THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 14 November 2016

कृतिसंशोधन

कृतिसंशोधन

कृतिसंशोधन

*संकल्पना-                                                                                                                                  
                शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.

                दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.

                डॉ. स्टीफन कोवे – आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय.

*कृतिसंशोधनाची उद्दिष्टे – 

१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.

२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे.

३. निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामकाजात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.


*कृतिसंशोधनाच्या पाय-या –

               शालेय विषयांतील एखाद्या समस्येचे निराकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना कृतिसंशोधनातील टप्प्यांचा आधार घ्यावा लागतो. ते टप्पे / पाय-या पुढीलप्रमाणे-

१. स्थूल समस्या

२. निश्चित समस्या

३. संभाव्य कारणे

४. गृहीत कृत्य

५. वस्तुस्थितीनिश्चिती

६. उपाययोजना

७. मूल्यमापन

८. उपयोजन

                                                                                                                                                                                       

  *अहवाल लेखन – 
                आराखड्यानुसार संशोधन कार्य पूर्ण झाले की त्याचा अहवाल लिहून काढणे ही त्या कार्याची इतिश्री असते.
संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्.ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.


          कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे तीन विभाग असतात.


१) प्राथमिक विभाग - 
 मुखपृष्ठ
 प्रथम पृष्ठ
 दाखला / प्रतिज्ञापत्र
 ऋणनिर्देश
 अनुक्रमणिका

    २) प्रमुख विभाग – 

     संशोधन विषयाची ओळख
     संशोधनासंबंधित साहित्याचा आढावा
     संशोधनाची कार्यवाही
     माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन
     सारांश, निष्कर्ष व शिफारशी


      ३) अंतिम विभाग -

       ग्रंथसूची
       परिशिष्टे

      No comments:

      Post a Comment