THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 14 November 2016

शालेय परिपाठ

शालेय परिपाठ

परिपाठाचा नमुना

प्रस्‍तावना:-

           

      प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न-

प्रयत्न:-



    प्राथमिक शाळेतील इ.५ वी ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गात पाडावेत व पुढील रुपरेषेनुसार परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा.
·   सावधान- विश्राम:- ऑर्डर देणाऱ्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांना सूचना कराव्यात.
·    राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात राष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्रयत्न करावा.
·    प्रतिज्ञा :- आठवड्यात ६ दिवस शाळा भरते. एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.
·    भारताचे संविधान :- परीपाठातील एका विद्यार्थ्याला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे विद्यार्थी मागे म्हणतील.
·    प्रार्थना :- ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ्यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सांगावे.
ज्या १० विद्यार्थ्यांना (मुले- मुली) परिपाठ असेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.

ऑर्डर देणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दाखवेल.



“ उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “
·  पंचांग– केव्हा दिवस उगवतो केव्हा दिवस मावळतो , कोणता वर आणि कोणती तारीख आहे. हे आपल्याला पंचांगाच्या माध्यमातून समजते. म्हणून आजचा घेऊन येत आहे. ( संबंधित विद्यार्थ्याचे नाव घेणे.)
·  दिनविशेष– उगवणाऱ्या प्रत्येक दिवशी काही न काही घटना घडून गेलेली असते आणि त्या उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटनांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे.
·  सुविचार– सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.
·  बोधकथा – कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शिकायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळते. म्हणून आजची बोधकथा घेऊन येत आहे.
·  बातमीपत्र– जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही ना काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद्वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असते. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे.
· प्रश्नमंजुषा– जगात ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. आता मिळालेले ज्ञान थोड्यावेळेने शिळे होत आहे. स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे. ( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्याना विचारावे.)
· इंग्रजी शब्दार्थ– इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे. ( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचारावेत.)
·  पाढे– गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे.( प्रतिदिन २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)
· समुहगीत– ओर्डर मिळाल्यास सर्व विद्यार्थ्यांनी मिळून समुह्गीत गायन करावे.
· पसायदान– बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा ताठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन व सरळ बसुन  समूहाचे पसायदान घ्यावे.
·  मौन– २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धरावे.
·  विसर्जन– हळुच डोळे उघडून शांत बसावे.

कृतिसंशोधन

कृतिसंशोधन

कृतिसंशोधन

*संकल्पना-                                                                                                                                  
                शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.

                दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.

                डॉ. स्टीफन कोवे – आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय.

*कृतिसंशोधनाची उद्दिष्टे – 

१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.

२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे.

३. निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामकाजात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.


*कृतिसंशोधनाच्या पाय-या –

               शालेय विषयांतील एखाद्या समस्येचे निराकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना कृतिसंशोधनातील टप्प्यांचा आधार घ्यावा लागतो. ते टप्पे / पाय-या पुढीलप्रमाणे-

१. स्थूल समस्या

२. निश्चित समस्या

३. संभाव्य कारणे

४. गृहीत कृत्य

५. वस्तुस्थितीनिश्चिती

६. उपाययोजना

७. मूल्यमापन

८. उपयोजन

                                                                                                                                                                                       

  *अहवाल लेखन – 
                आराखड्यानुसार संशोधन कार्य पूर्ण झाले की त्याचा अहवाल लिहून काढणे ही त्या कार्याची इतिश्री असते.
संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्.ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.


          कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे तीन विभाग असतात.


१) प्राथमिक विभाग - 
 मुखपृष्ठ
 प्रथम पृष्ठ
 दाखला / प्रतिज्ञापत्र
 ऋणनिर्देश
 अनुक्रमणिका

    २) प्रमुख विभाग – 

     संशोधन विषयाची ओळख
     संशोधनासंबंधित साहित्याचा आढावा
     संशोधनाची कार्यवाही
     माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन
     सारांश, निष्कर्ष व शिफारशी


      ३) अंतिम विभाग -

       ग्रंथसूची
       परिशिष्टे

      Sunday, 13 November 2016

      वाय-फाय राऊटरमधील फरक

      राऊटरमधील फरक
      वाय-फाय
      जुन्या वाय-फाय राऊटरची रेंज कमी पडू लागली, तेंव्हा मी एक नवीन वाय-फाय राऊटर विकत घ्यायचे ठरवले. फारसा विचार न करता ज्या राऊटरला सर्वाधिक रेटिंग्ज आहेत, ते वाय-फाय राऊटर मी ऑनलाईन मागवले. अर्थात वाय-फाय राऊटर हे उत्तमच होते, पण मला ज्या प्रकारच्या राऊटरची गरज होती, ते हे नव्हते. मला मोडेमविरहीत वाय-फाय राऊटरची गरज होती, तर मी मोडेमसहीत वाय-फाय राऊटर विकत घेतले. त्यामुळे मला पुनः एकदा नव्याने हवे त्या प्रकारचे राऊटर मागवावे लागले.

      दोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनेट कनेक्शन करीता दोन वेगवेगळ्या प्रकारचे खास वाय-फाय राऊटर आहेत. जे लोक बीएसएनएलसारखी इंटरनेट ब्रॉडबँड सेवा वापरतात (ADSL Connection), मला वाटतं त्यांना लँडलाईनच्या वायरमधून इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येते, त्यांच्यासाठी मोडेमसहित वाय-फाय राऊटर! आणि जे लोक टाटा, टिकोना अशा इतर ब्रॉडबँड सेवा वापरतात त्यांना केबलच्या माध्यमातून इंटरनेट पुरवले जाते, तेंव्हा अशांसाठी मोडेम विरहीत वाय-फाय राऊटर!

      मी स्वतः कधी बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा वापरलेली नाही. त्यामुळे वाय-फाय राऊटरमध्ये असा काही प्रकार असतो, याबाबत मी अनभिज्ञ होतो.  तेंव्हा वाय-फाय राऊटर विकत घेत असताना आपला घोळ होऊ नये म्हणून खास हा लेख लिहित आहे.

      आपण वाय-फाय राऊटर घेण्याच्या विचारात असाल, तर मी आपणास D-Link कंपनीचे वाय-फाय राऊटर घेण्याबाबत सुचवेन. जे लोक बीएसएनएलसारखे ADSL कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DSL-2750U Wireless N 300 ADSL2+ 4-Port Wi-Fi Router with Modem (Black) चा विचार करावा; आणि जे केबल कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DIR-605L Wireless N Cloud Router (Black) बाबत माहिती घ्यावी.

      वाय-फाय राऊटर
      डी-लिंक वाय-फाय राऊटर
      वाय-फायची रेंज ही अनेक घटकांवर अवलंबून असते, तेंव्हा एखाद्या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही विशिष्ट मिटरमध्ये सांगणे कठिण आहे. पण वाय-फाय सिग्नल साधारणपणे किती अंतरापर्यंत काम करेल? हे अंदाजे सांगणे शक्य आहे. वर सांगितलेल्या ‘डी-लिंक’च्या वाय-फाय राऊटरला दोन अँटेने असून या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही साधारण १५ मिटरपर्यंत (कमी-जास्त अवलंबून) आहे. मला वाटतं हे डिव्हाईस मधल्या खोलीत ठेवल्यास एका घरासाठी ही रेंज पुरेशी आहे.

      या लेखाच्या निमित्ताने मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःला मोबाईल व मोबाईल इंटरनेट पर्यंतच मर्यादीत ठेवू नका. इंटरनेटचा खर्‍या अर्थाने उपयोग करुन घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर आपल्या घरी अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट व वाय-फाय असणे अत्यंत आवश्यक आहे.

      आपण ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ATM केंद्रात पैसे जमा करु शकतो. पण त्यासाठी ATM मशिनचा उपयोग करता येत नाही. पैसे जमा करण्यासाठी खास वेगळ्याप्रकारचे यंत्र असते. या यंत्राला ‘कॅश डिपॉझिट मशिन’ म्हणजेच CDM असे म्हणतात. प्रत्येक ATM केंद्रात आपल्याला पैसे जमा करायचे यंत्र आढळणार नाही. काही ठराविक ATM केंद्रांमध्ये ATM मशिनशेजारी अशाप्रकारचे यंत्र दिसून येते. पैसे जमा करायचे यंत्र (CDM) कोणत्या ATM केंद्रांमध्ये आहे? ते आपण ऑनलाईन तपासू शकतो. या सुविधेमुळे आपल्या खात्यात दिवसातून कधीही पैसे जमा करता येतात. आपण अगदी सार्वजनिक सुट्टीदिवशीही पैसे जमा करु शकतो. नोकरदार लोकांसाठी ही एक चांगली सोय आहे. अशाने खास पैसे भरण्यासाठी बँकेत जावे लागत नाही.

      पैसे भरण्याकरिता CDM केंद्र हुडकणे

      CDM यंत्राची सुविधा असलेले ATM केंद्र कसे हुडकावे? ते आता आपण पाहू. CDM केंद्र शोधण्यासाठी सर्वप्रथक CDM Locator या धाग्यावर जा. View CDM Locations यावर क्लिक करा. दिलेली सुचना वाचून PROCEEDवर क्लिक करा. आता नवीन पानावर SBI Finderचा एक नकाशा उघडेल. पानाच्या डाव्या बाजूस आपणास CDM हा पर्याय दिसेल, त्याची निवड करा. दिलेल्या जागी आपला Address टाईप करा. आपण तिथे केवळ आपल्या शहराचे नाव देऊ शकतो. सरतेशेवटी Searchवर क्लिक करा. आता शेजारील नकाशात आपल्याला SBIची CDM केंद्रे दिसतील. SBIच्या कोणत्या ATM केंद्रात CDMची सुविधा उपलब्ध आहे? ते आपणास हा नकाशामुळे समजेल.

      ATM केंद्रात जाऊन पैसे भरणे

      SBIची कॅश डिपॉझिट मशिन (CDM) कशी दिसते? ते आपण खालील चित्रात पाहू शकाल. आपल्याला अशा प्रकारच्या यंत्राच्या सहाय्याने आपल्या SBI खात्यात पैसे भरायचे आहेत. केवळ १००, ५०० आणि १०००च्या नोटाच या यंत्रात भरता येतात. शिवाय एकावेळी २००हून अधिक नोटा भरता येत नाहीत. अशाप्रकारे आपणास जास्तितजास्त ४९९०० रुपये भरता येतात. नोटा बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत असाव्यात. नकली नोट सापडल्यास CDM यंत्र ती नोट ठेवून घेते. नकली नोट संदर्भात आपल्याला एक पावती मिळते जी आपण बँक मॅनेजरला नंतर दाखवू शकतो. नोटेची अवस्था चांगली नसल्यास ती नोट यंत्र ठेवून घेत नाही. आपणास ती नोट लगेच परत मिळते.

      CDM यंत्र - खात्यात पैसे भरणे
      ATM केंद्रामध्ये असे CDM यंत्र असते. त्या यंत्राच्या सहाय्याने आपण आपल्या खात्यात पैसे भरु शकतो.
      बाकी हे यंत्र नक्की कसे काम करते? त्यासंदर्भातील चित्रफिती खाली देत आहे. पहिली चित्रफीत इंग्लिश भाषेत आहे, तर दुसरी चित्रफीत ही हिंदी भाषेत आहे.

      वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतरण कसे करता येईल

      वर्ड आणि PDF हे दोन अत्यंत लोकप्रिय फाईल फॉरमॅट आहेत. दैनंदिन कामकाजात अशाप्रकारच्या फाईल्सचा सातत्याने वापर केला जातो. कधीकधी आपल्याजवळ एखादी वर्ड फाईल असते, जी आपणास PDF स्वरुपात हवी असते. अशावेळी वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतरण कसे करता येईल? ते आज आपणास पहायचे आहे.

      वर्ड फाईल PDFमध्ये बदलण्यासाठी आपण Google Docs ही गूगलची सेवा वापरणार आहोत. त्यामुळे यासाठी कोणतेही विशिष्ट सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर घेण्याची आवश्यकता नाही. पण ही एक ऑनलाईन प्रक्रिया असल्याने याकरिता आपणास इंटरनेटची आवश्यकता भासेल.

      ‘गूगल डॉक्स’ वापरण्यासाठी गूगलचे (जीमेलचे) खाते असणे आवश्यक आहे. आजकाल बहुतांश लोक ईमेलकरिता जीमेलचा वापर करतात, तेंव्हा जीमेलचा ईमेल आणि पासवर्ड आपण ‘गूगल डॉक्स’साठी वापरु शकाल.

      Start a new document खाली आपल्याला अधिकचे चिन्ह असलेले Blank document दिसेल, त्यावर क्लिक करा. एक नवीन ऑनलाईन वर्ड फाईल उघडली जाईल. आपल्या संगणकावरील वर्ड फाईलमधील मजकूर कॉपी करा आणि उघडल्या गेलेल्या ऑनलाईन वर्ड फाईलमध्ये पेस्ट करा.

      ऑनलाईन वर्ड फाईलमधील मजकूराचे आपल्या गरजेप्रमाणे फॉरमॅटिंग करा. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे मेनूबारमधील File या पर्यायावर जाऊन Download as – PDF document (.pdf) या पर्यायाची निवड करा.

      वर्ड फाईल PDFमध्ये
      अशाप्रकारे वर्ड फाईल PDF स्वरुपात बदलता येते
      अशाप्रकारे आपल्या वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतर होईल व त्यानंतर रुपांतरीत फाईल आपल्या संगणकावर उतरवली जाईल (Download होईल). वर्ड फाईलचे PDF फाईलमध्ये रुपांतरण करण्याची ही एक अत्यंत सोपी पद्धत आहे.

      Photoshop

      फोटोशॉप मध्ये ब्लॅक अँड व्हाईट
      इफेक्ट !
      आज खूप दिवसांनी ब्लॉग वर आलोय.
      मागील काही लेखापासून आपण बेसिक
      फोटोशॉप शिकत आहोत. आज आपण ब्लॅक अँड
      व्हाईट इफेक्ट बद्दल पाहूयात.एखाद्या
      फोटोला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट कसा द्यावा.
      फोटोशॉप मध्ये ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट
      देण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण
      नवीन शिकणार्याला ते जास्तच गोंधळून
      टाकतात. ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट देण्याचा
      सर्वात सोपा मार्ग मी तुम्हाला सांगणार
      आहे.

      येथून घेऊ शकता किंवा तुमच्याकडील एखादी
      वापरा.
      1) सर्वप्रथम फोटो ओपेन करा .
      2)फोटो ओपेन झालेला दिसेल.
      3)आता कीबोर्ड वरून Shift+Ctr+U दाबा आणि
      पहा जादू.
      आहे कि नाही सोपे ? मग बघा करून. जमले
      नाही तर ?? जमेलच .! तरीही मी आहे कि संपर्क
      करा.
      धन्यवाद.

      Saturday, 12 November 2016

      शिक्षकांच्या नोंदी

      शिक्षकांच्या नोंदी

      शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात

      १) वार्षिक नियोजन स्वहस्ते लिहलेले असावे (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडूनमान्य करून घ्यावे)

      २) मासिक नियोजन
      ३) घटक नियोजन
      ४) दैनिक टाचण
      ५) अद्यावत विद्यार्थी हजेरी
      ६) विद्यार्थी पालक भेट रजिस्टर (वही)
      ७) सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या असाव्यात.
      ८) विद्यार्थ्यांचे वेळोवेळी घेतलेले प्रकल्प
      ९) ज्या प्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
      १०) विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्णकेलेले स्वाध्याय वर्गकार्य पुस्तके
      ११) विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांबाबत नोंदी
      १२) शैक्षणिक साहित्य.
      १३) मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाची जबाबदारी

      फिरती शाळा फिरती शाळा एक अभिनव उपक्रम

       फिरती शाळा

      फिरती शाळा एक अभिनव उपक्रम

      विद्यार्थी शाळेपर्यंत येऊ शकत नसेल तर शाळाच विद्यार्थ्यांपर्यंत जावी ही संकल्पना प्रत्यक्षात उतवारी यासाठी सोलापूर महापालिका आणि बालकामगार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत महापालिकेच्या बसलाच शाळेत परावर्तीत करून शाळाबाह्य मुलांना शिकविण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगाची फलश्रृती झाल्यास त्याला राज्यपातळीवर चालविण्याचा मनोदय आहे.
      भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत सोलापूर जिल्ह्यात गेल्या 18 वर्षापासून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यान्वित आहे. या कालावधीत प्रकल्पाने विविध धोकादायक उद्योगात काम करणाऱ्या बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन केले आहे. प्रकल्पाअंतर्गत आजतागायक 14,535 बालकामगारांना प्रवेश दिला व त्यातील 10,920 बालमजूर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्याची ही कामगिरी महाराष्ट्रात उल्लेखनीय अशीच आहे.
      परंतु आजही बालकामगार, शाळाबाह्य मुले आढळून येतात अशा मुलांची नावे ज्या त्या विभागातील शासनमान्य शाळेच्या पटावर आहेत. परंतु, ती शाळेत जात नाहीत. इरतत्र भटकणे किंवा बालमजुरी करणे यातच त्यांचे बालपण हरवून गेले आहे. तसेच रोजीरोटीसाठी गावोगावी भटकणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील मुलेही शिक्षणापासून वंचित आहेत. अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठी शाळाबाह्य व स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी काहीतरी वेगळा प्रयोग करावा यादृष्टिकोनातून फिरती शाळेचा विचार करण्यात आला. मात्र प्रकल्पाकडे तशी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्याने महानगरपालिकेची मदत घेण्याचा विचार पुढे आला. यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाकडून एका बसची व्यवस्था करण्यात आली आहे. बसचे रुपांतर एका चालत्या फिरत्या वर्ग खोलीत केले आहे. ही बस शहराच्या विविध रस्त्यावर तसेच स्थलांतरित कुटुंबाच्या पालांवर जाऊन तेथील शाळाबाह्य व बालमजूर बालकांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन बसमध्येच शिकविण्याचे काम करणार आहे.
      या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद प्रकल्पाकडे नाही, मात्र सोलापूर महानगरपालिकेने बससाठी स्वतंत्र ड्रायव्हर, इंधन, देखभाल व सजावट यासाठी 2,68,000 रुपयांची तरतूद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन सहकार्य केले आहे. तसेच परिवहन विभागाने मोफत बस उपलब्ध करुन दिल्याने ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.
      शिक्षणामध्ये प्रामुख्याने अक्षर ओळख, अंक ओळख, स्वच्छता, मूल्यशिक्षण, संस्कार, खेळ, गाणी, कविता, इंग्रजीचे ज्ञान तसेच हस्तकला व इतर प्रशिक्षणही देण्याचे नियोजन आहे. सदर मुलांच्या पालकांच्या आर्थिक व इतर समस्या समजावून घेऊन आवश्यक ते समुपदेशन करण्यात येईल. यासाठी बसमध्ये दोन शिक्षक, एक व्यवसाय प्रशिक्षक व एक सामाजिक कार्यकर्ता हे पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत.
      यासाठी शहरातील होम मैदान, रेल्वे स्टेशन, साखर कारखाना, स्थलांतरित कामगारांच्या वस्त्या राष्ट्रीय महामार्गावरील छोट्या वस्त्या, विटभट्टी परिसर व शहरातील सर्व झोपडपट्टी परिसरात ही बस जाईल. सदर कार्यक्रम हा सुरुवातीला जानेवारी 2015 ते जून 2015 या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येईल. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून बालकांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाल्यास व त्याची उपयोगिता सिद्ध झाल्यास पुढील कालावधीसाठीही हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
      राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत संपूर्ण राज्यात हा उपक्रम सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सोलापूर महानगरपालिका परिवहन विभाग यांची बस उपलब्ध करुन दिल्याने व सोलापूर महानगरपालिका यांनी आर्थिक मदत केल्याने सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजापुढे प्रस्थापित होईल. या योजनेतून शहरातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल व बालकांचे बालपण त्यांना परत मिळवून देण्याचा एक आगळावेगळा अभिनव उपक्रम होईल.

      शालेय कामकाज कामे यादी

      1. दैनंदिन शालेय परिपाठ घेणे.
      2. शालेय पोषण आहार योजना राबविणे.
      3. शाळा व्यवस्थापन समिती सभा घेणे.
      4. शिक्षक पालक संघ सभा घेणे.
      5. माता पालक संघ सभा घेणे.
      6. शालेय विद्यार्थी मंत्रीमंडळ तयार करणे.
      7. शैक्षणिक उठाव राबविणे.
      8. राष्ट्रीय सण व उत्सव साजरे करणे.
      9. स्वच्छ व सुंदर शाळा तयार करणे.
      10. शालेय रेकॉर्ड अद्ययावत करणे
      11. पालक संपर्क ठेवणे.
      12. शाळा विकास आराखडा तयार करणे.
      13. शालेय बालक्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे.
      14. वैज्ञानिक प्रदर्शनीत सहभाग घेणे.
      15. नवरत्न पुरस्कार योजना राबविणे.
      16. विविध शिष्यवृत्ती योजना राबविणे.
      17. शालेय गणवेश योजना
      18. शालेय आरोग्य तपासणी करणे.
      19. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
      20. प्रकल्प तयार करून घेणे.
      21. शालेय उपक्रम व सहशालेय उपक्रम घेणे.
      22. मुलांचे वाढदिवस साजरे करणे.
      23. पटनोंदणी सर्व्हेक्षण करणे.
      24. शैक्षणिक साहित्य निर्मिती
      25. प्रश्नपेढी निर्माण करणे.
      26. मुलांचे वाचनालय
      27. विद्यार्थी संचिका तयार करणे.
      28. विद्यार्थी संचयी प्रगतिपत्रक तयार करणे.
      29. शिक्षक संचिका तयार करणे.
      30. वार्षिक स्नेहसंमेलन घेणे.
      31. शालेय मुलांच्या सहलीचे आयोजन करणे.

      WELCOME TO MY BLOG......

       आदरणीय ,

                   शिक्षक बंधु आणि भगिनीनो
                                    सप्रेम नमस्कार
                        शिक्षक मित्र हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझ्या ब्लॉगचे नाव आहे DRONACHARYA
          माझ्या ब्लॉगची वैशिष्ट्ये:
                    -  खाजगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाने आणि तेही शिक्षकाने बनवलेला पहिला ब्लॉग
                    -  आतापर्यंतच्या सर्व ब्लॉगपेक्षा सर्वात जास्त आणि सविस्तर मुद्दे
                    -  दैनदिन परिपाठ, विविध चालीतील असंख्य गीत
                    -  महाराष्ट्राची संपूर्ण माहिती
                    -  सर्व वर्तमानपत्र
                   -   शालेय उपयोगी सर्व प्रकारची संकेतस्थळे उपलब्ध
                    -  मराठी विश्वकोश
           - onlineगणिताचे धडे
                  -    आता  ५ ते १२ चा भूगोलाचा अभ्यास करा online
           - ssc आणि hsc चे मार्कशीट मिळवा
                 -    सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती लिंक्स
                 -    सर्व प्रकारची शालेय  अभिलेखे ,मूल्यमापन नोंदी, घोषवारे
                  -   १ ते १२ पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका  संच
                  -  विवीध प्रकारचे शालेय software
                  -  १ ते ८ सर्व मराठी इंग्रजी कविता
                  -  संगणक आणि मोबाईल शी निगडीत अनेक युक्त्या
                  -  ब्लॉग बनवणे वेबसाईट बनवणे यांचे सविस्तर ज्ञान
                  -  अनेक सोपे वं मनोरंजक प्रयोग
                  -  विविध शालेय उपक्रम
                  -  १ ते ८ pdf पुस्तके ,प्रश्न पत्रिका, उजळणी पाढे, rhymes, animation
                  -  असंख्य प्रकारचे शैक्षणिक व्हिडीओ यामध्ये alphabet,counting. english song, poem, मराठी शब्द    मुळाक्षरे 
                  -  सूत्रसंचालन ,भाषणे audio pdf स्वरुपात
                  -  सर्व शासननिर्णय
                  -  शालेय समित्या ची माहिती
                  -  ज्ञानरचानावाद 

                  -  आणि भरपूर माहितीचा खजिना 

      Thursday, 10 November 2016

      MY YOUTUBE CHANNEL OR EDUCATIONAL VIDEO

      YOU CAN WATCH EDUCATIONAL VIDEO ON MY YOUTUBE CHANNEL.....WATCH IT ON
      YOUTUBE BY SERACHING MAHESH MHASE CHANNEL

      Sunday, 6 November 2016

      ‘स्मार्टफोन घेतला तेंव्हा तो अगदी नीट चालत होता, पण आता तो हँग होतोय, संथ गतीने चालतोय’; ही काही फार वेगळी आणि विशेष अशी समस्या नाही. प्रत्येक स्मार्टफोनची एक क्षमता असते आणि त्या क्षमतेबाहेर जर आपण त्यावर काम सोपवलं, तर सहाजिकच तो हँग होतो. आपल्याला ताण आल्यानंतर आपलं डोकं जसं हँग होतं, अगदी त्याचप्रमाणे स्मार्टफोनवर ताण आल्यानंतर तो हँग होऊ लागतो. त्याच्यावर कसला ताण आला आहे? हे जर आपण समजून घेतलं, तर आपण त्यावरील ताण मोकळा करु शकतो, जेणेकरुन त्यास पूर्ववत कार्यक्षमतेने काम करणे शक्य होते. यादृष्टीने जर आपल्याला दोन सोप्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, तर आपला फोन काही मिनिटांतच पुन्हा व्यवस्थित होणे शक्य आहे.
      ‘इन्टरनल मेमरी’ आणि ‘रॅम’ (RAM) हे दोन महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. आपल्या मेंदूमध्ये जसं निरनिराळ्या विषयांचं ज्ञान साठवलेलं असतं, अगदी तसंच इन्टरनल मेमरी मध्ये विविध प्रकारचा डेटा साठवलेला असतो. पण हे सर्व प्रकारचे ज्ञान आपण एकाच वेळी वापरतो का? तर नाही! ज्यावेळी जितक्या ज्ञानाची गरज आहे, आपण त्यावेळी केवळ तितकंच ज्ञान वापरतो. त्याचप्रमाणे ‘इन्टरनल मेमरी’ मधील सर्व प्रकारचा डेटा हा काही एकाच वेळी उपयोगात येत नाही. ज्यावेळी जितका डेटा गरजेचा आहे, त्यावेळी तितकाच डेटा वापरला जातो.
      आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? यासही मर्यादा असते. ‘इन्टरनल मेमरी’ मध्ये जरी भरपूर डेटा ग्रहण करण्याची क्षमता असली, तरी आपला स्मार्टफोन एकावेळी किती काम करु शकेल? ते आपल्या फोनच्या RAM वर अवलंबून असते. थोडक्यात काय? तर आपल्या फोनची ‘इन्टरनल मेमरी’ आणि ‘रॅम’ हे योग्य प्रमाणात रिकामे असणे आवश्यक आहेत. ‘इन्टरनल मेमरी’ अथवा ‘रॅम’ जर भरलेली असेल, तर अर्थातच आपल्या स्मार्टफोनवर ताण आहे असे समजण्यास हरकत नाही.
      आपल्या स्मार्टफोनच्या Settings मध्ये जा. Apps मध्ये या. काही अ‍ॅप्स हे External Memory वर हलवता येत असले, तरी ते मुळतः Phone storage / Internal storage म्हणजेच Internal Memory मध्ये साठवलेले असतात. Downloaded या विभागात आपणास आपल्या फोनवरील अ‍ॅप्सची यादी दिसेल. स्क्रिनच्या तळाशी आपल्या स्मार्टफोनमधील Phone storage / Internal storage ची स्थिती दिसेल. आपल्या स्मार्टफोनच्या एकंदरीत Internal storage पैकी कमीतकमी १५% मेमरी रिकामी आहे का? ते तपासून पहा. नसल्यास, काही अ‍ॅप्स अन्‌इन्स्टॉल करा, काढून टाका. किंवा फाईल मॅनेजरमध्ये जाऊन फोनच्या इन्टरनल मेमरीमध्ये जर ऑडिओ, व्हिडिओ, इमेज फाईल्स असतील, तर त्या मेमरी कार्डवर हलवा, जेणेकरुन आपल्या Internal storage वरील ताण कमी होईल.
      इन्टरनल मेमरी
      एकंदरीत इन्टरनल मेमरीच्या कमीतकमी १५% इन्टरनल मेमरी मोकळी असावी
      अशाप्रकारे इन्टरनल मेमरी रिकामी केल्यानंतर आता आपल्याला RAM रिकामी करायची आहे. आत्ता आपण Settings – Apps – Downloaded मध्ये आहात. स्क्रिन डाव्या बाजूस सरकवून (Slide करुन) Settings – Apps – Running मध्ये या. स्क्रिनच्या तळाशी आपणास RAM ची स्थिती दिसेल. आपल्या फोनच्या एकंदरीत RAM पैकी कमीतकमी २५% RAM रिकामी आहे का ते पहा? नसल्यास, Running या विभागात दिसणार्‍या अ‍ॅप्सपैकी आपल्याला न लागणारे अ‍ॅप Downloaded मधून अन्‌इन्स्टॉल करा. त्यानंतर ते Running मधूनही दिसेनासे होतील व अशाप्रकारे आपल्या RAM वरील ताण काहीप्रमाणात नाहीसा होईल.
      रॅम (RAM)
      एकंदरीत रॅमपैकी साधारण २५% रॅम मोकळी असावी
      Clean Master व तस्सम अ‍ॅप्स हे आपल्या फोनमधील RAM व्यवस्थित हाताळून आपला फोन स्वच्छ ठेवण्याचा दावा जरी करत असले, तरी अनेकदा अशा अ‍ॅप्समुळेच आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता खालवते. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर जर अशाप्रकारचे एखादे अ‍ॅप असेल, तर ते काढून टाका. मला वाटतं या सर्व गोष्टी केल्यानंतर आता आपल्या स्मार्टफोनची गती वाढण्यास हरकत नाही.
      आज अनेक दिवसांनंतर बाहेर पाऊस पडत आहे. पाऊसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. मध्यंतरी कृषीदिनी मी सोशल मिडियावर असं मत मांडलं होतं की, शेतकर्‍यांनी शेती करत असताना आधुनिकतेची कास धरायला हवी. चाकोरीबाहेर विचार करणारे शेतकरी नवनवीन प्रयोग करुन यशस्वी होताना आपण नेहमीच बातम्यांमधून पहात असतो. स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञान आता खेडोपाडी पोहचू लागले आहे. याच अनुशंगाने एक छोटिशी सुरुवात म्हणून पुढील लेखात आपण हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या अ‍ॅप्सची माहिती घेऊ.