचं, नाव* त्यानं राखलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
       *टक्केवारी* वाढवुन
       *पगार* तुमची *वाढली,*
      *पगाराची नशा*
       दारुसारखी *चढली !*
       अाता पोरगं अाकरावीत
      *भुगोल गणित* पचेना .
       *इंग्रजी*तर सोडाच 
       *मराठीही* वाचेना !
*परिक्षेच्या* भट्टीत, कच्चं *अांबं* पिकलं
*खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं*
        *अकरावीतुन बारावीत*
        तसच तुम्ही *रेटलं,*
        *फॅशनचे कपडे* घालुन
        नटावणी नटलं !
        *बारावीच्या* नखर्‍याला
        खुदकन हसलं,
       *चार विषयात* पोरगं
       गळ्याइतकं *फसलं !*
*मायेनं पदराखाली,* अाम्ही त्याला झाकलं
*खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं*
       शाळंसाठी पोराच्या
       नवं साल धरलं.
       विकु म्हणते *अाई* त्याची
       *गळ्यातिल डोरलं !*
       शाळा शिकुन पोरगं
      लय लय मोठं होईल,
      *अाईच्या सपनाला*
      *सुखाचं फुल* येईल !
सुखाचं सपान, डोळ्यातच सुकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
       *शाळंला पोरानं*
       राम राम ठोकला,
       *पुस्तकाचा* डिगारा 
       किलोवर *विकला !*
      अाता *पोरगं हॅाटेलात*
      काम करु लागलं,
      *खंगलेल्या संसाराला*
      धिर देवु लागलं !
अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
*शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं*
___________________
आजच्या *आठवी* पर्यंन्त *पुढच्या वर्गात ढकलणे* व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत हे विशद करणारी शिक्षण व्यवस्थेतील उणीव दर्शविनारी *सुंदर कविता.*

No comments:

Post a Comment