*स्व समुपदेशनाची पहिली पायरी*
*स्वची ओळ्ख*
स्व समुपदेशनाचा पहिला टप्पा हा ‘स्व’ ची ओळख हा आहे. स्वतःचे ध्येय ओळखणे, ध्येय गाठण्यासाठी स्वतःला नियोजन करता येणे, आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येणे, स्वताच्या विचाराला, भावनेला ओळखता येणे, स्वतःचे विचार व भावनांवर नियंत्रण मिळविणे, आपला स्वताचा ठसा निर्माण करणे आणि इतरांना आपल्या प्रभावक्षेत्रात आणणे यालाच ‘स्व’ ची ओळख असे म्हणतात.
आपण आज जे आहोत ते आपल्या मेंदूमुळे. मेंदुमाध्येच आपले पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह विचार, आपली निर्णय क्षमता, आपल्यातील अचूअकता, नियोजन, चिंतन मनन, चांगल्या किंवा चुकीच्या सवयी, नातेसंबंध, इतकेच नव्हे तर आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता तयार होत असते.
त्यामुळे आज माझ्यामध्ये जे गुण-दोष आहेत, माझा स्वभाव, माझ्या सवयी, माझे आरोग्य, माझी शारीरिक व मानसिक कार्यक्षमता हे सर्व माझ्या मेंदूमुळेच. पण तुम्ही जशा तुमच्या मेंदूला सूचना किंवा संदेश देतात, तुमची जशी मानसिकता असते, तुमचा जसा दृष्टीकोन असतो, तसाच तुमचा मेंदू काम करीत असतो. त्यानुसारच आपली व आपल्या सभोवतालच्या परिसराची निर्मिती होत असते.
त्यामुळे आपल्याला मेंदूची कार्यपद्धती समजून घ्यावी लागेल. कोणत्या मानसिकतेत मेंदू कसा काम करतो, मेंदुमधून कोणत्या मानसिकतेत कोणती रसायने बाहेर येतात, त्या रसायनाचा माझ्या आरोग्यावर, स्वभावावर, विचारावर आणि माझ्या कार्यक्षमतेवर कोणता परिणाम पडतो, माझ्यावरच नव्हे तर माझ्या कुटुंबावर, परिसरावर कसा पडतो हे समजून घ्यावे लागणार आहे.
उदा-मी तान-तणावात असताना मेंदूतून कार्टेसॉईल हा हार्मोन्स बाहेर पडतो, यामुळे माझे हार्ट बीट वाढतात, वारंवार तणावात राहिलो, तर जास्त प्रमाणात कार्टेसॉईल हा हार्मोन्स स्त्रावतो आणि त्याचा परिणाम BP हा आजार आपल्याला कायम स्वरूपी सुरु होतो. तर याउलट विविध मानसिकतेतून आपल्याला डोपामाईन, सेरोटोनीन, एन्ड्रॉफिन सारखे पॉझिटिव्ह हार्मोन्स सुद्धा बाहेर पडतात, जे आपल्याला आत्मविश्वास, उर्जा, चांगले आरोग्य पुरवितात.
सोबत जसे एकमेकांचे बोलणे ध्वनीलहरीच्या माध्यमातून आपल्या कानावर पडतात, त्याचा अर्थ आणि भावना आपल्याला समजतात, त्याचप्रमाणे मेंदूतून सुद्धा लहरीच्या मार्फत आपले विचार, भावभावना एकमेकांना समजत असतात. मग माझ्या मेंदूतून कोणत्या लहरी निघतात, कोणत्या लहरी निघाल्या पाहिजेत, कोणत्या लहरीचा माझ्या कुटुंबाच्या आरोग्य, शिक्षण, प्रभाव, आर्थिक, नातेसंबंध, व्यवसाय अशा विविध बाबतीत प्रगती झाली पाहिजे हे स्व समुदेषण घेणाऱ्या व्यक्तीला माहिती असले पाहिजे.