अध्यक्ष महाशय आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज मी लोकमान्य टिळक यांच्या विषयी काही महत्त्वाचे दोन शब्द बोलणार आहे, तरी तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती.
आपला भारत देश गुलामगिरीत असल्यामुळे अनेक थोर महान नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले ..फुले, आंबेडकर, शाहू महाराज, गांधी ,नेहरू ,आगरकर, सावरकर ,भगतसिंह ,राजगुरू, सुखदेव आदि अनेक महापुरुषांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यापैकीच लोकमान्य हे एक होते.. आज आपण लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याविषयी माझे माझे दोन शब्द सांगणार आहे.
लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै १८५६ रोजी चिखली या गावी झाला हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे.त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते लोकमान्य यांचे नाव केशव होते. हे नाव त्यांना त्यांची कुलदेवता केशव नावाची होती ;म्हणून त्यांचेही नाव केशव ठेवले होते.
लाल बाल पाल असे आपण ऐकले असेल.. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल.. या तिघांनी मिळून स्वातंत्र्यलढ्यासाठी खूप प्रयत्न केले म्हणून लाल बाल पाल तिघांची जोडी सगळ्यांच्या परिचयाची आहे.. त्यांनी इंग्रज सरकार हे या देशातून निघून जावे यासाठी अतोनात प्रयत्न केले; म्हणून यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला.
लोकमान्य यांचे बालपण अतिशय खडतर होते त्यांचे वडील चिखलगावचे खोत होते. त्यांना तीन बहिणी होत्या आणि त्यांचे खरे नाव केशव होते ,तरीही बाळ या नावानेच त्यांना बोलले जात होते ..त्यांचे वडील संस्कृत मध्ये पंडित होते., शिवाय शिक्षक म्हणून काम करत होते.. त्यांच्या वडिलांना गणिताविषयी भरपूर आवड होती. त्यानंतर त्यांची बदली पुण्यात झाली. पुण्यात आल्यानंतर त्यांना अनेक शिक्षक मिळाले त्यांच्या आचार विचारातून त्यांना भरपूर शिकायला मिळाले. अन्यायाविरुद्ध चिड निर्माण होत होती, अशातच त्यांच्या लहान वयातच त्यांची आई वारली आणि लोकमान्य हे सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे ही निधन झाले.. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपंत यांनी लोकमान्य यांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला.
करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते त्यांनी सरकारी नोकरी न करता आपले आयुष्य देशसेवेसाठी घालवणे उचित आहे हे ठरवलं होते म्हणून देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे त्यांचे विचार होते; परंतु त्यांच्या विचारांमध्ये एवढी तफावत होती की आगरकर हे सामाजिक सुधारणा यासाठी आग्रही होते तर टिळक हे राजकीय स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी आग्रही होते.
टिळकांना अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी त्यांचे विचार होते तर आगरकर यांचे असे विचार होते की अगोदर समाज हा सुधारला पाहिजे. स्वातंत्र्य हे उशिरा मिळाले तरी चालेल यामुळे दोघांचे मैत्रीचे संबंध असले तरीही दोघांच्या मतमतांतरामुळे विचारात वैचारिक मतभेद निर्माण झाले; पण त्यांची मैत्री त्यांची देशनिष्ठा हे मात्र एकमेकांना पूरक अशीच होती.
लोकमान्य भारतीय असंतोषाचे जनक म्हणून नावारूपास आले होते ..लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी दिली होती.. लोकमान्य याचा अर्थ लोकांनी स्वीकारलेले, लोकांना मान्य असलेले लोकमान्य हे त्यावेळी लोकांच्या मनामध्ये प्रभाव टाकत होते; म्हणून लोकांना ते हवेसे वाटत असल्यामुळे लोकांनी दिलेली ही त्यांना उपमा होती.. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणाच असा त्यांचा परखडपणे विचार होता.
लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत झाले.. लोकमान्य टिळक यांना सहा अपत्य होती त्यापैकी एक लहानपणीच वारला होता, त्यापैकी तीन मुली आणि दोन मुले राहिले त्यांच्या पत्नीचे नाव तापीबाई होते हे नाव त्यांचे लग्नाच्या अगोदरचे होते.. लग्नानंतर त्यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवले.. ज्यावेळी लोकमान्य हे ब्रह्मदेशात तुरुंगात असताना तापीबाई यांचे निधन 7 जून 1912 रोजी झाले .ह्या कोकणातील त्यांना त्यांचे गाव लाडघर होते..त्यांना तीन मुली आणि विश्वनाथ, रामभाऊ व श्रीधर असे तीन मुलगे होते.
अशा पद्धतीने आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी माझे चार शब्द ऐकून घेतले त्याबद्दल या ठिकाणी गुरुजनवर्ग आणि विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा एकदा लोकमान्य टिळक यांना शतशः अभिवादन करतो आणि माझे भाषण थांबवतो..जय हिंद जय महाराष्ट्र !